शिशुमंदिर

अक्षरमेळावा

शनिवार दिनांक ४/३/२०१७ रोजी अक्षर मेळावा हा आगळावेगळा प्रकल्प आयोजित करण्यात आला होता. खेळामधून अक्षर ओळख ह्या उद्देशाने प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांचे विविध खेळ शिक्षकांनी तयार केले होते. पालकांनी अक्षर जोड्या, शब्दामध्ये अक्षर शोध, डाइस खेळ, टिपरी पाणी अशा विविध खेळामधून पाल्यासोबत आनंद घेतला.

Akshar Melava Akshar Melava Akshar Melava Akshar Melava Akshar Melava Akshar Melava

आजी आजोबा संमेलन

बुधवार दिनांक ५/४/२०१७ आजी आजोबा संमेलन आयोजित करण्यात आला होते. विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासामध्ये आजी आजोबांचा सहभाग हा मोलाचा असतो. ह्या उद्देशाने आजीआजोबा आणि नात ह्यांचे नाते दृढ करण्याचा प्रयत्न प्रकल्पाद्वारे शाळेने केला. चाफ्याचे फुल देऊन आणि अत्तराच्या सुगंधामध्ये आजीआजोबांचे स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या खेळांचा आनंद आजी आजोबांनी घेतला. तसेच भेटकार्ड तयार करून विविध संदेश देण्यात आले.

Aaji Ajoba Samalan Aaji Ajoba Samalan Aaji Ajoba Samalan Aaji Ajoba Samalan Aaji Ajoba Samalan Aaji Ajoba Samalan

गुढी पाडवा

बुधवार दिनांक २९/३/२०१७ रोजी शाळेत गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. तसेच गुढीपाड्व्याबद्दल विद्यार्थिनींना माहिती सांगण्यात आली. मुख्याध्यपिका श्रीमती उमा गोसावी ह्यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. कैरी डाळ आणि कोकम सरबत ह्याचा आस्वाद विद्यार्थींनीनी घेतला.

Gudipadava Gudipadava Gudipadava

शुभेच्छा समारंभ

छोट्या आणि शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींनी मोठ्या गटातील विद्यार्थिनींना गुरुवार दिनांक २८/३/२०१७ रोजी पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा समारंभातून शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना शिशुरंजन व छोट्या गटामधील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. भेटकार्ड तयार करून देण्यात आले. तसेच छोट्या गटातील विद्यार्थिनींनी लिंबू सरबत तयार करून मोठ्या गटातील विद्यार्थिनींना दिले.

Subhechya Samarabha Subhechya Samarabha Subhechya Samarabha Subhechya Samarabha Subhechya Samarabha Subhechya Samarabha

फुले प्रकल्प

बुधवार दिनांक २२/२/२०१७ रोजी छोट्या गटामध्ये फुल प्रकल्पांतर्गत फुलांची वेशभूषा करणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकांनी विद्यार्थिनींना अनेक प्रकारच्या फुलांच्या वेशभूषा करून पाठवले होते. तसेच विद्यार्थिनींनी तयार करून आलेल्या विशिष्ट फुलाबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थिनींना विविध फुलांबद्दल माहिती मिळावी तसेच सामान्यज्ञानात भर पडावी, सभाधीटपणा यावा ह्या उदिष्टाने फुल प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते.

Phule Prakalpa Phule Prakalpa Phule Prakalpa Phule Prakalpa Phule Prakalpa Phule Prakalpa

फळे प्रकल्प

बुधवार दिनांक ८/२/२०१७ रोजी शिशुरंजन गटामध्ये फळे प्रकल्पांतर्गत पालकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. पालकांनी विविध फळांचा वापर करून कलाकृती तयार केल्या होत्या. पालकांनी अतिशय सुंदर अशा कलाकृती सादर केल्या. तसेच प्रथम, द्वितीय असे क्रमांक काढण्यात आले. पालकसभेमध्ये पालकाना बक्षिसे सुद्धा देण्यात आली.

Phale Prakalpa Phale Prakalpa Phale Prakalpa Phale Prakalpa Phale Prakalpa Phale Prakalpa

रंग पंचमी

बुधवार दिनांक १५/३/२०१७ रोजी शाळेमध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली. सणाचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करून सण साजरा करण्यात आला होता. सर्व रंग शाळेत तयार करण्यात आले होते. बीटापासून गुलाबी रंग, हळदीपासून पिवळा रंग असे रंग तयार करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी रंग खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

Rangapanchami Rangapanchami

पालकसभा

शनिवार २५/२/२०१७ रोजी शिशुमंदिर मध्ये पालकसभा आयोजित करण्यात आली होती. मानसशास्त्रज्ञ माननीय श्री.पंकज मीठभाकरे यांनी पालकांना विविध खेळाद्वारे मार्गदर्शन केले. आनंदी पालकत्व आणि पालकविद्यार्थींनी संवाद कसा असावा ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

Palaksabha Palaksabha Palaksabha

वसंतोत्सव

शुक्रवार दिनांक ७/४/२०१७ रोजी वसंतोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींना वसंत ऋतुची माहिती सांगण्यात आली. वसंत ऋतूमध्ये येणारी फळे मातीकामातून विद्यार्थिनींनी तयार केली.तसेच वेळ, झुडूप, गवत, मोठे झाड असे विविध प्रकार विद्यार्थिनिनी चिकटकाम, ठसेकाम ह्यामधून तयार केले. आईस्क्रिम खाण्याचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला.

Wasantostaw Wasantostaw Wasantostaw Wasantostaw

फुलपाखरू उद्यान

शनिवार दिनांक ११/३/२०१७ रोजी 'कीटक' प्रकल्पांतर्गत मोठ्या गटाची सहल फुलपाखरू उद्यान, अरण्येश्वर येथे नेण्यात आली होती. विविध रंगांची फुलपाखरे, फुले विद्यार्थिनींनी बघितली. तसेच विविध फळे, मधमाशा सुद्धा बघायला मिळाल्या.

Trip Trip Trip Trip Trip Trip

शेकोटी

सोमवार दिनांक २३/१/२०१७ रोजी शाळेमध्ये शेकोटी करण्यात आली होती. विद्यार्थिनींना संध्याकाळी शाळेत बोलवण्यात आले होते. शिक्षिकांनी बालगीतांचा कार्यक्रम सादर केला. शेकोटी नंतर गरम डाळ-खिचडी आणि पापड ह्या पदार्थांचा आस्वाद घेतला.

Shekoti Shekoti Shekoti Shekoti

आबा बागुल उद्यान भेट

शुक्रवार दिनांक १०/२/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची सहल आबा बागुल उद्यानमध्ये नेण्यात आली होती. तेथील संगीत कारंजे बघण्यात विद्यार्थिनी रमून गेल्या होत्या. तसेच भीमसेन जोशी सभागृहातील नाविन्यपूर्ण हलणारी चित्रे दाखवण्यात आली.

Aaba bagul Aaba bagul Aaba bagul

संधी पक्षी निरीक्षणाची

शुक्रवार दिनांक १०/२/२०१७ रोजी 'पक्षी' प्रकल्पांतर्गत मोठ्या गटाची सहल कात्रज तलाव येथे पक्षी निरीक्षणासाठी नेण्यात आली होती. बदक, पाणकोंबडी, टिटवी, कावळे, बगळे ह्यासारखे विविध पक्षी प्रत्यक्ष पहिले. तसेच विविध पक्षांची घरटी पहायला मिळाली. विविध पक्षांचे आवाज ऐकून ते ओळखण्याचा प्रयत्न केला. तळ्याकाठी बसून विविध पक्षांची चित्रे असलेली पुस्तकेसुद्धा बघितली. खाऊ म्हणून पेरू देण्यात आला.

Trip Trip Trip Trip Trip

पाण्यातील जग

शुक्रवार दिनांक १०/२/२०१७ रोजी छोट्या गटाची सहल संभाजी पार्क मत्स्यालय येथे नेण्यात आली होती. पाण्यातील जग ह्या प्रकल्पांतर्गत ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध जातीचे मासे, पाण्यातील कासव विद्यार्थिनींनी बघितले. तसेच विविध खेळांची मजा सुद्धा लुटली.

Panyatale jag Panyatale jag Panyatale jag Panyatale jag Panyatale jag Panyatale jag

गोठा भेट

बुधवार दिनांक १/२/२०१७ रोजी शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींनी शाळेजवळ असलेल्या गोठ्याला भेट दिली. पाळीव 'प्राणी' प्रकाल्पांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. गाय, म्हैस, बैल ह्यांचे खाद्य, घ्यावयाची काळजी ह्याबद्दल माहिती विद्यार्थिनींना प्रत्यक्ष बघण्यास मिळाली.

Trip Trip Trip

शैक्षणिक प्रदर्शन

शनिवार दिनांक २१/१/२०१७ रोजी शिशुरंजन गटाचे साधनांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. आपले आपली स्वच्छता, पाळीव प्राणी, बाग, पावसाळा, हिवाळा, वाहने अशा प्रकल्पांवर आधारित साहित्यांची मांडणी करण्यात आली होती. पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन छोट्या गटाच्या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली.

Exhibition Exhibition Exhibition

मकर संक्रांत

शुक्रवार दिनांक १३/१/२०१७ रोजी शाळेमध्ये संक्रांत साजरी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी काळ्या रंगाचे पोशाख परिधान करून आल्या होत्या. शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींचे बोरन्हाण करण्यात आले. हलव्याचे दागिने विद्यार्थीनिंनी परिधान केले होते. संक्रांतीची माहिती सांगून हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. वाण म्हणून विद्यार्थीनिंनी एकमेकींना टिकल्यांचे पाकीटसुद्धा दिले. बोरं, हरभरा, गाजर, रेवडी, तीळवडी असा हिवाळी मेवा खाऊ म्हणून देण्यात आला. तिळगुळ घ्या गोड बोला असे सांगत अतिशय उत्साहात संक्रांतीचा सण पार पडला.

Sankrant Sankrant Sankrant Sankrant Sankrant Sankrant

काळा रंग दिन

शुक्रवार दिनांक १३/१/२०१७ रोजी मोठ्या गटामध्ये काळा रंगदिन साजरा करण्यात आला. इतर रंगाप्रमाणे काळ्या रंगाचे महत्व विद्यार्थिनींना समजावे ह्या दृष्टीने काळा रंगदिन साजरा करण्यात आला. सर्वांनी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.तसेच वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. कोळी ह्या किटकाचे चित्र रंगवून त्याची अंगठी तयार करून विद्यार्थिनींना देण्यात आली.

Black colour day Black colour day Black colour day

सफर भोसरी उद्यानाची

शनिवार दिनांक ७/१/२०१७ रोजी मोठ्या गटाची सहल भोसरी येथील उद्यानामध्ये नेण्यात आली होती. अनेक विविध खेळांबरोबरच फुलराणी सफरीचा आनंद विद्यार्थिनींनी घेतला. मेथीपराठा, कणकेच्या लाडूचा आस्वाद घेतला.

Trip Trip Trip Trip Trip

सफर एम्प्रेस गार्डनची

शुक्रवार दिनांक ६/१/२०१७ रोजी शिशुरंजन आणि छोट्या गटाची सहल एम्प्रेस गार्डन येथे नेण्यात आली होती. तेथे असलेल्या विविध खेळांचा आनंद विद्यार्थींनीनी घेतला. विविध पुरातन वृक्षांची माहिती जाणून घेतली. प्रत्येक वृक्षामध्ये असणारे वैविध्याचे निरीक्षण विद्यार्थिनींनी केले. सोबत मेथी पराठा, सॉस, कणकेच्या लाडूचा आस्वाद सुद्धा घेतला.

Trip Trip Trip Trip Trip

रेल्वे संग्रहालय भेट

गुरुवार दिनांक २२/१२/२०१६ रोजी 'वाहने' प्रकल्पांतर्गत छोट्या गटाची सहल रेल्वे संग्रहालय कोथरूड येथे नेण्यात आली होती. विद्यार्थिनींना आवडणा-या झुक झुक गाडीचे काम नक्की कसे चालते? ह्या बद्दल माहिती प्रत्यक्ष हलत्या प्रतिकृतीद्वारे देण्यात आली.

Railway museum Railway museum Railway museum

कला-क्रीडा सप्ताह

विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच शारीरिक विकास होण्याच्या उद्देशाने सोमवार दिनांक १९/१२/२०१६ ते गुरुवार २२/१२/२०१६ रोजी कला-क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. अडथळ्यांची शर्यत, पळणे,रचना करणे, रांगोळीमध्ये रंग भरणे, बादलीत चेंडू टाकणे, तीन पायांची शर्यत, पोत्यामधून उड्या मारणे, चित्रे रंगवणे ह्यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.

kala-krida-saptah kala-krida-saptah kala-krida-saptah kala-krida-saptah kala-krida-saptah kala-krida-saptah kala-krida-saptah kala-krida-saptah

गुलाबी रंग दिन

बुधवार दिनांक २३/११/२०१६ रोजी मोठ्या गटामध्ये गुलाबी रंग दिन साजरा करण्यात आला. विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. तसेच सर्व विद्यार्थिनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून आल्या होत्या. गुलाबी रंगाचे फुलपाखरू ड्रेसला लावण्यात आले.

Gulabi Day Gulabi Day Gulabi Day

दिवाळी

शुक्रवार दिनांक २१/१०/२०१६ रोजी शिशुमंदिर विभागात दिवाळी साजरी करण्यात आली. विद्यार्थीनींनी मातीचा किल्ला बनविला. तसेच आकाशकंदील लावून रांगोळी काढून सजावट करण्यात आली. तसेच पणत्या लावण्यात आल्या. अतिशय आकर्षक पद्धतीने रांगोळी काढून पणत्यांची सजावट करण्यात आली. विद्यार्थीनींनी फराळाच्या पदार्थांचे नाटुकले सादर केले. दिवाळीची माहिती सांगितली. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व पटवून सांगण्यासाठी नाटुकले सादर केले. विद्यार्थीनिना घरी जाताना पणती आणि पोस्टकार्ड देण्यात आले. प्रत्येक पोस्टकार्डवर विद्यार्थीनींनी चित्रे रंगवली. पोस्टकार्ड मैत्रीणीना पाठवण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारे अतिशय वेगळ्या प्रकारे दिवाळी सण साजरा करण्यात आला.

Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali

भाजी मंडई

बुधवार दिनांक १९/१०/२०१६ रोजी शाळेमध्ये भाजीमंडई भरवण्यात आली. छोट्या गटाच्या भाजी प्रकल्पांतर्गत भाजी मंडई भरवण्यात आली होती. छोट्या विद्यार्थिनी भाजीवालीचा पोषाख करून आल्या होत्या. मोठया गटामधील विद्यार्थिनी पालकांबरोबर भाजी खरेदी साठी आल्या होत्या. कांदा, बटाटा, वांगे, भेंडी, गवार ह्यासारख्या भाज्या विकण्यासाठी ठेवल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थीनींना भाजी ओळख तर झालीच. तसेच आर्थिक व्यवहार कसे चालतात ह्याबद्दल माहिती मिळाली. अतिशय उत्साहाच्या वातावरणात भाजीमंडई साजरी करण्यात आली.

Bhaji mandai Bhaji mandai Bhaji mandai Bhaji mandai Bhaji mandai Bhaji mandai

निळा रंग दिन

बुधवार १९/१०/२०१६ रोजी शिशुरंजन गटाचा निळा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी निळ्या रंगाचा पोषाख परिधान करून आल्या होत्या. तसेच विविध वस्तुसुद्धा विद्यार्थीनींनी आणल्या होत्या. विद्यार्थिनींच्या हातावर हस-या ढगाचे चित्र काढण्यात आले.

Nila ranga din Nila ranga din Nila ranga din Nila ranga din

पालकांच्या स्पर्धा

सोमवार दिनांक १९/९/२०१६ रोजी पालकांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. एकूण १९ पालकांनी सहभाग दर्शविला. स्पर्धेचे परिक्षण प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती रंजना नाईक आणि कला शिक्षिका श्रीमती गजमल यांनी केले. पालकांनी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या. रांगोळी मधून सामाजिक संदेश सुद्धा देण्यात आला होता. स्पर्धेमध्ये एकूण तीन क्रमांक काढण्यात आले. पालकसभेदिवशी बक्षिसे देऊन पालकांचे कौतुक करण्यात आले.

Palak spardha Palak spardha Palak spardha Palak spardha Palak spardha Palak spardha Palak spardha

पालकसभा

शनिवार दिनांक ८/१०/२०१६ रोजी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. पालकसभेमध्ये पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय डॉ. दुश्यंत कोठारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. पालकांच्या विविध शंकांचे निरसन डॉक्टरांनी केले. बाल्यावस्थेत आहार कसा घ्यावा, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगितली.

Palak sabha Palak sabha

चित्रकला स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कला अध्यापक महासंघ तर्फे शाळेमध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते शाळेमधील छोट्या आणि मोठ्या गटाच्या मिळून ९६ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.सहभागी विद्यार्थीनींना प्रशस्ती पत्रक देण्यात आले.

आंतरशालेय स्पर्धा

रानडे बालक मंदिर तर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धमध्ये मोठ्या गटामधील तीन विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

शैक्षणिक सहल

सोमवार दिनांक १७/१०/२०१६ रोजी शिशुरंजन गटाची सहल पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये नेण्यात आली. बाग प्रकल्पांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. बागेमधील घसरगुंडी, जंगलजीम, झोका ह्या खेळाबरोबरच मनसोक्त हिंडण्याचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला. वाहत्या पाण्यातील मासे बघून मुलीना खूप मजा वाटली. क्रीमरोल खाऊ देण्यात आला.

P L Deshpande baug trip P L Deshpande baug trip P L Deshpande baug trip P L Deshpande baug trip P L Deshpande baug trip P L Deshpande baug trip

कोजागिरी पोर्णिमा आणि पांढरा रंग दिन

शुक्रवार दिनांक १४/१०/२०१६ रोजी शाळेमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. मोठ्या गटाचा पांढरा रंग दिन सुद्धा साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी व ताई पांढरा पोशाख परिधान करून आल्या होत्या. वर्गामध्ये पांढऱ्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. चंद्राच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थीनींनी सामुहिक हस्तव्यवसायाची कृती केली. विविध चंद्राच्या कलांच्या आकारात चंदेरी कागद चिकटवण्यात आले. विद्यार्थीनींनी मसाले दुधाचा आनंद लुटला. घरी जाताना कागदाचे सशाचे पपेट भेट म्हणून देण्यात आले.

White colour day White colour day White colour day

दसरा

सोमवार दिनांक १०/१०/२०१६ रोजी दसरा सण साजरा करण्यात आला. विदयार्थीनीनी देवीचा जागर सादर केला. तसेच दसऱ्याची माहितीसुद्धा सांगितली. झाडे न तोडता फक्त दस-या च्या शुभेच्छा सर्वांना द्या हा संदेश विद्यार्थीनींना देण्यात आला. तसेच शस्त्र पूजन, सरस्वती पूजन, पाटीपूजन विद्यार्थीनीनी केले.

Dasara Dasara Dasara Dasara

शैक्षणिक सहल

शुक्रवार दिनांक ३०/९/२०१६ रोजी छोट्या गटाची सहल राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे नेण्यात आली होती. जंगली प्राणी प्रकल्पांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. वाघ, सिंह, हत्ती, काळवीट अश्या प्राण्यांचे निरीक्षण विद्यार्थीनींनी केले. क्रीमरोल खाऊ खाऊन सहलीचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला.

rajiv-gandhi-park-trip rajiv-gandhi-park-trip rajiv-gandhi-park-trip rajiv-gandhi-park-trip rajiv-gandhi-park-trip rajiv-gandhi-park-trip

स्वतःची ओळख (शिशुरंजन प्रकल्प)

शिशुरंजन गटामधील विद्यार्थिनींसाठी स्वतःची ओळख प्रकल्पांतर्गत एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थिनींच्या पालकांना शाळेमध्ये गोष्ट सांगण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. पालकांनी विविध लहान मुलांच्या गोष्टी सांगून विद्यार्थिनीची करमणूक केली.

Swatahachi Olakh Swatahachi Olakh Swatahachi Olakh Swatahachi Olakh Swatahachi Olakh Swatahachi Olakh Swatahachi Olakh Swatahachi Olakh Swatahachi Olakh

आकारदिन

सन २०१६-१७ ह्या शैक्षणिक वर्षामधील नवीन आणि आगळा वेगळा प्रकल्प म्हणजे आकार दिन. बुधवार दिनांक ५/१०/२०१६ रोजी आकार दिन साजरा करण्यात आला. शिशुरंजन गटामध्ये वर्तुळ, छोट्या गटामध्ये त्रिकोण व चौकोन, मोठ्या गटामध्ये आयत आकाराच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थीनींनी सुद्धा विविध आकाराच्या वस्तू आणल्या होत्या. प्रत्येक वर्गामध्ये आकाराशी संबंधित एक खेळ घेण्यात आला. आकाराशी संबंधित हस्तव्यवसाय कृती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थिनीची आकार हि संकल्पना दृढ होण्यास मदत झाली.

Aakar din Aakar din Aakar din Aakar din Aakar din

केशरी रंग दिन

गुरुवार दिनांक १३/१०/२०१६ रोजी छोट्या गटामध्ये केशरी रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी केशरी रंगाचा पोशाख करून आल्या होत्या. वर्गामध्ये केशरी रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थीनींना केशरी रंगाची फुलं भेट म्हणून देण्यात आली.

Orange colour day Orange colour day Orange colour day Orange colour day Orange colour day Orange colour day

शैक्षणिक प्रदर्शन (छोटा गट)

छोट्या गटामध्ये खेळाद्वारे अध्यापन करताना जी शैक्षणिक साधने शाळेमध्ये वापरली जातात त्याबद्दल पालकांना माहिती मिळावी ह्या उद्देशाने रविवार दिनांक २५/९/२०१६ रोजी शैक्षणिक प्रदर्शन भरवण्यात आले. छोट्या गटामध्ये राबवल्या जाणा-या प्रकल्पानुसार जसे वहाने, फुले, पाण्यातले प्राणी, जंगली प्राणी, घरे, फळे, भाज्या ह्यांची मांडणी करण्यात आली. प्रकल्पानुसार प्रोजेक्टरवर चित्रे दाखवण्यात आली पालकांनी प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद दिला.

Exhibition Exhibition Exhibition

भोंडला

सोमवार दिनांक ७/१०/२०१६ रोजी नवरात्री निमित्त भोंडला साजरा करण्यात आला. पारंपारिक गाणी म्हणून भोंडला साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. खिरापत म्हणून मसाले डोसा व जिलेबी विद्यार्थीनींना देण्यात आली.

Bhondla Bhondla Bhondla

वैद्यकीय तपासणी

सोमवार २९/७/२०१६ व मंगळवार ३०/७/२०१६ रोजी शिशुमंदिर विभागामध्ये सर्व विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी डॉ. सुहास शितोळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Vaidyakiy Tapasani Vaidyakiy Tapasani Vaidyakiy Tapasani Vaidyakiy Tapasani

लाल रंग दिन

बुधवार दिनांक १९/९/२०१६ रोजी शिशुरंजन गटामध्ये लाल रंग दिन साजरा करण्यात आला. वर्गात लाल रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी आणि ताई लाल रंगाचे पोशाख परिधान करून आल्या होत्या. खाऊ म्हणून लाल रंगाची चेरी देण्यात आली. विद्यार्थीनींनी हस्तव्यवसाय सामुहिक कृती केली.

Red colour day Red colour day

शिक्षक दिन

बुधवार दिनांक ७/९/२०१६ रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्राथमिक विभागातील विद्यार्थीनींनी शिक्षिकेची भूमिका पर पाडली. शिशुमंदिरमधील छोट्या विद्यार्थीनींना गाणी, गोष्टी सांगितल्या. तसेच पालक शिक्षक संघाने विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. संघाचे उपाध्यक्ष श्री. सागर खंदारे ह्यांनी सूत्रसंचालन केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचा भेटवस्तू आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पालक शिक्षक संघातर्फे शाळेला गुरु व्यासांचा फोटो भेट म्हणून दिला. तसेच अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे शाळेबद्दल पालकांमध्ये असणारा आदर अनुभवायास मिळाला.

Teachers day Teachers day Teachers day Teachers day

गणेशोत्सव

बुधवार दिनांक ७/८/२०१६ रोजी शाळेमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थीनींनी गणपती पूजेसाठी लागणारे साहित्य जसे दुर्वा, फुले, उदबत्ती आणले. दुर्वांचे महत्व विद्यार्थीनींना सांगण्यात आले. गणपती प्रतिमेची मिरवणूक पालखीमधून काढण्यात आली. शिशुरंजन च्या छोट्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थीनींनी शाळेजवळील गणपती मंदिरास भेट दिली. तेथे फुलांची रांगोळी काढली. आरती, श्लोक म्हणण्यात आले. शाळेमध्ये आल्यावर प्रसाद म्हणून उकडीचा मोदक देण्यात आला.

Ganpati Ganpati Ganpati Ganpati Ganpati Ganpati Ganpati Ganpati Ganpati Ganpati Ganpati

घरे प्रकल्प

छोट्या गटामध्ये घरे प्रकल्पांतर्गत सोमवार दिनांक २९/७/२०१६ रोजी फिल्ड ट्रीप नेण्यात आली. प्रत्यक्ष घराचे बांधकाम कसे केले जाते हे दाखवण्यासाठी शाळेजवळ चालू असणाऱ्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी विद्यार्थीनींना नेण्यात आले. त्या ठिकाणी वापरण्यात येणारे बांधकाम साहित्यसुद्धा दाखवण्यात आले. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण विद्यार्थीनींना मिळाले.

Bandhkaam prakalpa Bandhkaam prakalpa Bandhkaam prakalpa Bandhkaam prakalpa

संस्थेचा वर्धापन दिन

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन व महात्मा गांधी जयंती रविवार २/१०/२०१६ रोजी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने शुक्रवार दिनांक ३०/९ /२०१६ रोजी विद्यार्थीनींना स्वछता मोहीम राबवण्यात आली. शाळेमध्ये संस्थापकांच्या प्रतिमांची मुख्याध्यापकांच्या हस्ते पूजा करण्यात आली. संस्थेमध्ये वर्धापनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये हुजूरपागा (कात्रज) शाळेच्या शिशुमंदिर विभागातील शिक्षिका श्रीमती कीर्ती म्हसवडे ह्यांना कै. माननीय श्रीमती सिंधुताई केतकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Vardhapan Din Vardhapan Din Vardhapan Din Vardhapan Din Vardhapan Din Vardhapan Din

हिरवा रंग दिन

बुधवार दिनांक २१/९ /२०१६ रोजी छोट्या गटामध्ये हिरवा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आणि ताई हिरव्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. वर्गामध्ये हिरव्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थीनींनी ठसेकाम ही हस्तव्यवसाय सामुहिक कृती केली. कोथिंबीर भात खाण्यासाठी देण्यात आला.

Green colour day Green colour day

पानशेत सहल

शुक्रवार दिनांक २६/८/२०१६ आणि शनिवार दिनांक २७/८/२०१६ रोजी मोठ्या गटाची पाणी प्रकल्पांतर्गत गमभन प्रकाशनाचे विद्याविहार ,पानशेत येथे सहल नेण्यात आली. धरण, नदी, शेतीबद्दल कामे अशी विविध माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळावी ह्या दृष्टीकोनातून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. खडकवासला , पानशेत, वरसगाव हि धरणे विद्यार्थीनींना दाखवून माहिती सांगण्यात आली. गप्पी मासे, गांडूळ खत, खेकडा ह्याबद्दल माहिती श्री. कडू ह्यांनी विद्यार्थीनींना दिली. नांगरणी , खुरपणी , नाचणीची लागवड ह्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थीनींनी घेतला. विविध औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थीनींनी मिळवली. पोटभर जेवणासोबत वर्षाविहाराचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला.

Panshet Trip Panshet Trip Panshet Trip Panshet Trip Panshet Trip Panshet Trip Panshet Trip

गोकुळाष्टमी

बुधवार दिनांक २४/८/२०१६ रोजी शाळेमध्ये गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला साजरे करण्यात आले. कृष्णाचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. तसेच दहीहंडी साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थिनी राधा कृष्णाच्या अतिशय आकर्षक पोषाखामध्ये आल्या होत्या. प्रत्येक वर्गामध्ये दहीहंडी लावण्यात आली होती. विद्यार्थीनींना कृष्णाच्या गोष्टींची सीडी दाखवण्यात आली. विद्यार्थिनींनी टेबलवर चढून दहीहंडीमध्ये ठेवलेला शेंगदाण्याचा लाडू खाण्यास घेतला. दहीहंडी न फोडता खाऊ घेतल्याने विद्यार्थीनींना खूपच मजा वाटली. अशा प्रकारे अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने शाळेमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. दडपे पोहे खाऊ म्हणून देण्यात आले.

Gokulashtami Gokulashtami Gokulashtami Gokulashtami Gokulashtami Gokulashtami Gokulashtami Gokulashtami Gokulashtami Gokulashtami

राखीपौर्णिमा

मंगळवार दिनांक १६ /८/२०१६ रोजी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यार्थिनींनी नारळीपौर्णिमेनिमित्त कोळी नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थिनींनी नारळीपौर्णिमा आणि राखीपौर्णिमेची माहिती सांगितली. समाजामधील विविध काम करणा-या व्यक्तींबद्दल आदर निर्माण व्हावा आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती व्हावी ह्या उद्दिष्टाने शाळेमध्ये विविध व्यक्तींना निमंत्रित केले जाते. ह्यावर्षी विद्यार्थीनींना शाळेमध्ये ने-आण करणा-या रिक्षावाले काकांना बोलवण्यात आले. विद्यार्थीनींनी काकांना राख्या बांधून अशीच आमची काळजीपूर्वक ने-आण करा असे आवाहन केले. आपल्या सर्व काकांचे आभार देखील मानले.

Rakhi Pournima Rakhi Pournima Rakhi Pournima Rakhi Pournima Rakhi Pournima Rakhi Pournima Rakhi Pournima

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आला. विद्यार्थिनींना आपल्या देशाबद्दल माहिती मिळावी ह्या दृष्टीकोनातून कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे विविध पोषाख करून विद्यार्थिनी आल्या होत्या. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सानेगुरुजी ह्या थोर पुरुषांची माहिती विद्यार्थिनींनी सांगितली. तसेच विद्यार्थिनींनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या जीवनावर आधारित एक नाटुकले सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी ढोलताशांच्या तालावर अतिशय आकर्षक पद्धतीने कवायत सादर केली.

15 August 15 August 15 August 15 August 15 August 15 August 15 August

शैक्षणिक प्रदर्शन (मोठा गट)

शनिवार दिनांक ३०/७/२०१६ रोजी शिशुमंदिर मधील मोठया गटाच्या पालकांसाठी प्रदर्शन भरवण्यात आले होते. शाळेमध्ये वर्षभरामध्ये मोठया गटासाठी जे विविध प्रकल्प राबवले जातात तसेच अध्यापनासाठी शिक्षक नाविन्यपूर्ण जी साधने वापरतात त्याबद्दल पालकांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पानुसार साधनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली. पालकांसोबत विविध शाळेतील शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan

गुरुपौर्णिमा

मंगळवार दिनांक १९/७/२०१६ रोजी शिशुमंदिर विभागात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. मोठया आणि छोट्या गटातील विद्यार्थीनिंनी गुरुशिष्याच्या गोष्टी वर्गातील इतर विद्यार्थिनींना सांगितल्या. तसेच माननीय मुख्याधापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Gurupournima Gurupournima Gurupournima

नाते तुझे माझे

‘माझे कुटुंब’ या प्रकल्पांतर्गत छोट्या गटामध्ये बुधवार दिनांक २०/७/२०१६ रोजी 'नाते तुझे माझे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आई-वडिलांव्यतिरिक्त इतर नातेवाईक जसे मामा, मावशी, काका, काकू असे नातेवाईक कार्यक्रमात सहभागी झाले होते. चिकटकाम, ठसेकाम यासारख्या हस्तव्यवसाय कृती विद्यार्थिनींनी नातेवाईकांच्या सोबत अतिशय उत्साहामध्ये केल्या.

Activity for students and parents Activity for students and parents Activity for students and parents Activity for students and parents

रमजान ईद

शिशुमंदिर विभागामध्ये सर्वधर्मसमभाव ही भावना विद्यार्थिनींमध्ये रुजवली जाते. म्हणूनच इतर सणासोबत ‘रमजान ईद’ हा सण सुद्धा मंगळवार दिनांक ५/७/१६ रोजी साजरा करण्यात आला. त्यादिवशी मोठ्यागटातील विद्यार्थिनींचे पालक श्री.शेख उपस्थित होते त्यांनी विद्यार्थिनींना ‘रमजान ईद’ सणाचे महत्व सांगितले. छोट्यागटाच्या (चाफा) विद्यार्थिनींनी गाण्यावर नृत्य सादर केले. पालक श्री. शेख ह्यांचे भेटवस्तू आणि फुल देऊन आभार मानले. विद्यार्थिनींना खाऊ म्हणून शिरखुर्मा देण्यात आला.

Ramjan id Ramjan id Ramjan id

शिक्षकांसाठी उद्बोधन शिबीर

विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षिका या कायम प्रयत्नशील असतात. बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण घेऊन विकास साधण्यासाठी शिक्षकांना सुद्धा नवीन नवीन तंत्र आत्मसात करावी लागतात. त्याचा वापर रोजच्या अध्ययन पद्धतीमध्ये केला तर नक्कीच विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शिक्षकांची हीच गरज ओळखून महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेने पूर्वप्राथमिक शिक्षकांसाठी (वर्ष २०१६-१७) वर्षाच्या सुरवातीला कार्यशाळेचे आयोजन केले. गुरुवार दिनांक ९/६/२०१६ आणि शुक्रवार दिनांक १०/६/१६ रोजी हस्तकला व खेळ ह्या विषयावर श्रीमती अर्चना वाटवे व श्रीमती वासंती काळे यांनी मार्गदर्शन केले.

Teachers training Teachers training Teachers training Teachers training Teachers training Teachers training Teachers training

शाळेचा पहिला दिवस

आई, आई असे सतत म्हणत आणि सतत आईच्या मागे मागे धावत असणारी विद्यार्थीनी शाळेत प्रवेश करते. आपले कुटुंब म्हणजेच सर्व विश्व मानणाऱ्या लहान मुली आता विद्यार्थिनी म्हणून शाळेमध्ये येणार असतात. शाळा सुद्धा त्यांना आपले विश्व वाटावे ह्या दृष्टीकोनातून शाळा सतत प्रयत्नशील असते. शाळेचा पहिला दिवस हा सुखद अनुभव देणारा आणि कायम स्मरणामध्ये राहावा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम घेतले जातात.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील पहिला दिवस हा हुजूरपागेतील आगळावेगळा ठरला. छोटा गट सोमवार दिनांक १३/६/१६, मोठा गट सोमवार दिनांक २०/६/२०१६ रोजी सुरु झाला. शिशुरंजन गटाची शाळा शुक्रवार दिनांक २४/६/२००१६ रोजी सुरु झाली. पहिल्याच दिवशी नवीन गणवेश घालून विद्यार्थिनींनी पालकांसमवेत शाळेत प्रवेश केला. त्याचे स्वागत वर्गाबाहेर रांगोळी काढून करण्यात आले. वर्गामध्ये विविध चित्रे लावण्यात आली. ह्यावर्षी छोट्यागटामध्ये कार्टूनच्या पताका तयार करून लावल्या. मोठया गटामध्ये फुलांची मोबाईल चित्रे तयार करून वर्गाची सजावट केली. शिशुरंजन गटामध्ये मुलींच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मोबाईल चित्रे लावण्यात आली. सर्व गटामधील पालकांना वर्गामध्ये शाळेच्या नियमांबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच छोट्या व मोठया गटामधील मुलींना भेटवस्तू म्हणून छोटा हातरुमाल, खाऊ म्हणून काजूकंद देण्यात आला. तसेच मोठ्या गटातील विद्यार्थिनी व पालकांनी मिळून गवतीचहा, तुळस, ओवा इ. औषधी रोपे कुंड्यांमध्ये लावली. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला. घरी जाताना हातावर हसरा चेहरा काढण्यात आला. शिशुरंजन छोट्या गटामधील विद्यार्थीनींनी पालकांसोबत ठसेकाम, चिकटकाम ह्यासारख्या कृतींचा आनंद लुटला. शिशुरंजन गटाला भेटवस्तू म्हणून डबा व water-bag देण्यात आली.

First day of school First day of school First day of school Tree plantation on first day of school Activities with parents on first day of school Activities with parents on first day of school Activities with parents on first day of school First day of school with Uma Gosavi