रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा - शालेय उपक्रम

<<< Back to WRP paranjape primary school page

शालेय उपक्रम २०१७ - १८

२७ फेब्रुवारी २०१८ | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धा

२७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त आपल्या रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध शाळांमधील १०५ मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मुलांसाठी कवितेचा विषय त्यांच्या भावविश्वातील त्यांना आवडणारी कविता त्याचे वाचन करायचे होते. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन होऊन स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मा. श्रीमती अपर्णा निरगुडे बाई, श्रीमती जोगळेकर बाई, श्रीमती ठाकूर बाई, श्रीमती साळुंखे बाई यांना बोलाविले होते. स्पर्धा संपल्यावर लगेचच बक्षीस समारंभ झाला. यशस्वी स्पर्धकांना परिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

Kavyawachan Spardha Kavyawachan Spardha Kavyawachan Spardha Kavyawachan Spardha

जानेवारी २०१८ । क्रीडा स्पर्धा

सोमवार दि. ८/१/२०१८ ते गुरुवार दि. ११/१/२०१८ या काळात आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. सोमवार दि. ८/१/२०१८ या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर आसने, सूर्यनमस्कार, साधन कवायते, एरोबिक्स, पिरॅमिड, लेझीम ही प्रात्याक्षिके सादर केली. इ. १ ली ते ४ थीच्या मुलींच्या सांघिक व वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. चेंडू पास, रिले, लंगडी, चकवा चेंडू या सांघिक स्पर्धा व धावणे, अडथळ्याची शर्यत, लंगडी, चेंडूफेक अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही चेंडूपास, भरभर चालणे, चेंडू फेक या स्पर्धा घेण्यात आल्या.

Krida Spardha Krida Spardha

नोव्हेंबर २०१७ | सहल

शाळा हे उपक्रमांचे मोहोळ असते, असे शिक्षणतज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे मत. खरंच शाळेत अनेक विविधांगी वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रमांची रेलचेलच असते. या सर्व उपक्रमांत सर्वांचा आवडता उपक्रम म्हणजे “शैक्षणिक सहल”. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थिनींनी वर्गमैत्रिणीं बरोबर वेगवेगळ्या सहलींचा आनंद लुटला. इ. पहिलीची सहल बुधवार दि. २२ नोव्हेंबर रोजी 'नरेंद्र मुंदडाजी कि वाडी' या ठिकाणास भेट देण्यास गेली होती. येथे मुलींनी अस्सल गावरान मेनूचा आस्वाद घेत शेतीला भेट दिली. तर काही शूर मुलींनी सर्पमित्रांबरोबर सापही अंगावर घेतले.
इ. दुसरीची सहल मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी खेड शिवापूर येथील "माउंटमाची" येथे गेली. येथे मुलींनी विविध खेळांचा, झाडांवरील घरांचा तसेच नयनरम्य दृश्यांचा आनंद घेतला.
इयत्ता तिसरीची सहल सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी "चोखी दाणी" येथे जाऊन आली. राजस्थानी जेवण, घोडागाडीची सफर, मातीची भांडी, राजस्थानी नृत्य, जादुगार याचा आनंद लुटला.
इयत्ता चौथीची सहल गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी "प्रथमेश रिसोर्ट" येथे जाऊन आली. येथील अनेक साहसी खेळांचा जसे रोप वे, वॉल क्लायबिंग अशा खेळांचा अनुभव घेतला.

Sahal Sahal Sahal Sahal Sahal

१५ नोव्हेंबर २०१७ | बालदिन

१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. पंडित नेहरूंना मुले खूप आवडत म्हणून त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
यावर्षीही आपण आपल्या शाळेत बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला. सर्व मुली आवडीचा पोशाख घालून आल्या. फुग्यांनी शाळेची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. शाळेच्या ऑफिसबाहेर पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. त्यांच्या विषयीची पुस्तके मांडण्यात आली व माहिती सांगण्यात आली. या दिवशी अभ्यासाला सुट्टी देऊन सर्व विद्यार्थिनींनी वर्गावर्गातून विविध मनोरंजक खेळाचा व खाऊचा आस्वाद घेतला.

Baldin Baldin Baldin Baldin

१४ ऑक्टोबर २०१७ | दिवाळी

आली आली दीपावली जिची पाहात होते वाट |
आनंदाचे तरंग सर्वत्र पसरली उत्साहाची लाट ||
खरोखरच दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, सौख्य, समृद्धी आणि चैतन्याचा उत्सव.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शनिवार दि. १४ ऑक्टोबर २०१७ रोजी शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. सर्व मुली आवडीचा पोशाख करून नटून थटून शाळेत आल्या होत्या. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच इतिहासाची साक्ष देणारा किल्ला बनवण्यात आला होता. सुंदर फलकलेखन करण्यात आले होते. सर्व मुलींनी पणत्या आणून शाळेत दीपोत्सव साजरा केला. सर्वत्र विलोभनीय दृश्य होते. मा. मुख्याध्यापिका श्रीमती जक्कल बाई व सर्व शिक्षक, मुलींनी आनंदाने दिवाळी साजरी केली. शाळेकडून मुलींना दिवाळी भेट म्हणून लाडू, चिवडा व एक लहान आकाशकंदील देण्यात आला.
अशाप्रकारे उत्साहाने व आनंददायी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.

Diwali Diwali Diwali Diwali

२ ऑक्टोबर २०१७ | संस्थेच्या वर्धापनदिनी हुजूरपागेने रोवली डिजिटल शाळेची मुहूर्तमेढ

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचा १३३ वा वर्धापन दिन २ ऑक्टोबर २०१७ रोजी साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आपल्या प्राथमिक शाळेने शिक्षण पद्धतीतील आधुनिक क्रांती स्विकारत डिजिटल शाळेचे स्वप्न पाहिले व अल्पावधीतच ते पूर्ण केले. यावेळी इ. पहिली ते चौथीचे सर्व वर्ग अपग्रेड करताना २ वर्ग डिजिटल केले तर एक वर्ग 'Tab Lab (टॅब लॅब)' तयार करण्यात आला. या दिवशी तीनही वर्गांचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यापुढे आता विद्यार्थिनी अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यावर आधारीत व्हिडीओ पाहतील व पाठाशी संबंधित खेळही टॅबवर खेळतील.
या डिजिटल शाळेच्या संकल्पनेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षकवर्गाने हि संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी मोलाची जबाबदारी उचलली.

Digital shala Digital shala Digital shala Digital shala Digital shala

२३ सप्टेंबर २०१७ | भोंडला

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा |
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारव घुमतय पारावरी ||
शनिवार दि. २३ सप्टेंबर २०१७ रोजी शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला साजरा करण्यात आला. इ. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात नटून थटून आल्या होत्या. शाळेच्या प्रांगणात हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या प्रतिमेभोवती फेर धरून मुलींनी भोंडल्याची पारंपारिक गाणीही म्हटली. भोंडल्याची खिरापत ओळखून मुलींना खिरापत देण्यात आली.
इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी या भोंडल्याचा मनसोक्त आनंद घेतला.

Bhondala Bhondala Bhondala

९ सप्टेंबर २०१७ | विद्यार्थिनी दिन

नव्याच वाटा शोधू आम्ही,
नवेच रस्ते घडवू आम्ही |
नव्या दिशा अन् नव्याच आशा,
नव्या युगाच्या आम्ही मुली,
मुली आम्ही..........||
शनिवार दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी शाळेच्या परंपरेनुसार शिक्षकदिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी दिन साजरा करण्यात आला. यावेळी इ. चौथीच्या विद्यार्थिनींनी शाळेचा पूर्ण दिवसाचा कारभार व्यवस्थित सांभाळला. मुख्याध्यापिकेंपासून शिपायांपर्यंतची सर्व कामे मुलींनी स्वतः उत्साहाने केली. वर्गा वर्गांतून शिकविण्याचा अनुभवही घेतला.
दरवर्षी देण्यात येणारा सेवा ज्येष्ठतेचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुषमा वैद्य यांना देण्यात आला.

Vidyarthini din Vidyarthini din Vidyarthini din

१९ ऑगस्ट २०१७ | हुजूरपागेत गोविंदांनी फोडली पुस्तकहंडी

शनिवार दि. १९ ऑगस्ट १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत छोट्या गोविंदांनी उत्साहात पुस्तकहंडी साजरी केली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनी राधा - कृष्णाच्या पोशाखात नटून आल्या होत्या. गोविंदा बनलेल्या इयत्ता चौथीच्या मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे मानवी मनोरे रचले होते. प्रत्येक वर्गाच्या हंडीमध्ये पटसंख्येप्रमाणे कार्डशीटच्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. हंडी फोडल्यानंतर ज्या क्रमांकाची चिट्ठी मिळेल त्या क्रमांकाचे पुस्तक मुलींना प्रसाद म्हणून देण्यात आले. अशाप्रकारे ही दहीहंडी उत्साहात साजरी झाली.

pustak handi pustak handi pustak handi

१५ ऑगस्ट २०१७ | स्वातंत्र्यदिन

दि. ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट शाळेत ‘क्रांती सप्ताह’ साजरा करण्यात आला. यावेळी शालेय परिपाठामध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावरील आधारीत माहिती व गोष्टी सांगण्यात आल्या. तसेच क्रांतिदिन सप्ताहानिमित्त सानेगुरुजी कथामालेच्या सदस्य श्रीमती. सुषमा इनामदार यांनीही शालेय परिपाठामध्ये क्रांतीकारकांची गोष्ट सांगितली.
मंगळवार दि. १५ ऑगस्ट १७ रोजी शाळेत ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शाळा रांगोळी व क्रांतिकारकांच्या फोटोंनी सजली होती. इ. पहिली ते चौथीच्या सर्व मुली सकाळी ७.४५ वाजता शाळेत हजर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सोनावणी सर उपस्थित होते. मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्यावर समूहगीत व नृत्य सादर केले. असा हा राष्ट्रीय सण आनंदात साजरा करण्यात आला.

15 august 15 august 15 august

११ ऑगस्ट २०१७ | श्रावणी शुक्रवार

शुक्रवार दि. ११ ऑगस्ट १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागेत श्रावणी शुक्रवार निमित्त हळदी - कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात हजर होत्या.
या कार्यक्रमात श्रीमती मुजुमले बाई यांनी या सणाचे महत्त्व सांगणारी पारंपारिक गोष्ट सांगितली. भजन, देवीचा गजर तसेच श्रीलक्ष्मी देवीची आरती इ. गोष्टींनी कार्यक्रम सजलेला होता. सर्वात शेवटी मुलींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांनी केले.

Shravani-shukrawar Shravani-shukrawar

०९ ऑगस्ट २०१७ | हुजूरपागेत आगळीवेगळी रक्षाबंधन

बुधवार दि. ०९ ऑगस्ट रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेच्या विद्यार्थिनींनी एका आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाचा आनंद घेतला. इ. ४ थी च्या मुलींनी स्वतः राख्या तयार केल्या. तसेच काही शिक्षक, मुख्याध्यापिका व मुलींनी विश्रामबाग पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील पोलीस बांधवांना राख्या बांधून औक्षण केले. तसेच त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. मग या पोलीसदादांनीही चिमुकल्या बहिणींना ओवाळणी म्हणून खाऊ दिला. मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या उपक्रमातून बालवयातच संस्कारांचे व मूल्यांचे धडे मिळतात तसेच पोलिसांबद्दल असलेली भीती नाहीशी होऊन आदर निर्माण होण्यास मदत होते.

rakshabandhan rakshabandhan rakshabandhan rakshabandhan

०१ ऑगस्ट २०१७ | बालसभा

मंगळवार दि. १ ऑगस्ट १७ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत बालसभा आयोजित करण्यात आली. हुजूरपागा माध्यमिक विभागातून इ. ९ वी तील विद्यार्थिनी कु. अंकिता अलगुडे हिला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले. या कार्यक्रमात लोकमान्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इ. ४ थी तील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच काही मुलींनी टिळकांच्या जीवनावर आधारीत गोष्टी सांगितल्या. मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Bal Sabha Bal Sabha Bal Sabha Bal Sabha

२६ जुलै २०१७ | हुजूरपागेत रंगला मेंदी महोत्सव

“श्रावण महिना म्हणजे सणांची लयलूट, या महिन्यातील पहिलाच सण नागपंचमी” बुधवार दि. २६ जुलै १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत नागपंचमी निमित्त आयोजित मेंदी महोत्सवात शिक्षक, पालक व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तसेच मेंदी काढण्याचा व काढून घेण्याचा आनंद लुटला. या सणानिमित्त माता-पालक संघ, पालक संघ तसेच शिक्षकांचीही मेंदी स्पर्धा घेण्यात आली. शिक्षक व पालकांनी यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला तसेच इ. पहिली व दुसरीच्या मुलींच्या हातावर पालकांनी मेंदी काढली व इ. तिसरी व चौथीच्या मुलींनी एकमेकींच्या हातावर मेंदी काढली. अशाप्रकारे शाळेत उत्साही वातावरणात नागपंचमी निमित्त मेंदी महोत्सव साजरा करण्यात आला.

Nagpanchami Nagpanchami Nagpanchami

२२ जुलै २०१७ | दीप पूजन

शनिवार दि. २२ जुलै १७ रोजी प्राथमिक शाळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मा. मुख्या. श्रीमती साधना जक्कल तसेच सेवाज्येष्ठ शिक्षकांनी दिव्यांची पूजा केली. या दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना माईक वरून सांगण्यात आले. यांसारखे पारंपारिक सण शाळेत नेहमीच उत्साहाने साजरे करण्यात येतात.

Deep Pujan Deep Pujan Deep Pujan

१ जुलै २०१७ | वृक्षारोपण

शनिवार दि. १ जुलै २०१७ रोजी वृक्षदिनाचे औचित्य साधून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल, सेवाज्येष्ठ शिक्षिका तसेच विद्यार्थिनींच्या समवेत शालेय परिसरात वृक्षारोपण केले. विविध प्रकारची औषधी झाडे व फुलझाडे शाळेच्या प्रांगणात लावण्यात आली.

vruksharopan vruksharopan vruksharopan

२७ जून २०१७ | रमजान ईद

मंगळवार दि. २७ जून २०१७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत रमजान ईदचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. श्री. अन्वर राजन सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना ईद विषयी माहिती दिली. आपले मुस्लिम धर्मी बांधव पालक देखील उपस्थित होते. विद्यार्थिनींनी मुलाखतीद्वारे पालकांना व प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारून रमजान सणाची माहिती जाणून घेतली.

Eid Eid Eid Eid

२४ जून २०१७ | हुजूरपागा झाली पंढरीमय

शनिवार दिनांक २४ जून रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींनी पालखी सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. सकाळपासून शाळेत विठ्ठलाच्या नामगजरात वातावरण पांडुरंगमय झाले होते. बऱ्याच मुली ज्ञानेश्वर, तुकाराम व वारकऱ्यांच्या वेशात आल्या होत्या. तसेच काही जणींनी वृंदावन, झेंडे अशा पारंपारिक वेशात तर वृक्ष दिंडी, स्वच्छता दिंडी अशा विविध आधुनिक दिंड्यांसह सामाजिक संदेश देत पालखी लक्ष्मी रोड वरून शाळेच्या परिसरात आली. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांसह नामगजरात रिक्षावाले काकाही सहभागी झाले होते.

Palakhi Palakhi Palakhi Palakhi Palakhi

२१ जून २०१७ | आंतरराष्ट्रीय योग दिन

दिनांक २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून हुजूरपागा प्राथमिक शाळेतील सुमारे ८७० विद्यार्थिनींनी विविध आसन प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून आनंद घेतला. तसेच या दिनाचे औचित्य साधून मुलींनी नियमित योगासने करण्याचे आश्वासनही दिले. तसेच नियमित योगासने करण्याचे फायदेही सांगण्यात आले. कार्यक्रमाची सांगता ओमकारानेकरण्यात आली. मा. मुख्याध्यापिका श्रीम. साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Yog Din Yog Din Yog Din Yog Din

१५ जून २०१७ | नवागतांचे स्वागत

१५ जून २०१७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत सर्व बालचमुंचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. सर्व पहिलीच्या विद्यार्थिनींना हसरे फुगे देण्यात आले. सर्व शिक्षकांनी विविध प्रकारे गोष्टी सांगून, नाट्यीकरणाने पहिला दिवस साजरा केला. तसेच पहिल्या दिवशी मुलींना पाठ्यपुस्तकांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. अशा आनंदी वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.

Navagatanche Swagat Navagatanche Swagat Navagatanche Swagat Navagatanche Swagat

शालेय उपक्रम २०१६ - १७

४ जानेवारी २०१७ | पालकशाळा

बुधवार दि. ४/१/२०१७ या दिवशी इ.१ ली व २ रीच्या पालकांसाठी व शुक्रवार दि. ६/१/२०१७ या दिवशी इ. ३ री व ४ थीच्या पालकांसाठी अमृतमहोत्सव सभागृहात पालकशाळा घेतली. दोन्ही पालकशाळेसाठी बोलाविलेले वक्ते- मा. श्री.राजीव तांबे(बालसाहित्यिक)- विषय – सुजाण पालकत्व, मा. डॉ. श्रीमती प्रफुल्लता सुरु(आयुर्वेदिक डॉक्टर)- विषय – आहार व आरोग्य.

Palak shala Palak shala Palak shala Palak shala Palak shala Palak shala Palak shala Palak shala Palak shala

१६ डिसेंबर | स्नेहसंमेलन

इ. पहिली व दुसरीच्या मुलींसाठी शुक्रवार दि. १६/१२/२०१६ या दिवशी अमृतमहोत्सव सभागृहामध्ये रंजन कार्यक्रम दाखविण्यात आले. त्या दिवशी सहाय्यक शिक्षण अधिकारी मा. श्रीमती शिल्पकला रंधवे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलाविण्यात आले होते. त्यांच्या हस्ते मुलींना बक्षिसे देण्यात आली. सोमवार दि. १९/१२/२०१६ या दिवशी इ. ३ री व ४ थीच्या मुली व पालकांसाठी हायस्कूलच्या ग्राउंडवर स्नेहसंमेलन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहासतज्ज्ञ मा. श्रीयुत विजयचंद्र थत्ते यांना आमंत्रित केले होते. संमेलनाच्या अध्यक्षा प्राथमिक शालेय समितीच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनीताई पाटील या होत्या. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मुलींना बक्षिसे देण्यात आली. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांचे नाट्यरूपाने शिवचरित्र सादर केले.

Gathering Gathering Gathering Gathering Gathering Gathering Gathering Gathering Gathering Gathering Gathering Gathering

२१ नोव्हेंबर | सहल

इ. ४ थीची सहल सोमवार दि. २१/११/२०१६ रोजी ‘बारामती अॅग्रो’ येथे गेली होती. तिथे शेतीचे व पशु व्यवसायाचे उत्पन्न कसे वाढवावे याची माहीती वेगवेगळ्या प्रकल्पाव्दारे मुलींना दाखवण्यात आली. व इ. ३ रीची सहल सोमवार दि. २८/११/२०१६ रोजी ‘मोराची चिंचोली’ येथे गेली तिथे मुलींना शहरी भाग व ग्रामीण भागातील जनजीवनाची ओळख झाली. आणि मंगळवार दि. २९/११/२०१६ रोजी इ. पहिलीची सहल ‘शिरगाव (प्रतिशिर्डी)’ आणि ‘भोसरी गार्डन’ येथे व आणि बुधवार दि. ३०/११/२०१६ रोजी इ. दुसरीची सहल ‘दुर्गा टेकडी’ , ‘शिरगाव (प्रतिशिर्डी)’ येथे गेली. तिथे मुलींना बागेत खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

sahal sahal sahal sahal sahal sahal sahal sahal sahal sahal sahal sahal

१४ नोव्हेंबर | बालदिन

१४ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सुट्टी आल्यामुळे मंगळवार दि. १५/११/२०१६ या दिवशी शाळेत बालदिन साजरा केला. पं. जवाहरलाल नेहरूंच्या फोटोला हार घालण्यात आला व त्यांच्या जीवनावर आधारित गोष्टींची पुस्तके वाचनासाठी ठेवली होती. प्रत्येक इयत्तेतील वर्गशिक्षकांनी मुलींचे खेळ घेतले. इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी “पपेट शो” मुलींना दाखविला. इयत्ता दुसरीच्या शिक्षकांनी छोटेसे नाटक बसविले होते. काही मुली पं.जवाहरलाल नेहरूंचा पोशाख घालून आल्या होत्या. अशाप्रकारे बालदिन साजरा केला.

Baldin Baldin Baldin Baldin Baldin Baldin Baldin Baldin Baldin

२१ ऑक्टोबर २०१६ | दिवाळी

शुक्रवार दि. २१/१०/२०१६ या दिवशी शाळेत दिवाळी साजरी केली. शिक्षक, पालकसंघ व व्यवस्थापन समितीच्या सर्वांनी मिळून रांगोळ्या काढल्या. देवकुळे काकांनी किल्ला बनविला होता. संपूर्ण शाळा तोरण, आकाशकंदील आणि विजेच्या माळा यांनी सजवली होती. दिवाळीची माहिती सांगण्यात आली व फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्वांनी केला. फक्त प्रतिकात्मक स्वरुपात भुईनळा, भुईचक्र लावले व आनंदात दिवाळी साजरी केली. मुलींना खाऊ व आकाशकंदील भेट दिला.

Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali Diwali

१० ऑक्टोबर २०१६ | भोंडला आणि विजयादशमी

सोमवार दि. १०/१०/२०१६ या दिवशी शाळेत ‘दसरा’ व ‘भोंडला' हे सण साजरे करण्यात आले. म. ग. ए. सोसायटीच्या सभासद व प्राथमिक शाळेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन केले. मुलींनीही पाटीपूजन केले. दसरा गीत, माहिती, गोष्ट इ. कार्यक्रमांनी दसरा सण साजरा केला गेला. तसेच मुलींनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हटली. सर्व मुली आवडीचा पोशाख घालून आल्या होत्या. मुलींना खिरापत देण्यात आली.

Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla Bhondla

२८ सप्टेंबर | वाचन प्रकल्पांतर्गत पुस्तक प्रकाशन

बुधवार दि. २८/०९/२०१६ या दिवशी डॉ. ललिता गुप्ते यांच्या "मानवी कोहिनूर डॉ. अब्दुल कलाम" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्याच शाळेतील इ. चौथी ई मधील कु. दिक्षा मोटे हिच्या हस्ते झाले. इ. चौथीच्या मुली, मुख्याध्यापिका, शिक्षिका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावर्षी इ. चौथी क च्या वर्गावर जुलै पासून दर बुधवारी गुप्ते बाई येऊन त्यांचा प्रकल्प राबवितात. कृतज्ञता म्हणून इ. चौथी क च्या सर्व मुलींनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच इतर काही विद्यार्थिनींनी त्यांचे पुस्तक विकत घेतले.

Pustak Prakashan Pustak Prakashan Pustak Prakashan Pustak Prakashan Pustak Prakashan Pustak Prakashan Pustak Prakashan Pustak Prakashan

६ सप्टेंबर | विद्यार्थिनी दिन

यावर्षी ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आल्यामुळे मंगळवार दि. ०६/०९/२०१६ या दिवशी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोला हार घालून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांची माहिती सर्व मुलींना सांगितली गेली. या दिवशी आपल्या शाळेत ‘विद्यार्थिनी दिन’ साजरा केला जातो. इ. चौथीच्या मुलींनी शिक्षिका बनून वर्गांवर जाऊन अध्यापन केले.

हुजूरपागा प्राथमिक शाळेतर्फे सर्व माजी मुख्याध्यापक,शिक्षक तसेच आता कार्यरत असणारे सर्व शिक्षक व कर्मचारी यांचाही श्रीफळ व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी सेवाज्येष्ठ शिक्षिका म्हणून श्रीमती वैशाली कोळी यांचा हुजूरपागा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.

Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day Teachers Day

२६ ऑगस्ट | श्रावणी शुक्रवार व पुस्तकहंडी

शुक्रवार दि. २६/०८/२०१६ शाळेत ‘श्रावणी शुक्रवार’ व ‘पुस्तकहंडी’ असे दोन कार्यक्रम साजरे करण्यात आले. मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल व ज्येष्ठ शिक्षिकांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. देवीस्तवन, देवीचे गाणे, जयघोष, माहिती व गोष्ट अशाप्रकारे कार्यक्रम साजरा केला. मुलींना दाणे व फुटाणे प्रसाद म्हणून देण्यात आला.

shravani-shukrawar shravani-shukrawar shravani-shukrawar

सुटीनंतर पुस्तकहंडीचा कार्यक्रम घेतला. यामध्ये इ.पहिली ते चौथीच्या सर्व मुलींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. मुली कृष्ण, राधा, गोविंदा बनून पुस्तकहंडी फोडून कार्यक्रम साजरा केला. इ. चौथीच्या मुलींना शाळेकडून गोष्टीची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.

Pustak Handi Pustak Handi Pustak Handi Pustak Handi

१९ ऑगस्ट |शिक्षकांची शैक्षणिक सहल

शुक्रवार दि. १९/०८/२०१६ या दिवशी ज्ञानरचनावादावर आधारित वाई तालुक्यातील वाहागाव, शिरगाव, कळंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे अध्यापन सुरु आहे. त्या शाळांना भेट देण्यासाठी हुजूरपागा प्राथमिक व कात्रज प्राथमिक अशा सर्व शिक्षकांची शैक्षणिक सहल गेली. तेथून आम्हां सर्वांना नवीन दिशा मिळाली. ज्यायोगे आमच्या दैनंदिन अध्यापनात नाविन्यपूर्ण बदल करण्यास मदत झाली. त्याबद्दल त्या सर्व शाळांचे व तसेच आम्हांस त्या शाळा भेटीचा योग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip Teachers trip

१६ ऑगस्ट | एक अनोखा उपक्रम

मंगळवार दि. १६/०८/२०१६ रोजी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून मुलींनी व शिक्षकांनी शाळेत राख्या तयार केल्या होत्या. तसेच इ. चौथीच्या मुलींनी लिहिलेली पत्र व राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात आल्या. इ. चौथीच्या काही मुली मुख्याध्यापिका व शिक्षिका ‘विश्रामबागवाडा’ पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. त्यांच्यातर्फे मुलींना खाऊ देण्यात आला.

Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram Anokha upakram

१५ ऑगस्ट | स्वातंत्र्यदिन

सोमवार दि. १५/०८/२०१६ भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन शाळेच्या गच्चीवर साजरा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , झेंडागीत, माहिती, गोष्ट असा कार्यक्रम सादर केला व वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाल्यावर मुलींना खाऊ देण्यात आला.

15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event 15 August Event

६ ऑगस्ट | नागपंचमी

शनिवार दि. ०६/०८/२०१६ या दिवशी नागपंचमी या सणाच्या निमित्ताने पालक-शिक्षक संघ व व्यवस्थापन समिती मधील पालकांच्या मदतीने इ. पहिली व दुसरीच्या मुलींच्या हातावर मेंदी काढण्यात आली. इ. तिसरी व चौथीच्या मुलींनी एकमेकींच्या हातावर मेंदी काढली. शाळेत मेंदी काढल्यामुळे मुली खूप आनंदात होत्या.

Nagpanchami Nagpanchami Nagpanchami Nagpanchami Nagpanchami Nagpanchami Nagpanchami

१ ऑगस्ट २०१६ |बालसभा

सोमवार दिनांक ०१/०८/२०१६ रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्यामुळे शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले. परिपाठामध्ये लोकमान्य टिळकांविषयी महत्वाची माहिती सर्वांना सांगण्यात आली व त्यांच्यावर आधारित एक स्फूर्तीदायक गाणे ऐकवण्यात आले.
दुपारी बालसभेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आपल्याच शाळेतील माध्यमिक विभागातील इ.९ वी तील 'शताक्षी जोशी' ही विद्यार्थिनी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अध्यक्षांची ओळख हे सर्व इ. ४ थी ई वर्गातील विद्यार्थिनींनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन इ.४ थीच्या वर्गशिक्षकांकडे होते. श्रीमती तंतरपाळे बाईंनी शताक्षी जोशी चा सत्कार केला. इ.चौथीतील काही विद्यार्थिनींनी पोवाडा सादर केला. तसेच लोकमान्य टिळकांवर आधारित गोष्टींचे कथन व प्रसंग विद्यार्थिनींना सांगितले. त्यानंतर शताक्षी जोशी ने सुद्धा सुंदर व समर्पक गोष्ट सांगितली. विद्यार्थिनी सुद्धा अगदी मन लावून ऐकत होत्या व शेवटी आभार मानण्यात आले.
अशाप्रकारे बालसभेचा कार्यक्रम अत्यंत छान व व्यवस्थितरित्या पार पडला.

Balsabha Balsabha Balsabha Balsabha Balsabha Balsabha Balsabha

९ जुलै २०१६ | पालखी सोहळा

“ज्ञानेश्वर माऊली” च्या गजरात रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक ९ जुलै २०१६ रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींची दिंडी निघाली. इयत्ता तिसरीच्या मुली वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीत सहभागी झाल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल व ज्येष्ठ शिक्षिका यांनी माऊलींच्या मूर्तीचे पूजन केले. तसेच पालखीबरोबर स्वच्छता दिंडी, पर्यावरण दिंडी, वृक्ष दिंडी अशा दिंड्या सहभागी झाल्या होत्या. दिंडीमध्ये विठ्ठल नामाच्या गजरासह वृक्षारोपण, पर्यावरण यांच्या आरोळ्याही देण्यात आल्या.

जुलै २०१६ | शैक्षणिक उपक्रम

शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्ञानांजन संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरी व चौथीसाठी शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेला एकूण ११९ विद्यार्थिनी बसल्या त्याचा निकाल १००% लागला. एकूण ३० मुलींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या मुलींना आमच्या गुणी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

१ जुलै २०१६ | वृक्षारोपण

दिनांक १ जुलै वृक्षदिनाचे औचित्य साधून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल, सेवाज्येष्ठ शिक्षिका तसेच विद्यार्थिनींच्या समवेत शालेय परिसरात वृक्षारोपण केले.
१ जुलै २०१६ रोजी श्रीमती साधना जक्कल बाईंनी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार स्विकारला व याचेच औचित्य साधून उपस्थित पदाधिकारी, माजी मुख्याध्यापिका व शिक्षिका तसेच सर्व शिक्षक, सेवक व उपस्थितांना रोपे देऊन एक आगळावेगळा वृक्षदिन साजरा केला

वृक्षारोपण वृक्षारोपण वृक्षारोपण वृक्षारोपण

२१ जून २०१६ |आंतरराष्ट्रीय योग दिन

२१ जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या टेरेसवर व इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींकडून प्लेशेड मध्ये श्रीयुत जगताप या पालकांनी योगासने करून घेतली. यावेळी इयत्ता चौथीचे सर्व शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना नाईक हजर होत्या.

Yoga day Yoga day Yoga day Yoga day Yoga day Yoga day Yoga day Yoga day Yoga day

१५ जून २०१६ | नवागतांचे स्वागत

यंदाचा शालेय वर्षाचा कार्यारंभ दि.१५ जून १६ रोजी झाला शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यासाठी शालेय समिती अध्यक्षा मा. शालिनीताई पाटील आणि वर्षभरात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर यांच्या समवेत सरस्वती पूजन करून करण्यात आले. विद्यार्थिनीना खडू पेटी व क्ले वाटण्यात आले.

नवागतांचे स्वागत नवागतांचे स्वागत नवागतांचे स्वागत

शालेय उपक्रम २०१५ - १६

क्षणचित्रे

School activities

Food and health week

Inter School competition

Bhondla

Bhondla

students and teachers at Dagadusheth ganapati

Diwali celebration

early act club

Gathering

alumni program - Me Huzurpagechi

शैक्षणिक उपक्रम

शाळेच्या उज्वल परंपरेला शोभणारी गोष्ट म्हणजे चौथीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. या परीक्षेला एकूण १०१ विद्यार्थिनी बसल्या. शाळेचा निकाल १००% लागला. एकूण ७ मुलींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या मुलींना आमच्या गुणी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्ञानांजन संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरीसाठी शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेला एकूण १५० विद्यार्थिनी बसल्या त्याचा निकाल १००% लागला. एकूण ३४ मुलींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या मुलींना आमच्या गुणी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

नवागतांचे स्वागत

यंदाचा शालेय वर्षाचा कार्यारंभ दि.१५ जून १५ रोजी झाला शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यासाठी शालेय समिती अध्यक्षा मा. शालिनीताई पाटील आणि वर्षभरात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर यांच्या समवेत सरस्वती पूजन करून करण्यात आले.

आहार व आरोग्य सप्ताह

दरवर्षी जानेवारी महिन्यात क्रीडा स्पर्धेबरोबर आहार व आरोग्य सप्ताह साजरा केला जातो. मानवी जीवनात ‘आहार’ चे महत्व काय आहे हे समजाविले जाते - आहार प्रदर्शनातून इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थिनींचा या प्रदर्शनात सहभाग असतो. अन्न घटक, अन्न पदार्थ आकर्षक सजावट करण्यात येते. मुलींना पौष्टिक खाऊ दिला जातो.

शालाबाह्य स्पर्धा

आपले नाणे किती खणखणीत आहे हे आपल्याला बाहेरच्या जगात जाऊन पहावे लागते.त्यासाठीच आपण आपल्या विद्यार्थीनीना विविध बाह्य स्पर्धांमध्ये घेऊन जातो.
या वर्षी समूहगीत स्पर्धा, आंतरशालेय नाट्यवाचन, वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, रामरक्षा व भगवद्गीता पाठांतर, मराठी भाषा ऑलिम्पियाड परीक्षा, ज्युडो कराटे स्पर्धा, शिक्षक, पालकांच्या कथाकथन स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यात मुली, शिक्षक, पालक यांनी भरपूर बक्षिसे मिळविली.

मूठभर धान्य प्रकल्प

मुल्यसंस्कार फक्त गोष्टी सांगून किवा परिपाठाच्या तासातून होत नाहीत. तर प्रत्यक्ष कृती करून होतात. सामाजिक जाणीव ठेऊन मूठभर धान्य या प्रकल्पातून वनवासी कल्याण आश्रमाला विद्यार्थिनींनी जमा केलेले चार पोती गहू, दोन पोती साखर, एक तेलाचा डबा असे पाठविण्यात अलर तसेच हडपसर येथील अंध शाळेला दोन पोती साखर व एक तेलाचा डबा पाठविण्यात आले.
यावर्षी ससून रुग्णालयातील प्रसूती विभागाला दोन पोती तांदूळ व दोन पोती गहू पाठविण्यात आले.

दिनांक २१ जून रोजी योग दिन माजी मुख्याध्यापिका मा. श्रीमती उषा नाईक आणि पालक श्रीमती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. तेव्हापासून इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींना दर शनिवारी एक तास आपले पालक श्री व सौ. जगताप योग व प्राणायामाचे मार्गदर्शन करतात.

१५ ऑक्टोबर डॉ. अब्दुल कलम यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘वाचन दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. आपल्या शाळेतही हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा केला. शाळेतील शिक्षिका श्रीमती उन्नती जावडेकर यांनी तिसरी चौथीच्या मुली व शिक्षक यासर्वांना गोष्टीची पुस्तके भेट दिली.

सांकृतिक कार्यक्रम

विद्यार्थिनींच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी आपल्या रँ. र. पु. परांजपे हुजूरपागा प्राथमिक शाळेमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत शाळेत थोर नेत्यांची जयंती पुण्यतिथी, राष्ट्रीय सण, श्रावणी शुक्रवार, नागपंचमी, पुस्तकहंडी, शिक्षकदिन, भोंडला, दसरा, दिवाळी, स्नेहसंमेलन, सहली, संक्रांत, विज्ञान दिन, महिला दिन, चौथी निरोपसमारंभ असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.

पालखी सोहळा

दरवर्षी पुण्यनगरीत ज्येष्ठ वद्य नवमीला श्री. संत ज्ञानेश्वर व श्री. संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होते. तर आमच्या प्राथमिक शाळेतही इयत्ता तिसरीच्या मुली असाच ‘पालखी सोहळा’ साजरा करीत आहेत. यावर्षी मुलींनी प्रत्येक वर्गाचे वेगळे रिंगण करून वारक-यांप्रमाणे नाचून विठ्ठलाचा जयजयकार केला.

नागपंचमी

बायका-मुलींचा आवडता सण ‘नागपंचमी’ त्यानिमित्ताने पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनींच्या हातावर आमचे पालक - संघातील उत्साही पालक व शिक्षकांनी मेंदी काढली आणि तिसरी चौथीच्या मुलींनी एकमेकींच्या हातावर मेंदी काढली.

श्रावणी शुक्रवार

हिंदू धर्मातील विविध सणांचे महत्व कळावे, ते कसे साजरे करावेत हे समजण्यासाठी बरेचसे सण शाळेत साजरे करण्यात येतात त्यापैकी एक श्रावणी शुक्रवारचे हळदी-कुंकू.

पुस्तकहंडी

शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये दहीहंडी प्रमाणे पुस्तकहंडी केली जाते. त्यामध्ये इयत्ता चौथीच्या प्रत्येक मुलीला एक पुस्तक शाळेतून भेट म्हणून दिले जाते. यामध्ये पहिलीच्या मुली कृष्ण व दुसरीच्या मुली राधा असतात.

लेखक आपल्या भेटीला

पुस्तकहंडीच्या निमित्ताने लेखक आपल्या भेटीला हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत केला जातो. ज्यामध्ये पाठ्यपुस्तकातील किंवा मुलींच्या परिचयाचे लेखक मुलींच्या भेटीला येतात. यावर्षी शाळेच्या माजी विद्यार्थिनी लेखिका डॉ. श्रीमती ललिता गुप्ते यांना प्रश्न विचारून त्या लेखिका कशा झाल्या हे तिसरी व चौथीच्या मुलींनी जाणून घेतले.

नवरात्र उत्सव

नवरात्र उत्सवात आपल्या शाळेत भोंडला व सरस्वती पूजन केले जाते. यावर्षी गांधी भवन येथील अंध शाळेतील मुलींना आपल्या शाळेत बोलावण्यात आले आणि त्यांच्या समवेत चित्रातील हत्ती भोवती फेर धरून भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हटली. त्यानंतर सरस्वती पूजन करण्यात आले. मुलींना खिरापत देण्यात आली.

दिवाळी

आपल्या शाळेतल्या काकांनी यावर्षी मुलींची मदत घेऊन मातीचा सुंदर किल्ला बनविला व त्यावर चित्रे मांडली. चौथीच्या मुलींनी शिक्षकांसमवेत बिन आवाजाचे फटाके उडविले. पालक संघातील पालकांनी सुंदर रांगोळ्या काढून पणत्या लावून, आकाशकंदील लावून शाळा सुंदर सजविली. आनंदात उत्साहात दिवाळी साजरी झाली.

शैक्षणिक सहल

यंदा इ. पहिलीची सहल लेखा फार्म, दुसरीची सहल संस्कृती गार्डन, तिसरीची सहल सूर्य शिबीर व चौथीची सहल बारामती जवळील ‘अग्रोवान’ येथे गेली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनिंनी फळझाडे, फुलझाडे, पक्षी, फुलपाखरे यांचे निरीक्षण केले.ट्रॅक्टर मध्ये बसून सहलीचा आनंद लुटला.

वैद्यकीय तपासणी

शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहू शकते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये शासनातर्फे विद्यार्थिनींची मोफत वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. व एका खाजगी संस्थेकडून डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.

शालेय विविध समिती व संघ

विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट त्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद असणे महत्वाचे आहे. याच उद्देशाने
१) शिक्षक-पालक संघ
२) शाळा व्यवस्थापन समिती
३) माता- पालक संघ व
४) परिवहन समिती यांची स्थापना करण्यात आली.