हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा

इयत्ता
८ वी ते १० वी

माध्यम
सेमी इंग्रजी व मराठी

 

शाळेची वेळ

सोमवार ते शुक्रवार
दुपारी १२.३० ते ५.३०

शनिवार: सकाळी
७.१५ ते ११.००

 

पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
१२:०० ते १२:३०

 

शाळेचा पत्ता
हुजूरपागा कात्रज माध्यामिक शाळा
राजस सोसायटी, कात्रज

फोन नं
०२०-२६९६०२२३

ईमेल आयडी
hujurpagakatraj@yahoo.in

 

शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, शारिरीक शिक्षण, संगणक, चित्रकला, शिवण, गाईड, समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण, कार्यानुभव.

 

मुख्याध्यापिका
श्रीमती हेमलता भूमकर - एमए.बीएड.(इंग्रजी)

 

२०२३ - २४ मधील विशेष उपक्रम

इयत्ता १० वी एस.एस.सी. बोर्ड निकाल २०२२ - २०२३


विविध शालेय उपक्रमांबाबत विद्यार्थिनी आणि पालकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

शाळेचा इतिहास व उद्देश

महाराष्ट्र गर्ल्स एज्यूकेशन सोसायटीने पुण्याच्या भोवतालच्या उपनगरीय भागातील मुलींच्या शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन कात्रज येथील राजस सोसायटी मध्ये १९९१ साली हुजूरपागा कात्रज शाळा सुरु केली. ही शाळा राजस सोसायटी मधील बंगल्यामध्ये भरत होती. २६ जानेवारी १९९५ साली याच जागेवर शाळेची इमारत बांधली.
जून १९९६ पासून ५ वी व ८ वी चे वर्ग सुरु झाले.
१९९७ - मध्ये शाळेची दुसरी इमारत बांधून पूर्ण झाली
१९९९ - इयत्ता १० वी एस.एस.सी. परीक्षा पास होऊन पहिली बॅच बाहेर पडली.
२००४ - ११ वी वाणिज्यचे वर्ग सुरु करण्यात आले.
२०११ - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) चे ११ वी चे वर्ग सुरु करण्यात आले.

एस. एस. सी. बोर्ड निकाल २०२२-२३

पुणे विभाग निकाल 

९५.६४%

हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभाग निकाल 

१००%

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनी

२४९

उत्तीर्ण विद्यार्थिनी

२४९

अनुत्तीर्ण विद्यार्थिनी

९०% व ९०% पेक्षा जास्त टक्के असणाऱ्या विद्यार्थिनी

२३

विशेष योग्यता

१३६

प्रथम श्रेणी

८५

द्वितीय श्रेणी

२६

पास श्रेणी

एकुणात प्रथम पाच क्रमांक

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव 

एकूण गुण

टक्के

पहिला

कु. चव्हाण सृष्टी श्रीकांत 

४७६/५००

९५.२०%

दुसरा 

कु. सुरनीस मुग्धा महेश 

४७५/५००

९५.००%

तिसरा 

कु. भांदिर्गे अनुष्का अभिजित 

४६४/५००

९४.८०%

चौथा 

कु. नवले तन्वी ज्ञानेश्वर 

४७३/५००

९४.६०%

पाचवा (विभागून)

कु. कुलकर्णी तेजस्विनी गिरीश 

४७२/५००

९४.४०%

पाचवा (विभागून)

कु. बोराटे साक्षी संतोष 

४७२/५००

९४.४०%

विषयावर क्रमांक

मराठी

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला (विभागून)

कु. सुरनीस मुग्धा महेश

९५/१००

पहिला (विभागून)

कु. कुलकर्णी तेजस्विनी गिरीश

९५/१००

पहिला (विभागून)

कु. कस्तुरकर सृष्टी बालाजी 

९५/१००

दुसरा (विभागून) 

कु. मोमीन इल्मा बिलाल

९४/१००

दुसरा (विभागून)

कु. भांदिर्गे अनुष्का अभिजित

९४/१००

दुसरा (विभागून)

कु. चौधरी अर्पिता अण्णासाहेब

९४/१००

दुसरा (विभागून)

कु. पवार प्रणिता प्रशांत 

९४/१००

दुसरा (विभागून)

कु. चव्हाण सृष्टी श्रीकांत

९४/१००

दुसरा (विभागून)

कु. कारले अस्मिता कैलास 

९४/१००

दुसरा (विभागून)

कु. यादव गायत्री विनायक 

९४/१००

हिंदी

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला 

कु. भांदिर्गे अनुष्का अभिजित

३७/४०

दुसरा (विभागून) 

कु. भागवत भार्गवी गणेश 

३६/४०

दुसरा (विभागून)

कु. चव्हाण सृष्टी श्रीकांत 

३६/४०

दुसरा (विभागून)

कु. सांगवे सृष्टी शरणप्पा

३६/४०

दुसरा (विभागून)

कु. महागांवकार ईश्वरी सचिन

३६/४०

दुसरा (विभागून)

कु. सूर्यवंशी वैष्णवी संतोष 

३६/४० 

दुसरा (विभागून)

कु. राऊत मनस्वी विनोद 

३६/४०

दुसरा (विभागून)

कु. भिलारे सृष्टी पांडुरंग 

३६/४०

दुसरा (विभागून)

कु. खवले गौरी मारुती 

३६/४०

संस्कृत

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला ( विभागून) 

कु. खुटवड प्रतिक्षा राहुल

४०/४० 

पहिला ( विभागून) 

कु. अडागळे सिद्धी अजितकुमार 

४०/४० 

पहिला ( विभागून) 

कु.सुरनीस मुग्धा महेश

४०/४० 

पहिला ( विभागून) 

कु. चव्हाण सृष्टी श्रीकांत 

४०/४० 

पहिला ( विभागून) 

कु. कुलकर्णी तेजस्विनी गिरीश 

४०/४० 

दुसरा (विभागून)

कु. वाल्हेकर समृद्धी ज्ञानेश्वर

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. भांदिर्गे अनुष्का अभिजित

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. माणगिरे अपर्णा नरसिंह

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. चौधरी अर्पिता अण्णासाहेब

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. कुडापणे हर्षाली हनुमंत

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. कोरडे श्रावणी विशाल

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. पवार वैष्णवी दिगंबर 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. बोराटे साक्षी संतोष 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. जाधव अनुष्का सुरेश

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. भोसले आर्या संतोष

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. नान्नजकर समृद्धी गुरुलिंग 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु, रायकर हर्षदा मच्छिंद्र 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. घाटगे वृषाली राजेंद्र 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. दंडगव्हाळ अनुष्का देविदास 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. मोमीन इल्मा बिलाल

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. कंक तन्वी संदीप

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. सुरासे स्वामिनी वैजिनाथ 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. सुरवसे अस्मिता शाम

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. पिसे नेहा नवनाथ 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. काळे अश्विनी कृष्णा

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. झरेकर तनुष्का नारायण 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. उरुणकर तन्वी नंदकुमार

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. मुजुमले ज्ञानदा भगवान 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. नवले तन्वी ज्ञानेश्वर

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. सूर्यवंशी वैष्णवी संतोष 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. यादव गायत्री विनायक

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. भिलारे सृष्टी पांडुरंग 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. शिंदे निशा गजानन

३९/४०

दुसरा (विभागून)

कु.घुले समीक्षा संजयकुमार 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. गायकवाड साक्षी संजय

३९/४०

इंग्रजी

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला (विभागून)

कु. वाव्हळ नीलिमा किरण 

९४/१००

पहिला (विभागून)

कु. शिंदे समृद्धी संदीप 

९४/१००

दुसरा (विभागून)

कु. जाधव हर्षदा योगेश 

९३/१००

दुसरा (विभागून)

कु. चव्हाण सृष्टी श्रीकांत 

९३/१००

दुसरा (विभागून)

कु. अडागळे सिद्धी अजितकुमार 

९३/१००

दुसरा (विभागून)

कु. मरकड पृथा गणेश 

९३/१००

दुसरा (विभागून)

कु. बोचरे सृष्टी नागेश 

९३/१००

गणित

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला 

कु. वरखडे प्रांजली दिपक

९८/१००

दुसरा (विभागून)

कु. भिलारे श्रावणी धर्मेंद्र

९७/१००

दुसरा (विभागून)

कु. मारणे मानसी अमृत 

९७/१००

विज्ञान

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला (विभागून)

कु. खवले गौरी मारुती 

९८/१००

पहिला (विभागून)

कु. दळवी सांची अनिकेत 

९८/१००

पहिला (विभागून)

कु. काची तनुश्री विपूल

९८/१००

पहिला (विभागून)

कु. यादव गायत्री विनायक 

९८/१००

दुसरा 

कु.कर्चे सायली दत्तात्रय

९७/१००





इतिहास 

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला 

कु. नवले तन्वी ज्ञानेश्वर

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. काळे अश्विनी कृष्णा 

३८/४०

दुसरा (विभागून)

कु. मुजुमले ज्ञानदा भगवान 

३८/४०



भूगोल

क्रमांक 

विद्यार्थिनीचे नाव 

गुण

पहिला 

कु. भागवत भार्गवी गणेश 

३९/४०

दुसरा (विभागून)

कु. भांदिर्गे अनुष्का अभिजित

३८/४०

दुसरा (विभागून)

कु. कुडापणे हर्षाली हनुमंत 

३८/४०

दुसरा (विभागून)

कु. खवले गौरी मारुती

३८/४०

दुसरा (विभागून)

कु. नवले तन्वी ज्ञानेश्वर

३८/४०

दुसरा (विभागून)

कु. शिंदे आर्या विजय 

३८/४०

दुसरा (विभागून)

कु. भिलारे ज्ञानेश्वरी पुंडलिक 

३८/४०

उल्लेखनिय घटना व उपक्रम

स्वयंसिद्धा

मंगळवार दिनांक ७/११/२०२३ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींसाठी “स्वयंसिद्धा” हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात इयत्ता ८वी, ११वी व १२वी च्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमधील कला कोशल्य, संभाषण, मार्केटिंग या सारख्या कौशल्याचा विकास साधून नवनिर्मितीचा आनंद मिळविणे हा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना भांडवल उभारणे, अंदाजपत्रक ठरविणे, विक्रीच्या वस्तूंची किमंत ठरविणे, वस्तूंचे पॅकिंग करणे , जमाखर्चाचा हिशोब ठेवणे या गोष्टी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्यास मिळाला. विद्यार्थिनींनी पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, रंग , विविध दागिने, पर्स या सारख्या वस्तू, तसेच भेळ, पाणीपुरी, विविध चाटचे प्रकार, चॉकलेट, सॅँडविच या सारखे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. विक्री करून मिळालेल्या नफ्यातून ५०% टक्के नफा विद्यार्थिनींनी शाळेसाठी दिला. अर्थार्जन करणे, सामजिक बांधिलकी जपणे आणि स्वत: मधील सुप्त गुण ओळखून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना मिळाली.

स्वयंसिद्धा या उपक्रमाचे नियोजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती साधना घोडके आणि श्रीमती अश्विनी मराठे यांनी केले, वर्गशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha Swayamsiddha

पुस्तक अभिवाचन उपक्रम

बालदिनानिमित्त गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक च्या माध्यमिक शाळेत लेखिका माननीय डॉक्टर संगीता बर्वे यांच्या उपस्थितीत तसेच माननीय श्री सुजित जगताप माननीय श्री शिवाजी कामठे तसेच मा. श्री.हरिश्चंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत लेखिका संगीता बर्वे यांचे माझे आजोळ या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले यासाठी प्रियांका सोनकांबळे या विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत तसेच श्रीनिधी हुद्दार पाहुण्यांची ओळख माननीय मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता भूमकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर लेखिकांच्या अभिवाचनात सहभागी विद्यार्थ्यांनी सुंदर रीतीने काव्य वाचून कार्यक्रमाला प्रारंभ केला शुद्ध मराठीचे गुणगान जाताना तिला कधी ना अंतर द्यावे या गीताचे सुरेल आवाजात माय मराठीचे कौतुक प्रांजली बर्वे यांनी केले. लेखिका संगीता बर्वे यांनी विद्यार्थिनींची सुसंवाद साधला महाराष्ट्रात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशा अभिवाचनाचे प्रयोग होणे गरजेचे आहे भाषेमुळेच आपण घडतो तसेच ऐकण्याचे बघण्याचे व वाचनाचे संस्कार व्हावे या योगे आपली मातृभाषा आपणच जिवंत ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची आज नितांत गरज आहे असा संदेश त्यांनी दिला.

Pustak abhiwachan Pustak abhiwachan Pustak abhiwachan Pustak abhiwachan Pustak abhiwachan Pustak abhiwachan

वाचन प्रेरणा दिन

हुजूरपागा कात्रज शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जेष्ठ साहित्यिका मा. श्रीमती दीपा देशमुख यांचे व्याख्यान झाले. मा. श्रीमती देश्मुख म्हणाल्या की “भारताची खरी शक्ती ही युवा शक्ती असून डॉ. कलाम यांचे लेखन या पिढीला संस्कारक्षम आणि सुजाण नागरिक बनविण्यास सक्षम आणि प्रेरणादायी आहे.” या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता भूमकर यांनी स्वागत करत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती वैशाली महाले यांनी केले तर श्रीमती विद्या कीर्दत यांनी आभार मानले.

Wachan Prerana Wachan Prerana

लेखक आपल्या भेटीला

शुक्रवार दिनांक 24 /11 /23 रोजी 'लेखक आपल्या भेटीला' हा कार्यक्रम हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत उत्साहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध लेखिका, भाषाभ्यासक व कवयित्री डॉक्टर नीलिमा गुंडी या उपस्थित होत्या. मराठीच्या जतनासाठी व संवर्धनासाठी अविरत कार्य करणाऱ्या आपल्या साहित्या निर्मिती आणि लेखनाने मराठीला समृद्ध करणार बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व पाहुणे म्हणून लाभले होते .या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली श्रीमती महाले बाई यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. 'माझे भाषा प्रेम ' या विषयावर श्रीमती नीलिमा गुंडी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या लहानपणापासूनच आई आजी यांच्या दैनंदिन बोलीभाषेतूनच म्हणी मधून आमच्यावर संस्कार झाले व भाषेतील गंमत त्यामागील गर्भित अर्थ समजायला लागले. ते त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे सांगितले . मराठी भाषेतील गंमत आपण शिकली पाहिजे त्यासाठीची मार्मिक दृष्टी आपल्याकडे यायला हवी. विविध भाषा केवळ शब्द वाचायला शिकवत नाही तर भाषा मन वाचायला शिकवते आणि त्यातूनच हळूहळू माणसही वाचायला शिकतात. शब्दाची व्युत्पत्ती शब्दाच्या विविध अर्थछटा ही भाषे ची खरी श्रीमंती आहे असा संदेश मुलींना देतानाच विविध विषयांवरील पुस्तके आपण वाचली पाहिजे त्यानेच आपण घडतो असे त्या म्हणाल्या.यावेळी दोन विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त कविता सादर केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती किर्दत, पाहुण्यांची ओळख श्रीमती महाले तर आभार श्रीमती खान यांनी मानले.

Lekhak bhet Lekhak bhet Lekhak bhet Lekhak bhet

उपक्रम: पुस्तक भेट प्रकल्पांतर्गत (रद्दीतून वर्ग ग्रंथालय)

उद्घाटक: मा.दीपा देशमुख

मा. मुख्याध्यापिका हेमलता भुमकर

मार्गदर्शक: श्रीमती घोडके, श्रीमती खान

सहभाग:-आठवी ब च्या सर्व विद्यार्थिनी

उद्दिष्टे: १)विद्यार्थिनींमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे.

२) विद्यार्थिनींना वाचनासाठी सहजासहजी पुस्तके उपलब्ध होणे.

३)विद्यार्थिनींच्या वाचन कौशल्याबरोबरच लेखन कौशल्य विकसित होणे.

४) विद्यार्थिनींमध्ये व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यास मदत करणे

विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी वर्गाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. विद्यार्थिनींनी पुस्तक देवघेव रजिस्टर तयार केले.15 ऑक्टोबर वाचन दिनानिमित्त विद्यार्थिनींनी विद्यार्थिनींसाठी तयार केलेल्या वर्ग ग्रंथालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या माननीय दीपा देशमुख व शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय भुमकर यांच्या हस्ते झाले.

Pustak bhet Pustak bhet Pustak bhet Pustak bhet

10th October - World Mental Health Day

A Pledge on 10th October - World Mental Health Day

हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधन सण साजरा

गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पेशवे तलाव व राजस सोसायटी आरोग्य कोठी येथील सफाई कामगार बंधू भगिनींना, हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती साधना घोडके आणि श्रीमती सुप्रिया मेरवाडे यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला. पुणे महानगरपालिकेतील सर्व नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यामध्ये सफाई कामगारांचा सर्वात मोठा वाटा आहे. ही जाणीव विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी व कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सफाई कामगारांनी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, वरील कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी आरोग्य निरीक्षक माननीय श्री प्रशांत कर्णे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला उपस्थित श्री. सोमनाथ गायकवाड, श्री चव्हाण, आणि इतर सर्व सफाई कामगार बंधू-भगिनींनी रक्षाबंधन उपक्रमाचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.

Rakshbandhan Rakshbandhan Rakshbandhan Rakshbandhan

इतिहास संशोधक आपल्या भेटीला

शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव पूर्तता समारंभ, तसेच क्रांती सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा सोहळ्यास 350 वर्षे या निमित्ताने, हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्र व्याख्याते, पुरातत्त्ववेत्ते, दुर्ग अभ्यासक, श्री. पांडुरंग बलकवडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भारतातील प्राचीन वैभवशाली शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, धातुशास्त्र ,वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, वेद याविषयी तसेच प्राचीन इतिहास ते आधुनिक इतिहास याविषयी अत्यंत ओघवत्या आणि रसाळ भाषेत प्रेरणादायी माहिती सांगून विद्यार्थिनींमध्ये देशाभिमान निर्माण केला व देश कार्याची प्रेरणा दिली.

history scholar meet history scholar meet

शोध माझ्या करिअरचा

8 जुलै 2023 रोजी 'शोध माझ्या करिअर चा या अभिनव उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थिनी प्रियंका जगनगडा आणि शशिकला दांगट यांनी अनुक्रमे कला क्षेत्र, शेती आणि शेतीवर आधारित व्यवसाय याबद्दल विद्यार्थिनींना माहिती सांगितली. त्याचबरोबर या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कोणती कौशल्य, कशाप्रकारे विकसित केली पाहिजे. त्याबद्दलही मार्गदर्शन केले.

shodh career cha shodh career cha

शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी

भविष्यातील महाशक्तिशाली भारत साकारण्यासाठी शालेय वयातच नेतृत्त्व, आत्मविश्वास, संस्कार व मूल्य शिक्षणाची बीजे रुजवून कर्तव्यदक्ष नागरिक घडविण्याचा प्रयत्न हुजूरपागा शाळेत सतत सुरु असतो. या शाळेत माझ्या अंगी ही मुल्ये रुजवली गेली. त्यामुळे मी यश मिळवू शकले, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी मा. श्रीमती वरदा रांजणे यांनी केले. हुजूरपागा कात्रज शाळेत शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी उपक्रम पार पडला. त्यावेळी रांजणे बोलत होत्या. या वेळी प्राथमिक विभागाच्या मंत्रिमंडळाला मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी, तर माध्यमिक विभागाच्या मंत्रिमंडळाला श्रीमती साधना घोडके यांनी शपथ दिली. यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेच्या उपाध्यक्षा मा. श्रीमती हिमानी गोखले यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या साचींव मा. श्रीमती रेखा पळशीकर, शालेय समिती अध्यक्ष व संस्थेचे सहसचिव श्री. विलास पाटील, सभासद श्री. रमाकांत सोनवणी, डॉ. सुनील जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सारिका पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्री. प्रसाद दीक्षित यांनी करून दिली. श्रीमती शांभवी सावंत यांनी आभार मानले.

swarajya-sabha swarajya-sabha

सामाजिक उपक्रम

सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी येथील मा. दादा जाधवराव विद्यालय जेजूरी येथील विद्यार्थ्यांना समाजिक प्रकल्पाच्यामाध्यमातून हुजूरपागा कात्रज शाळेतील इयत्ता ९ वी व १० वी पास झालेल्या विद्यार्थिनीची पुस्तके तसेच माजी विद्यार्थिनीहिच्याकडून मिळालेल्या वह्या आणि कात्रज येथील समाजिक कार्यकर्ते मा श्री विकासनाना फाटे यांचे कडून सॅक देण्यात आल्या. याकार्यक्रमाचे नियोजन श्री राजेंद्र मानेकर यांनी केले.

Samajik upakram
 

विविध शालेय उपक्रमांबाबत विद्यार्थिनी आणि पालकांचा अभिप्राय