कात्रज उच्च माध्यामिक : व्यवसाय अभ्यासक्रम - मागील वर्षातील उपक्रम

<<< Back

२०१७ - १८ मधील विशेष उपक्रम

शैक्षणिक क्षेत्रभेट

सोमवार दिनांक ०१/०१/२०१८ रोजी आमच्या हुजूरपागा प्रशालेतील विद्यार्थिनींची शिवसाई बेवरेजेस कंपनी या ठिकाणी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीमध्ये आमच्या विद्यार्थिनींना पाणी फिल्टर मशीन च्या सहाय्याने फिल्टर करण्याची पद्धत, फिल्टर झालेल्या पाण्याच्या टेस्टिंगच्या पद्धती आणि ऑटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने पाणी कॅनमध्ये भरणे व सील करणे या विषयी माहिती मिळाली.

Educational Trip at Shiv Sai beverages Educational Trip at Shiv Sai beverages

गुरुवार दिनांक ०७/१२/२०१७ रोजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाची शैक्षणिक क्षेत्रभेट ऊरळी देवाची येथील सकाळ वृत्तपत्र प्रिंटिंग प्रेस व रीफिलर स्टोअर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सकाळ प्रिंटिंग प्रेस येथील भेटीमध्ये आमच्या विद्यार्थीनींना वृत्तपत्राचे प्रिंटिंग ऑटोमॅटिक प्रिंटिंग मशीनच्या सहाय्याने कसे केले जाते याची माहिती मिळाली. या शैक्षणिक भेटीच्या अनुषंगाने प्रिंटिंग, प्रोसेसिंग व डेव्हलपिंग यांची कार्यपद्धती व रजिस्टर, प्रेस, कलर, डेन्सिटी असे विविध प्रिंटिंग कंट्रोल्स यांचीही माहिती मिळाली. रीफिलर स्टोअर येथील भेटीमध्ये आमच्या विद्यार्थिनींना स्टोअर डिपार्टमेंट, कॅशकाउंटर, बिल डिपार्टमेंट, सिझनल डिस्काउंट, खरेदी विभाग व विक्री विभाग, व्यवस्थापन विभाग, अॅडमीन व एच. आर. विभागाचे काम या विषयी माहिती मिळाली.

Educational Trip Educational Trip Educational Trip Educational Trip Educational Trip  

इयत्ता ८ वी, ११ वी, १२ वी शैक्षणिक सहल – अॅग्री टुरिझम, बारामती

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ८ वी, ११ वी, १२ वी च्या विद्यार्थिनींची एकदिवसीय शैक्षणिक ऐच्छिक सहल सोमवार दिनांक २७/११/२०१७ रोजी अॅग्री टुरिझम, बारामती या ठिकाणी गेली होती. तीन इयत्तां मधील मिळून एकूण १४५ विद्यार्थिनींनी या सहलीचा आनंद घेतला. प्रत्यक्ष सहलीच्या ठिकाणी सर्वप्रथम मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेतले.

त्यानंतर विद्यार्थिनींनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. तेथे ऊस आल्यापासून त्याची मोजणी कशी केली जाते, त्यावर विविध प्रक्रिया करून साखर कशी तयार होते हे प्रत्यक्ष बघितले. तसेच साखर तयार करताना निर्माण होणाऱ्या मळी पासून वीजनिर्मिती कशी केली जाते, डिस्टीलरी प्रोजेक्टचे काम कसे चालते हे पाहिले. नंतर सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच बैलगाडी, ट्रॅक्टरवरच्या सफरीचा आनंद घेतला. तसेच कॉटनकिंग फॅक्टरीला भेट देऊन कापडापासून अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारा वेगवेगळ्या फॅशनचे शर्टस, पॅन्ट्स कसे तयार होतात हे बघितले.

सहलीस विद्यार्थिनींसोबत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागातील एकूण ६ शिक्षक उपस्थित होते.

Educational Trip

उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास शिबीर

हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमा अंतर्गत सोमवार दिनांक २०/११/२०१७ ते बुधवार दिनांक २२/११/२०१७ रोजी उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तिन्ही दिवसातील प्रथम सत्रात स्पोकन इंग्लिश कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून M-Communication च्या श्रीमती मुग्धा धुपकर मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी ह्या कार्यशाळेसाठी PPT (PowerPoint Presentation) द्वारे माहिती सांगितली. प्रथम दिवशी विद्यार्थिनींना Tenses चे मार्गदर्शन केले. Tenses शिकवताना त्यांनी विविध उदाहरणे दिली. तसेच विद्यार्थिनींना देखील विविध वाक्ये बनवायला सांगितली. दुसऱ्या दिवशी Dialogue घेण्यात आले व विद्यार्थिनींना आपल्या मैत्रिणींशी इंग्लिश मध्ये कसा संवाद साधावा हे प्रात्यक्षिक स्वरुपात दाखविले. तिसऱ्या दिवशी Group discussion & Speech घेण्यात आले.

दिनांक २०/११/२०१७ रोजी दुसऱ्या सत्रात स्वयंरोजगार प्रशिक्षण या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली. या उपक्रमा अंतर्गत रांगोळी तयार करणे, मेहंदी व उटणे तयार करणे, चॉकलेट बनविणे, कॅन्डल डेकोरेशन करणे, पाकिटे तयार करणे, कागदी पिशव्या बनविणे, असे कार्यक्रम घेण्यात आले व विद्यार्थिनींना स्वयंरोजगार कसा करावा ह्याची माहिती दिली गेली.

दिनांक २१/११/२०१७ रोजी दुसऱ्या सत्रात करीयर गाईडन्स चे व्याखान आयोजित केले गेले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्रीयुत हलदुले सर उपस्थित होते. या व्याखानाच्या निमित्ताने आमच्या विद्यार्थिनींना १० वी व १२ वी नंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते? तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, होमसायन्स, व्यवसाय अभ्यासक्रम, संगणक व फाईन आर्ट्स या विविध क्षेत्रातील करीयरच्या संधी या विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

दिनांक २२/११/२०१७ रोजी दुसऱ्या सत्रात पौष्टिक डबा स्पर्धा आयोजित केली गेली. ह्या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना काही सूचना दिल्या गेल्या. जसे मैद्याचे पदार्थ, ब्रेड, सॉस अश्या वस्तूंचा वापर न करता पौष्टिक पदार्थ बनवून आणावेत. विद्यार्थिनींनी गाजराचा हलवा, बीटाचे लाडू, कडधान्याची भेळ, मेथी व पालक पराठा, असे अनेक पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते.

Career Guidance Healthy Food Spoken English Self-employment

पगारपत्रक तयार करणे

बुधवार दिनांक ०८/११/२०१७ रोजी हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातर्फे “पगारपत्रक तयार करणे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी श्रीयुत हेमंत खळदकर सर व श्रीयुत कृष्णा पायघन सर यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीयुत खळदकर सरांनी Payroll Management Software System या विषयी माहिती सांगितली. एक्सेल च्या सहाय्याने पगारपत्रक तयार करताना आवश्यक गोष्टी म्हणजेच किमान वेतन, रजा, बेसिक पगार, DA, HRA, Professional tax, Income tax, Provident fund, ESI, TDS, Net pay विषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच यांचे Calculation कसे करावे या विषयी माहिती सांगितली.

श्रीयुत पायघन सर यांनी पगारपत्रक करताना आवश्यक व महत्वाच्या गोष्टी म्हणजेच वेतन आयोग, महागाई भत्ता, पगाराचा स्केल, Increment Conveyance, Medical, Telephone allowance आणि Provident Fund, PPF यांचे Calculation करताना आवश्यक सरकारी व व्यावसायिक अटी व नियम यांची उत्कृष्ट माहिती सांगितली. विद्यार्थिनींनीच्या सर्व शंकांचे निरसन पायघन सर व खळदकर सर यांनी केले.

Payroll Management Payroll Management

ऑन द जॉब ट्रेनिंग

शनिवार दिनांक १५/०४/२०१७ ते शनिवार २०/०५/२०१७ या कालावधीत आमच्या विद्यार्थिनींनी “ऑन द जॉब ट्रेनिंग” पूर्ण केले. आमच्या विद्यार्थिनींनी खालील ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला.

1) सोहम कम्प्युटर इन्स्टिट्यूट – धनकवडी व गोकुळनगर शाखा
2) श्री लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था - बिबवेवाडी
3) यंत्रनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था – कात्रज
4) श्री शारदा सहकारी बँक बिबवेवाडी व गोकुळनगर शाखा

सोहम कम्प्युटर इन्स्टिट्यूट येथ विद्यार्थिनींनी MS CIT या कोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या Knowledge Kit and ERA या साधनांचा उपयोग करून प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी मदत केली. इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करताना आवश्यक मदत केली. इन्स्टिट्यूट मधील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मदत केली. Attendance register मध्ये नोंदी केल्या. इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांच्या रजिस्टर मध्ये नोंदी करणे. आवश्यक डॉक्युमेंट्स प्रिंटींग व स्कॅनिंग करणे यासारख्या कामांचा अनुभव घेतला. श्री लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था येथ कर्जाच्या नोंदी करणे, पिग्मी सॉफ्टवेअरचा उपयोग करणे, कर्जाची कागदपत्रे फाईल करणे. संगणकामध्ये व्हाऊचर एंट्रीज करणे या कामांचा अनुभव घेतला. यंत्रनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था येथे कर्जाच्या नोंदी करणे, पतसंस्थेच्या पिग्मी विभागातील entries करणे. पतसंस्थेत नवीन अकौऊंट उघडण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म भरण्यास मदत करणे अशी कामे केली. श्री शारदा सहकारी बँक येथे विद्यार्थिनींना खालील विषयांची माहिती व प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला. Operation of different accounts, KYC forms, Cheque clearing, cash transfer, demand draft form, loan, fixed deposit, E-payment, E-banking, IFSC code, RTGS, withdrawal slip, deposit slip . विद्यार्थिनींनी चेक स्कॅन करणे, लॉकर रजिस्टर भरणे, पैसे भरणा पावती व पैसे काढण्याची पावती भरताना खातेदारांना मदत करणे अशी विविध कामे केली. अशा विविध प्रकारच्या कामाचा अनुभव “ऑन द जॉब ट्रेनिंग” या कार्यशाळेच्या निमित्ताने आमच्या विद्यार्थिनींना मिळाला.

On the job training On the job training

२०१६ - १७ मधील विशेष उपक्रम

सहल

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मधील इ. ११ वी व १२ वी च्या विद्यार्थिनींची ऐच्छिक शैक्षणिक सहल सोमवार दिनांक २४/१०/२०१६ रोजी रायगड रोप वे या ठिकाणी गेली होती. वाणिज्य, कम्प्युटर टेक्नॉलॉजी व ऑफिस मॅनेजमेंट या तिन्ही विभागातील मिळून एकूण ६६ विद्यार्थिनींनी या सहलीचा आनंद लुटला. प्रत्यक्ष सहलीच्या ठिकाणी विद्यार्थिंनींनी रोप वे मधून गडावर जाण्याचा व येण्याचा आनंद घेतला. रायगडावर आधारित Short Film आणि ऐतिहासिक वस्तू व फोटोचे प्रदर्शन बघितले. प्रत्यक्ष गडावर महाल, मुख्य दरवाजा, मेघडंबरी, शिवाजी महाराजांच्या दरबाराचे ठिकाण, धान्याची कोठारे, होळीचे मैदान, बाजारपेठ, हिरकणीचा बुरुज, टकमक टोक, शिवाजी महाराजांची समाधी अशी विविध ठिकाणे बघितली व त्या संबंधी गाईड कडून माहिती घेतली.

Trip Trip

ऑन द जॉब ट्रेनिंग (प्रत्यक्ष कामाचा अनुभव)

हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक व्यवसायिक अभ्यासक्रमातील ऑफीस मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनींनी दि .२० एप्रिंल २०१६ ते २८ मे २०१६ या काळात श्री शारदा सहकारी बँक यांच्या सातारा रोड व कात्रज कोंढवा रोड या शाखेत “ऑन द जॉब ट्रेनिंग” म्हणजेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी खालील विषयाबाबत सविस्तर माहिती घेतली. Operate different accounts, KYC form, cheque clearing, cash transfer, demand draft form, loan, fixed Deposit, E-payment, Locker system, RTGS, fill withdrawal slip, deposit slip. तसेच खालील प्रमाणे प्रत्यक्षात काम केले व बँकेतील खातेदारांना मदत करणे, Account opening form भरणे, outward clearing चे चेक जमा करणे, पैसे भरणा पावती व पैसे काढण्याची पावती, चेक स्कॅन करणे, चेक बुकवर शिक्के मारणे, debit dedebit/credit card bit चे काम पाहणे, Locker register भरणे. हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक व्यवसायिक अभ्यासक्रमातील कम्प्युटर टेक्नाॅलॉजीच्या विद्यार्थिनींनी दि .२० एप्रिंल २०१६ ते २८ मे २०१६ या काळात सोहम कम्प्युटर इन्स्टीटयूट यांच्या धनकवडी व कात्रज कोंढवा रोड या शाखेत “ऑन द जॉब ट्रेनिंग” म्हणजेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनीनी खालील प्रकारचे काम केले. MS-CIT करणाऱ्या विद्यार्थ्यांना व जेष्ठ महिलांना प्रात्यक्षिक करताना मदत करणे. MS-CIT करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन फॉर्म भरणे. डॉक्युमेंट स्कॅनिंग व प्रिंटींग करणे. Knowledge Kit and ERA या सॉफ्टवेअर चा वापर करून उत्तरे सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे. इन्स्टीटयूट मधल्या आवश्यक रजिस्टर मध्ये नोंदी करणे.

Email आयडी तयार करणे

बुधवार दि.०७/०९/२०१६ ते गुरुवार ०८/०९/२०१६ रोजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातर्फे इ.११ वी कॉम्प्युटर टेक्नोलॉजी व ऑफिस मॅनेजमेंट मधील विद्यार्थिनींसाठी ई-मेल आयडी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थीनिंना खालील गोष्टींची माहिती देण्यात आली.

Computer Assembling

शुक्रवार दिनांक २६/०८/२०१६ रोजी संगणक तज्ञ श्रीयुत हेमंत खळदकर यांनी आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनींना "Computer Assembling" या विषयावर माहिती सांगितली. संगणकाचा महत्वाचे भाग म्हणजेच सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट व मदरबोर्ड या विषयी प्रेझेन्टेशनच्या सहाय्याने मार्गदर्शन केले. मदरबोर्ड कसा असतो ? त्याला कोणकोणते डिव्हाईस कोणत्या प्रकारे जोडलेले असतात यांचे प्रात्यक्षिक दाखविले.प्रोसेसर किंवा चीप कशी असते? ती मदरबोर्डवर कोणत्या टिकाणी सेट केली जाते व त्याचे कार्य कसे चालते या विषयी माहिती सांगितली. मदरबोर्डला विविध डिव्हाईस जोडण्यासाठी वापरण्यात येणारे Ports, cables व त्यांचे प्रकार जसे Serial Port, Parallel Port, USB Port, Coaxial cable, Twisted pair cable, RJ45 connectors या विषयी माहिती सांगितली. सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट मधील पॉवर सप्लाय युनिट, हार्ड डिस्क, वेगवेगळ्या प्रकारची सॉकेट यांचे काम कसे चालते या विषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

करिअर गायडन्स

मंगळवार दिनांक २५/१०/२०१६ रोजी हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातर्फे “करिअर गायडन्स" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी श्रीयुत गुरुराज गर्दे सर यांचे मार्गदर्शन लाभले. समुपदेशक व समुपदेशन या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे आईद्वारे लहान मुलाला केले जाणारे समुपदेशन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. करिअर म्हणजे काय ? करिअर हे जन्मापासून सुरु होऊन मरेपर्यंत चालते. चांगल्या जगण्याच्या प्रयत्नाला करिअर म्हणतात. कोणते करिअर निवडावे या विषयी सरांनी आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. Traditional carrier & Modern Carrier यांची माहिती आमच्या विद्यार्थीनींना दिली ज्या विद्यार्थीनीला १००% गुण हवे आहेत त्यांनी १००% पेपर न सोडवता १२०% पेपर सोडवावा. आ=आत्मविश्वास, ई=इच्छाशक्ती, स=सकारात्मकता, क्रि=क्रियाशीलता, म=महत्वकांक्षा या आईस्क्रीमची चव प्रत्येक विद्यार्थिनींनी अनुभवणे आवश्यक आहे. विद्यार्थिनीनी वेळापत्रक तयार करून अवघड युनिट्स, प्रक्टिस पेपर सोडविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थिनींनी जिद्द बाळगून मनापासून अभ्यास केला पाहिजे.

श्री शारदा सहकारी बँक

सोमवार दिनांक ४ जुलै २०१६ रोजी व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या विद्यार्थिनींंसाठी श्री शारदा सहकारी बँक कात्रज कोंढवा रोड शाखेत शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. बँकेचे शाखाधिकारी श्रीयुत शिर्के यांनी बँकेचे कामकाज, वार्षिक सभा, सभेचे विषय, सभासदांची निवड या विषयी माहिती दिली. बँकेत कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांनी बँक खात्यांचे विविध प्रकार, Bill of Exchange, Endorsement, Loan, Bank Reconciliation Statement, NEFT, RTGS, Locker System या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट केल्या. बँकेतील सुरक्षेविषयी घेतल्या जाणाऱ्या काळजी विषयी माहिती सांगितली. cheque clearing मशिनच्या सहाय्याने कसे केले जाते, तसेच ATM मशीनचे कार्य ATM Card वापरताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती सांगितली.

दै. सकाळ वृत्तपत्र समूहाचे कार्यालय

शुक्रवार दिनांक १८/११/२०१६ रोजी शैक्षणिक भेट दै.सकाळ वृत्तपत्र समूहाचे कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक भेटीसाठी दै सकाळचे कार्यकारी व्यवस्थापक श्रीयुत राम शेळके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वृत्तपत्राचे काम कसे चालते?, वृत्तपत्रातील माहितीचे व बातम्यांचे संकलन, त्यानंतर होणारी छपाई व सामान्य जनते पर्यंत वृत्तपत्र पोचण्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती दिली. सकाळ वृत्तपत्राच्या कार्यालयात कार्यरत असणारे संपादकीय, जाहिरात व वितरण या विभागांच्या कामाविषयी माहिती सांगितली. वृत्तपत्रातील प्रत्येक पानांची मांडणी करण्यासाठी आवश्यक असणारे Indesign हे सॉफ्टवेअर वापरून पानांची मांडणी कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दाखविले. वृत्तपत्राची मांडणी, छापाई ते ग्राहकांपर्यंत वितरीत होण्यासाठी व्यवस्थापन कसे केले जाते याची माहिती दिली. व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे Planning, Team work, Network, Time Management या विषयी माहिती दिली. विद्यार्थिनींना भविष्यात करियर निवडताना कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात जसे रोजच्या पेपर मधील जगातील विविध घडामोडींची माहिती घेणे, अग्रलेख वाचणे व त्याविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. विविध विषयावर किंवा परिसरातील समस्येविषयी लेखन करणे आवश्यक आहे.चांगल्या विचारांचे लेखन सकाळमध्ये दिल्यास ते नक्की छापले जाईल असे आश्वासन आमच्या विद्यार्थिनींना दिले.

यशोदा प्रिंटींग प्रेस

शुक्रवार दिनांक १८/११/२०१६ रोजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची शैक्षणिक भेट यशोदा प्रिंटींग प्रेस येथे आयोजित केली होती. या भेटीमध्ये यशोदा प्रिंटींग प्रेसचे श्रीयुत भडाळे यांनी आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. DTP चे काम कसे चालते या विषयी माहिती दिली. सर्वप्रथम कामाचे नियोजन करावे लागते यामध्ये designing चे काम महत्वाचे असते. coral draw व photoshop या सारखी पिक्चर एडीटिंग software designing साठी वापरली जातात. आवश्यक असणारी पिक्चर्स व इमेज इंटरनेटच्या सहाय्याने डाउनलोड करून वापरता येतात. पिक्चर घेतल्यानंतर त्यातील RGB कलर मोड चे रुपांतर CMYK या कलर मोड मध्ये करणे प्रिंटींग साठी आवश्यक आवश्यक असते. Designing चे काम पूर्ण झाल्यावर प्रिंटींग चे काम सुरु होते. यासाठी ऑफसेट प्रिंटरचा वापर केला जातो. विद्यार्थिनींना ऑफसेट प्रिंटर, कटिंग मशिन, कलर प्लेटस या प्रिंटींग साठी आवश्यक गोष्टी पाहायला मिळाल्या.