HHCP Girls Highschool

इयत्ता
५ वी ते १० वी

माध्यम
सेमी इंग्रजी व मराठी
(Maths and Science subjects are taught in English)

There are 6 divisions each of std. 5th to 10th
Semi English : 3 divisions Marathi medium: 3 divisions

शाळेची वेळ
११ ते ४:३०

पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
गुरुवार व शनिवार शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर इतर दिवशी भेटायचे असल्यास पूर्व कल्पना द्यावी.

पालकांसाठी शालेय कचेरीची वेळ
मंगळवार व गुरुवार ११ ते २

शाळेचा पत्ता
एच.एच.सी.पी. हायस्कूल फॉर गर्ल्स, हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे – ३०

फोन नं
०२०-२४४५५८२१

ईमेल आयडी
headmistress_hhcp@yahoo.in

श्रीमती सीमा मांधाता झोडगे
B.Sc., B.Ed

शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, शारिरीक शिक्षण, संगणक, चित्रकला, शिवण, गाईड, समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण, कार्यानुभव,व्यवसाय मार्गदर्शन,गायन,आय.सी.टी.,गृहशास्त्र,एम.सी.सी.

Total students in the academic year 2014-15: 2374
Teaching staff : 59
Non-teaching staff:
21

विविध विभाग

 • भाषा
 • विज्ञान व गणित
 • सामाजिक शास्त्र
 • वनिता समाज
 • स्वराज्यसभा
 • क्रीडा विभाग
 • वैकल्पिक विषय विभाग
 • सहल विभाग
 • ग्रंथालय

हुजुरपागेच्या विद्यार्थीनिंनी पटकावली माध्यमिक शिष्यवृत्ती !!!

एच.एच.सी.पी. हायस्कूल फॉर गर्ल्स, हुजूरपागा , लक्ष्मी रोड , पुणे या प्रशालेतील इ. ८ वी च्या ५ तर इ. ५ वी च्या ३ विद्यार्थीनिनी माध्यमिक व प्राथमिक शिष्यवृत्ती मिळविण्यात यश प्राप्त केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,

इ. ८ वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१६-२०१७

शाळेतून परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थिनी : २९
पात्र ( उत्तीर्ण ) विद्यार्थिनी : २४
शेकडा निकाल : ८२.७६ %
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी : ०५

क्रमांक विद्यार्थिनीचे नाव प्राप्त गुण (३०० पैकी) राज्यातील क्रमांक
कु. आठले सिरा राहुल २४४ ७० वी
कु. पालकर निसर्गा नरेश २४२ ७८ वी
कु. शेख फिजा मुश्ताक २२२ २१३ वी
कु. दळवी दर्शना लक्ष्मण २०८ ३५१ वी
कु. जगदाळे विद्या संदीप २०६ ३७२ वी

इ. ५ वी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१६-२०१७

शाळेतून परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थिनी : ३६
पात्र ( उत्तीर्ण ) विद्यार्थिनी : ३१
शेकडा निकाल : ८६.११ %
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी : ०३

क्रमांक विद्यार्थिनीचे नाव प्राप्त गुण (३०० पैकी) राज्यातील क्रमांक
कु. काळे अवनी समीर २३२ २६० वी
कु. सप्तर्षी ऋता अमोल २३२ २६३ वी
कु. निकम क्षितिजा जिजाराम २३० २८६ वी

सर्व यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे हार्दिक अभिनंदन !!!

माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी

प्राथमिक शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी

Establishment: 2nd october 1884

First Girls’ High school in Maharashtra, second Girls’ High school in India for secondary education of Girls. (First had been established in Kolkata)

Established by the great visionary, social workers and liberal scholars like Justice Ranade, Shri. Ramkrishna Bhandarkar, Shri V.A.Modak, Shri. Pandit who realized the importance of women’s education.

Sports / Facilities

Donations / Schemes

 

इयत्ता १० वी माध्यमिक शालांत परीक्षा निकाल (२०१५ – २०१६)

१.

पुणे विभागाचा बोर्डाचा निकाल

९३.३० %

२.

शाळेचा निकाल

१०० %

३.

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनी

४३९

४.

सर्व विषयात उत्तीर्ण

४३९

५.

उतीर्णांचे शेकडा प्रमाण

१०० %

६.

९० % पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थिनी

६६

७.

विशेष गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थिनी

२४४

८.

प्रथम वर्ग मिळवलेल्या

१५३

९.

द्वितीय वर्ग मिळविलेल्या

३९

गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थिनी (२०१५ – २०१६)

 

नाव

एकूण गुण ५०० पैकी

टक्केवारी

१.

कु. ताकवले रिध्दी शंकर

४८६

९७.२०

२.

कु.कंक प्राजक्ता अरुण

४८५

९७.००

३.

कु.चोपडा साक्षी ललित

४८३

९६.६०

४.

कु.नागले मधुरा विशाल

४८३

९६.६०

५.

कु. पवळे ज्ञानेश्वरी प्रसाद

४८२

९६.४०

६.

कु. गायकवाड श्रेया सोमनाथ

४८०

९६.००

S.S.C. Board results for the last 5 years:

Sr.no. Year Result
1 1809-2010 97.84%
2 2010-2011 95.56%
3 2011-2012 99.72%
4 2012-2013 99.48%
5 2013-2014 99.49%

During the academic year 2013-14 our 55 students score more than 90% marks in S.S.C. Board exam.

डिसेंबर २०१७ | १३ वे शालेय मराठी साहित्य संमेलन

दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी हुजूरपागा प्रशालेच्या प्रांगणात १३ वे शालेय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
चिरंतन विचारांची हूजुरपागेची प्राचीन संस्कृती, प्रगल्भ विचारांनी, साहित्यांनी विद्यार्थिनींना प्रगत करण्याची परंपरा, हीच परंपरा जोपासण्यासाठी, नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी हुजूरपागा ही नेहमीच तत्पर असते.
या १३ व्या शालेय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद जेष्ठ कवी व गझलकार मा. श्री. रमण रणदिवे यांनी भूषविले. कु. याज्ञी कुलकर्णी (१० ब) हिने उपाध्यक्ष पदाचा बहुमान मिळविला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख यापासून ते आभार प्रदर्शनापर्यंतची सर्व सुत्रे विद्यार्थिनींनी लीलया पेलली.
सत्र २ मध्ये विद्यार्थिनींनी अतिशय उत्तमरित्या स्वरचित कविता, विं. दा. करंदिकरांच्या आणि नवरसांवर आधारित कविता सादर केल्या.
सत्र ३ मध्ये, हास्यकवी मा. श्री. बंडा जोशी यांच्या सुंदर विडंबन, कविता, विनोद, संवाद कौशल्यांनी रसिकांची मने जिंकली.
म. ग. ए. सोसायटीच्या विश्वस्त मा. श्रीमती जयश्रीताई बापट, अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव, संस्थेचे सभासद श्री. सोनावणे सर तसेच शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे, मा. उप. मुख्याध्यापिका श्रीमती मंगला वाघमोडे, कनिष्ठ महविद्यालयाच्या मा. उप. मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती भिडे व सर्व मा. पर्यवेक्षिका यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
अशा प्रकारे प्रशालेत १३ वे शालेय मराठी साहित्य संमेलन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले.

13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan 13th Shaley Marathi Sahitya Sammelan

जुलै २०१६ | ११ वे शालेय मराठी साहित्य संमेलन

‘ साहित्य ‘ हे सर्जनाचा अविष्कार आहे. आणि ही सर्जनशीलता माणसाला संवेदनशील व रसिक बनवते. ‘माय मराठी’ आपली अस्मिता आहे . ही अस्मिता टिकविण्यासाठी आणि फुलविण्यासाठी मराठी साहित्य संमेलन शालेय स्तरावर आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम प्रशाला गेली १० वर्षे अत्यंत उत्साहाने करत आहे.
११ व्या शालेय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद मा.श्री.अनिल अवचट (प्रथितयश लेखक, समाजसेवक) यांनी भूषविले.
दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध नाटककार मा.श्री. संजय पवार यांनी कथा, पटकथा, संवाद यांचे पदर उलगडत त्यातील बारकावे स्पष्ट केले. ‘मी सिंधुताई सपकाळ’ सिनेमाची निर्मितीकथा रंजकतेने मांडली.

तिसऱ्या सत्रात, सुप्रसिध्द बालसाहित्यिका मा.श्रीमती माधुरी पुरंदरे यांनी शालेय आठवणीना उजाळा दिला.
साहित्य संमेलनाची उपाध्यक्षा कु. स्नेहल मंजुळे (१० वी ड) होती. सूत्रसंचलनापासून ते आभार प्रदर्शनापर्यंत सर्व कामे इ ९ वीच्या विद्यार्थीनिनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारीने पर पाडली.

वरील सर्व कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन श्रीमती हेमलता भूमकर व सहप्रमुख श्रीमती कविता कांबळे यांनी मा. मुख्याध्यापिका श्रीमती अलका काकतकर व मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती स्वाती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातर्गत केले.

जुलै २०१६ | Result of English Marathon Exam State Level

English Marathon Exam State Level Winner English Marathon Exam State Level Winner

Name of the student

Marks

Rank

Prize

Ms. Lohkare Shreya Uday.

91/100

9th C

First

Trophy, certificate & Rs. 3000

Ms. Kulkarni Isha Durgaprasad

91/100

10th C

Second

Trophy, certificate & Rs. 2000

Ms. Shah Bhumika Abhay

90/100

10th C

Third

Trophy, certificate & Rs. 1000

शुक्रवार दिनांक २२ जुलै २०१६ | मा. डॉ. मनिषा खळदकर (भिडे) यांचे व्याख्यान

'स्वयम' उपग्रहास मार्गदर्शन करणाऱ्या मा. डॉ. मनिषा खळदकर (भिडे) यांचे इ. ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विज्ञान मंडळातील नवनिर्वाचित सभासदांना त्यांच्या हस्ते विज्ञान मंडळातील विविध पदांचा पदभार स्वीकारण्याबाबतचे नियुक्ती पत्रक देण्यात आले. विद्यार्थिनींनी तयार केलेले शुभेच्छा भेटकार्ड त्यांना भेट म्हणून दिले. तसेच स्वयमबाबतच्या वर्तमान पत्रतील माहितीचा तक्ता तयार केला. या कार्यक्रमास म.ग.ए संस्थेच्या सहसचिव मा. श्री. शामाताई जाधव तसेच मा. मुख्याध्यापिका श्री. स्वाती कुळकर्णी. सर्व पर्यवेक्षिका व विज्ञान शिक्षिका उपस्थित होत्या.

Science Science Science Science Science

मंगळवार दिनांक १९ जुलै २०१६ | Cosmic Energy – Lecture by Dr. Jayant Narlikar

मा.श्री. डॉ. जयंत नारळीकर सरांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञान मंडळातील विद्यार्थिनींनी भेटकार्ड बनवले व ते आयुका येथे जाऊन मा. मुख्याध्यापिकांच्या हस्ते सरांना भेट दिले. त्याचवेळी नारळीकर सरांच्या ‘cosmic energy’ या विषयावरील व्याख्यानाचा देखील विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

Result Of I-QUBE – All India Intelligence scholarship exam 2015 – 2016

Merit holders list

Name of the student

Std. & division

Percentage & rank

Scholarship amount

Antarkar Mrunal Namdeo

5th C

62.67 (25th )

Rs 300 + certificate

Patil Gayatri Vilas

6th C

80 (12th)

Rs 350 + certificate

Manere Srushti Vidyacharan

7th C

90.67 (4th)

Rs 1500 + certificate

Pokale Sakshi Subhash

8th B

93.33 (10th)

Rs 425 + certificate

Gutte Tanaya Balaji

9th C

74.63 (59th)

Rs 250 + certificate

जुलै २०१६ | स्वराज्यसभा

विद्यालये ही समाजाची प्रतिक व्हावीत ही आधुनिक शिक्षणक्षेत्रातील महत्वाची कल्पना आहे. उत्तम व सुसंस्कृत नागरिक ही समाजाची फार मोठी गरज आहे. सदाचारसंपन्न, कर्तव्यतत्पर, शिस्तप्रिय व सहिष्णूवृत्तीचा नागरिक तयार करणे हे समाजापुढे असलेले आव्हान आहे. आपल्या शाळेने हे आव्हान १९६५ सालीच स्विकारून विद्यार्थिनींसाठी स्वराज्यसभेसारख्या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ केला.
'लोकशाहीला आवश्यक असलेल्या गुणांचा व वृत्तीचा परिपोष शालेय जीवनातील संस्कारामधूनच व्हावा' हे उद्धिष्ट समोर ठेवून स्वराज्यसभा वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. उदा. वर्गप्रतिनिधी निवडणूक, शालेय मंत्रिमंडळाची स्थापना, कुलपतींची निवडणूक इ. या वर्षी ४ जुलै २०१६ रोजी शालेय वर्गप्रतिनिधींची निवडणूक झाली व यातूनच पुढे ५ जुलै २०१६ ला शालेय मंत्रिमंडळाची निवड झाली. मंगळवार दि. १२ जुलै २०१६ रोजी शालेय मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा व कुलपतींच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. श्रीमती किशोरीताई गद्रे (जिल्हाधिकारी) उपस्थित होत्या. हा कार्यक्रम शाळेच्या अमृत महोत्सव सभागृहात म.ग.ए. संस्थेच्या मा. अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई बापट, मा. सचिव व कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई पळशीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Swarajya Sabha Swarajya Sabha Swarajya Sabha Swarajya Sabha Swarajya Sabha
Samruddhi Sonar Samruddhi Sonar Samruddhi Sonar

७ ते ९ जुलै २०१६ | नेतृत्व शिबीर

गुरुवार दि. ७/७/२०१६ ते शनिवार दि. ९/७/२०१६ या कालावधीत शाळेतील प्रत्येक वर्गातील PT लीडरसाठी नेतृत्व शिबिराचे आयोजन केले गेले होते. एकूण १४४ PT लीडर यात सहभागी झाल्या होत्या. सर्व PT शिक्षकांनी मिळून विद्यार्थीनींना व्यायाम प्रकार, मास पीटी प्रकार, सहसाहित्य प्रकार इ. विषयी प्रशिक्षण दिले. तसेच आरोग्य, आहार, खेळाचे महत्व, स्वच्छता, शिस्त इ. विषयांवर चर्चा करण्यात आली.

२१ जून २०१६ | योग दिन

२१ जून २०१६ रोजी शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. इ . ७ वी च्या सर्व तुकड्यांमधील विद्यार्थीनींनी सर्व प्रकारची आसने मैदानावर केली. मा. मुख्याध्यापिका, मा. उपमुख्याध्यापिका, मा. पर्यवेक्षिका यांनी सुद्धा या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थीनींकडून वर्गातच वर्ग शिक्षकांनी प्राणायाम करून घेतले.

Yoga day 2016 Yoga day 2016 Yoga day 2016 Yoga day 2016 Yoga day 2016

मंगळवार दि. ३०/८/१६ | समाजसेवा शिबीर - इयत्ता १०वी 'ब' व 'क'

इयत्ता १०वी 'ब' व 'क' च्या १५६ विद्यार्थिनी व ९ शिक्षिका खालील ठिकाणी भेट देऊन आल्या.

 • उत्तरा पर्यावरण स्कूल – डॉ. नीलमकुमार खैरे यांचा प्रकल्प
  उत्तरा पर्यावरण स्कूल मध्ये डॉक्टर नीलमकुमार खैरे यांनी पर्यावरण पूरक केलेले ११०० प्रकल्प पाहिले. आपल्या घरातील टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी वस्तु कशा बनवता येतील व कचर्‍याची समस्या कशी कमी करता येईल या विषयी विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. प्रकल्पात ठेवलेल्या विविध वस्तु पाहून विद्यार्थिनी प्रेरित झाल्या.
 • शिक्षणग्राम – श्री. सतीश मून या पालकांचा अनाथ आश्रम
  एसटी स्टँड, सिग्नल तसेच रेलवे स्टेशनवरील अनाथ मुलांना आश्रय देणार्‍या व त्यांच्या शालेय शिक्षणापासून ते त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी घेणारे श्री. व सौ. मून यांच्या शिक्षणग्रामला विद्यार्थिनींनी भेट दिली व समाज कार्यात स्वता:ला पूर्णपणे वाहून घेतलेल्या मून दांपत्याशी मनसोक्त गप्पा मारल्या व सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा घेतली.
 • विपश्यना मनशक्तीकेंद्र, लोणावळा
  लोणावळा येथे स्थापित विपश्यना मनशक्ती केंद्राला भेट देऊन आपल्या रोजच्या धकाधकीच्या , धावपळीच्या जीवनात मन कसे शांत ठेवावे, मनाची एकाग्रता कशी साधावी या विषयी व्याख्यानचा लाभ घेतला.

वरील शिबिरांचे आयोजन प्रशालेतील समाजसेवा विभाग प्रमुख श्री. भुमकर तसेच श्री. बेलेकर सर यांनी केले होते. या शिबिरास विद्यार्थिनींसोबत प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती कुळकर्णी व पर्यवेक्षिका श्रीमती मंगल वाघमोडे सुद्धा आल्या होत्या.

Visit to Neelam Kumar Khaire's Uttara Paryavaran school Visit to Neelam Kumar Khaire's Uttara Paryavaran school Visit to anath-ashram
mehendi

शुक्रवार दि. २/९/२०१६ | मेहेंदी स्पर्धा

इयत्ता ७ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींसाठी मेहेंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक कुलातील ४ या प्रमाणे सर्व तुकड्यांमधून एकूण ९६ विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेच्या आधारे हातावर सुरेख मेहेंदी काढली. प्रत्येक इयतेतून प्रथम दोन क्रमांक काढण्यात आले.

इयत्ता प्रथम द्वितीय
७ वी कु. पूर्वा गवळी (पंकजा) कु. हर्षदा देशमुख (नीरजा)
कु. अलिशा तांबोळी (नीरजा)
८ वी कु. मणेरे सृष्टी (सरोजा) कु. सदफ मोमीन (नीरजा)
कु. साक्षी जंगम (पंकजा)
९ वी कु. प्रणोती गायकवाड (अंबुजा)
कु. भंडारे मृण्मयी (अंबुजा)
कु. चिल्लाळ कल्याणी (पंकजा)
कु. लोंढे लीना (अंबुजा)
१० वी कु. चेडे निकिता (अंबुजा)
कु. गौरी टूले (अंबुजा)
कु. हर्षाली बडदे (पंकजा)
कु. काटे वैष्णवी (सरोजा)
award winning teachers award winning teachers

शिक्षकांचा सत्कार

LIC च्या हिरक मोहोत्सवानिमित्त LIC तर्फे शिक्षकदिनाच्या दिवशी चार शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला.

 • श्रीमती नाईकनवरे मनीषा
 • श्रीमती भालेराव रेश्मा
 • श्रीमती गोडसे क्षमा
 • श्रीमती पेंढारकर केतकी

 

Some of our well-known Alumni doing extra ordinary work in different fields.

Sr.no.NameField
1Dr. Irawati KarveWriter and researcher
2Dr. Manda Khandgewriter
3Shrimati Shanta Shelkepoetess
4Shrimati Smita Talwalkaractress
5Shrimati Reema Laguactress
6Shrimati Mrunal Kulkarniactress
7Shrimati Aruna Dherewriter
8Shrimati Sanjivanji Bokilpoetess
9Shrimati Shirish Paipoetess
10Shrimati Sarojini Vaidyawriter
11Shrimati Dipti Chavdharipolitics
12Shrimati Rupali Thombre Patilpolitics
13Dr. Rohini Godboleresearcher
14Dr. Prachi Sathemedical
15Dr. Pratibha Dandvatemedical
16Dr. Kalpana Joshiresearcher
17Shrimati Sampada MehtaIAS Officer
18Shrimati Sonali PonksheIAS Officer
19Shrimati Madhurani Gokhaleactress