कात्रज उच्च माध्यामिक : वाणिज्य विभाग - मागील वर्षातील उपक्रम

<<< Back

 

२०१६ - १७ मधील विशेष उपक्रम

सहल

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील इ. ११ वी व १२ वी च्या विद्यार्थिनींची ऐच्छिक शैक्षणिक सहल सोमवार दिनाक २४/१०/२०१६ रोजी रायगड रोप वे या ठिकाणी गेली होती. वाणिज्य, कम्प्युटर टेक्नोलोजी व ऑफिस मॅनेजमेन्ट या तिन्ही विभातील मिळून एकूण ६६ विद्यार्थिनींनी या सहलीचा आनंद लुटला. प्रत्यक्ष सहलीच्या ठिकाणी विद्यार्थिंनींनी रोप वे मधून गडावर जाण्याचा व येण्याचा आनंद घेतला. रायगडावर आधारित Short Film आणि ऐतिहासिक वस्तू व फोटोचे प्रदर्शन बघितले. प्रत्यक्ष गडावर महाल, मुख्य दरवाजा, मेघडंबरी, शिवाजी महाराजांच्या दरबाराचे ठिकाण, धान्याची कोठारे, होळीचे मैदान, बाजारपेठ, हिरकणीचा बुरुज, टकमक टोक, शिवाजी महाराजांची समाधी अशी विविध ठिकाणे बघितली व त्या संबंधी गाईड कडून माहिती घेतली.

Tirp Tirp

शैक्षणिक क्षेत्रभेट

इयत्ता १२ वी वाणिज्य विभागाच्या विद्यार्थिनींची क्षेत्रभेट पारेख मेडीसेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, उरळी देवाची या ठिकाणी नेण्यात आली. या ठिकाणी आमच्या विद्यार्थिनींनी उत्पादित मालाचे वितरण प्रत्यक्ष कसे होते, औषधे, स्टेशनरी, कॉस्मेटीक्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची विक्री होण्यापूर्वी साठवणूक कशा पद्धतीने केली जाते, वितरण करताना काय काळजी घ्यावी लागते हे पहिले. व्यवस्थापन व साठवणूक कसे करतात ते बघितले.

Field Tirp Field Tirp