शिशुमंदिर

मुख्याध्यापिका - श्रीमती उमा अशोक गोसावी

एकूण कार्यरत शिक्षिका संख्या - १२

वर्गशिक्षिका - ९ , सहायक शिक्षिका - १ , संगीत शिक्षिका - १

कॉम्प्युटर शिक्षिका - १

शाळेची वेळ :
शिशुरंजन आणि छोटा गट
- सकाळी ८.३० ते ११.३०
मोठा गट - सकाळी ८.३० ते १२वार्षिक स्नेहसंमेलन (सन २०१७ - १८)

मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०१७
वेळ – दुपारी १२ वाजून ३० मिनिटे
स्थळ – अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड,
विवेकानंद पुतळ्याजवळ, पुणे ४६


हुजूरपागा कात्रज शाळा शिशुमंदिर विभाग (सर्व गटांसाठी नवीन प्रवेश)

शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ साठी नवीन प्रवेश अर्ज वाटप शनिवार दिनांक ३०/१२/२०१७ आणि सोमवार १/१/२०१८ रोजी सकाळी ९ ते १२ ह्या वेळेमध्ये करण्यात येईल.

गटानुसार खालीलप्रमाणे वय ग्राह्य धरले जाईल:

  • शिशुरंजन गट – दिनांक ३१/८/२०१८ पर्यंत वय वर्षे ३ पूर्ण
  • छोटा गट – दिनांक ३१/८/२०१८ पर्यंत वय वर्षे ४ पूर्ण
  • मोठा गट – दिनांक ३१/८/२०१८ पर्यंत वय वर्षे ५ पूर्ण
पाल्याचा मूळ जन्मदाखला सोबत आणणे अनिवार्य आहे.

शाळा प्रवेशाविषयी सविस्तर माहिती -

 

विद्यार्थिनींसाठी वैशिष्ट्यपूर्ण शालेय उपक्रम

शाळेत संस्कृत व इंग्रजी हे विषय शिकवले जातात.

लहान मुलींच्या लहान-मोठया स्नायूंचा विकास होण्यासाठी शाळेत खास प्रयत्न केले जातात. यात प्रामुख्याने लहान स्नायूंचा विकास होण्यासाठी मुलींना चित्रकला, रंगकाम, मातीकामातून रचना इत्यादी कृती घेतल्या जातात. त्यामुळे याची आवड निर्माण होते व अक्षर लेखनाचा पूर्व सराव म्हणूनही या कृती उपयोगी ठरतात. या कृतींमुळे एकाग्रता वाढते. ह्स्तनेत्र समन्वय साधण्यास मदत होते.

दैनंदिन जीवन व्यवहारातूनही लहान स्नायूंचा विकास होण्यास मदत होते. या कृती मुली आनंद घेत करतात. तसेच मोठ्या स्नायूंचा विकास घडवताना विविध खेळ घेतले जातात. कला-क्रीडा सप्ताह घेतला जातो. उदा- १) बोगद्यातून जाणे २) कोलांटी उडी मारणे ३) सायकल चालवणे.

रंगाची दुनिया जाणून घेण्यास, कृतिशीलता व निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी रंगदिन साजरे होतात.

मुले प्रत्यक्ष अनुभवातून खूप शिकत असतात त्यासाठी प्रत्येक प्रकल्प विषय शिकवताना विषयानुसार स्थळ भेटींचे आयोजन केले जाते.

व्यवसायिक लोक, त्यांची कामे यांचे आपल्या आयुष्यातले महत्व जाणून घेण्यासाठी शाळेमध्ये व्यवसायिक लोकांना बोलावले जाते. तसेच व्यवहार ज्ञानाची शिकवण लहानपणापासून अंगी बाणवली जावी आणि सामाजिक जाणीव व्हावी यासाठी उपक्रम राबवले जातात.

शाळेत सर्वधर्मीय सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. त्यातून घडणाऱ्या संस्कारांतून सर्वधर्म समभावाची भावना रुजते.

मुलींचा सभाधीटपणा वाढवा, मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी फळ प्रकल्पाला अनुसरून फळाच्या वेशभूषेचे आयोजन केले. पक्षी प्रकल्पाला अनुसरून नाटुकल्याद्वारे पक्षी संवर्धन संदेश दिला. स्नेहसंमेलन व त्यासाठी सुत्रसंचलन असे उपक्रम राबवले. मुलींमधे आत्मविश्वास निर्माण व्हायला याची मदत होते.

पूरक आहार व आरोग्य:
शिक्षणासोबत मुलींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पूरक आहार - ऋतूमान, पोषणमूल्य, स्वच्छता चव याचा विचार करून शाळेत दर बुधवारी विद्यार्थिनींना शाळेत बनवलेला खाऊ दिला जातो.

पालकांसाठीचे उपक्रम

शाळेतल्या अध्ययन पद्धतीची माहिती पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रकल्प विषयांचे मार्गदर्शनपर शैक्षणिक प्रदर्शन भरविले जाते. या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजतो. कुटुंब प्रकल्प अंतर्गत आमच्या पालकांनी वर्गात येऊन गोष्टी सांगितलेल्या. आजी आजोबा संमेलन, शाळेचा वर्धापन दिन, वसंतोत्सव, एक उनाड दिवस (स्वयं अध्ययन) इत्यादी उपक्रमही शाळेमध्ये घेतले जातात. ज्यामध्ये पालक, विद्यार्थिनी व शिक्षक सर्वांच्या विकासाचा, आनंदाचा विचार केलेला असतो.

शिक्षक व शिक्षकेतरांसाठीचे उपक्रम

एक प्रशिक्षित शिक्षक हा शाळेची शान आसतो. त्यासाठी शिक्षकांच्या उतरोत्तर प्रगतीसाठी सतत ज्ञान ग्रहणाचे कामं चालू असते. त्यामुळे शिक्षकांचा बौद्धिक दर्ज्यासोबत शाळेचा दर्जा वाढतो.

शिक्षक प्रबोधन शिबिर.

श्री. बाळकृष्ण मुजुमले सरांनी घेतलेले सुलेखन शिबिर.

श्रीम. जवळेकर यांनी घेतलेले सुलभ वाचन पद्धती.

श्रीम. गंभीर यांनी शिकवलेले विज्ञानातील सोपे प्रयोग.

श्रीम. अनुजा साठे यांनी शिकवलेले संस्कृत विषयाचे मार्गदर्शन.

श्री. पंकज मिठभाकारे यांनी शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यावर घेतलेले शिबीर.

याशिवाय सामुहिक पुस्तक वाचन घेतले जाते. मुलांना शिकवताना जी अध्ययन पद्धती वापरली जाते त्याच्याशी निगडीत पुस्तके वाचली जातात. उदा. १) प्रिय बाई २) बिनभिंतीची उघडी शाळा ३) फुलोरा.

कल्पकता दिन - शिक्षकांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवले जाते. शाळा भेट हा त्यातील एक अध्ययनाचा भाग. दरवर्षी दोन शाळांना भेट देऊन तेथील वेगळ्या अध्ययन पद्धतीचे निरीक्षण केले जाते. आतापर्यंत भेट दिल्या गेलेल्या शाळा -
१ निमकर बाल भवन (फलटण)
२ रानडे बालक मंदिर (पुणे)
३ शि.प्र. मंडळींची शिशुमंदिर. (पुणे)
४ अक्षरनंदन (पुणे)
५ ग्राममंगल (पुणे)
६ अब नॉर्मल स्कूल.
७ फुलोरा (कोल्हापूर)

पालकशाळा - पालक व शिक्षकांच्या सहाय्याने मुलींचा विकास होत असतो. त्यामुळे पालकांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पालकशाळेमधून केले जाते. खेळ व कृतींद्वारे हे मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी तज्ञ व्यक्तींना बोलावण्यात येते.
१) मा. श्रीम. शोभाताई भागवत. – संचालिका गरवारे बालभवन. पुणे
२) मा श्रीम. उमा बापट – एम. ए. मानसशास्त्रज्ञ
३) श्री. पंकज मिठभाकारे – एम. ए. मानसशात्रज्ञ
४) श्रीम. अनुपमा देसाई – B.sc. child development. & clinical psychology
५) डॉ. आगरखेडकर
६) डॉ. जोग - M.D. बालरोगतज्ञ
७) डॉ. प्रफुल्लता सुरु ८) डॉ. दुष्यंत कोठारी – M. M एम.डीबालरोगतज्ञ

मावशी दिवस व मावशी प्रशिक्षण
आपल्या सेविकांबाबतची कृतज्ञता आपल्या विद्यार्थिनींनी मावशी दिनातून व्यक्त केली. मा.शोभाताई भागवत यांनी खेळ व कृतीद्वारा मावशींचे प्रशिक्षण घेतले.

शालेय उपक्रमांची प्रातिनिधिक क्षणचित्रे

चिकटकाम

जोडकाम

पाणी प्रकल्प व झाडे प्रकल्पाला अनुसरून स्थळभेट, सहल श्री.ल.म.कडू (ग.म.भ.न.प्रकाशन) यांच्या फार्मवर

शैक्षणिक प्रदर्शन

करमणुकीतून शिक्षण गोष्टी, माहिती व गाणी
सी डी बघताना मुली

डॉ. दुष्यंत कोठारी – MM MD बालरोगतज्ञ.

मावशींचे प्रशिक्षण. मार्गदर्शक - शोभा भागवत.

आई बाबा व मी सॉलिड टीम

२०१६ - १७ मधील विशेष उपक्रम व क्षणचित्रे


आबा बागुल उद्यान (शिशुरंजन गट)

शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची सहल आबा बागुल उद्यान येथे नेण्यात आली. तेथील खेळाचा आनंद विद्यार्थिनीनी घेतला. तसेच शेंगदाण्याचा लाडू खाऊ म्हणून देण्यात आला.

Aaba Bagul udyan Aaba Bagul udyan Aaba Bagul udyan

रेल्वे म्युझियम (छोटा गट)

शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ रोजी वाहने प्रकल्पांतर्गत छोट्या गटाची सहल कोथरूड येथील रेल्वे म्युझियम येथे नेण्यात आली होती. तेथे रेल्वेचे कामकाज कसे चालते ह्याची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष धावणाऱ्या रेल्वे पाहून विद्यार्थिनीना खूप आनंद झाला. रेल्वेच्या विविध नियमांची माहिती सुद्धा देण्यात आली. तसेच कोथरूड येथील तात्यासाहेब थोरात उद्यान मधील खेळांची मजा विद्यार्थिनीनी लुटली. सोबत शेंगदाण्याच्या लाडूचा आस्वाद सुद्धा घेतला.

Railway museum Railway museum Railway museum Railway museum Railway museum Railway museum

पक्षी निरीक्षण

शुक्रवार दिनांक २२/१२/२०१७ रोजी मोठ्या गटाची सहल पक्षी प्रकल्पांतर्गत तळजाई टेकडी येथे नेण्यात आली. गुलाबी थंडीचा अनुभव घेत बदक, सनबर्ड, बगळा, कबुतर, सुतार पक्षी आणि विविध प्रकारचे पक्षी विद्यार्थिनींनी बघितले. तसेच पुस्तकांमधील पक्ष्यांच्या चित्राप्रमाणे पक्ष्यांचा शोध सुद्धा घेतला. त्यासाठी भिंगाचा वापरही केला. भटकंती करताना शेंगदाण्याच्या लाडूचा आस्वाद विद्यार्थिनीनी घेतला.

Pakshi nirikshan Pakshi nirikshan Pakshi nirikshan Pakshi nirikshan Pakshi nirikshan Pakshi nirikshan

नाताळ

मंगळवार दिनांक १९/१२/२०१७ रोजी शिशुमंदिर विभागात नाताळ सण साजराकरण्यात आला. ख्रिसमस ट्री सजवण्यात आला. नाताळ सणाची माहिती दृक माध्यमातून सांगण्यात आली. तसेच नृत्य सुद्धा करण्यात आले. विद्यार्थिनींना भेटण्यासाठी सांताक्लॉज आला होता. खाऊ म्हणून विद्यार्थिनींना केक देण्यात आला.

Christmas Christmas Christmas
Christmas Christmas Christmas

भाजी मंडई

गुरुवार दिनांक १४/१२/२०१७ रोजी छोट्या गटाच्या भाजी प्रकल्पांतर्गत भाजी मंडई भरवण्यात आली होती. छोट्या गटाच्या विद्यार्थिनी भाजीवालीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. भाजी घ्या भाजी अशा आरोळ्या देत विद्यार्थिनी भाजी घेण्याचा आग्रह करत होत्या. मोठ्या गटामधील विद्यार्थिनी पालकांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होणे आणि भाज्यांची माहिती होण्याच्या उद्देशाने भाजी मंडई भरवण्यात आली होती.

Bhaji mandai Bhaji mandai Bhaji mandai Bhaji mandai Bhaji mandai

वार्षिक स्नेहसंमेलन

मंगळवार दिनांक १२/१२/२०१७ रोजी शिशुमंदिर विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न झाले. ’रमते फुलांसावे’ हा फुलांवर आधारित कार्यक्रम विद्यार्थीनिंनी सादर केला. फुलांच्या गाण्यावर नृत्य, नाटिका, संगीतिका विद्यार्थीनिनी सादर केली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ५ ते ६ वर्षे वयोगटामधील विद्यार्थीनिनी केले. कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय श्रीमती वंदना पाठक (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सभासद आणि शिशुमंदिर कात्रज शालेय समितीच्या अध्यक्ष) उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमासाठी माननीय श्रीमती श्यामा जाधव (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष ), माननीय श्रीमती उषा वाघ (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्ष), माननीय श्रीमती रेखा पळशीकर (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या सचिव), माननीय श्रीमती जयश्री बापट(प्रमुख विश्वस्थ),माननीय श्री.सोनवणी (महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेचे सभासद) उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थीनीना प्रातिनिधिक स्वरूपात बक्षीस म्हणून पुस्तके देण्यात आली.

Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan Warshik snehsanmelan

केशरी रंग दिन

बुधवार दिनांक २९/११/२०१७ रोजी छोट्या गटाचा केशरी रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षिका केशरी रंगाचा पोषाख परिधान करून आल्या होत्या. केशरी रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी वर्गामध्ये करण्यात आली होती. लाल आणि पिवळा रंगाचे मिश्रण म्हणजे केशरी रंग हे प्रत्यक्ष रंग एकत्र करून विद्यार्थींनी बघितले. सूर्यफुलाची कागदी अंगठी विद्यार्थीनींना देण्यात आली. केशरी रंगाच्या विविध कृतींचा आनंद विद्यार्थीनिनी घेतला.

Keshari rang day Keshari rang day Keshari rang day

दूध प्रकल्प मांडणी (मोठा गट)

गुरुवार दिनांक २३/११/२०१७ रोजी मोठ्या गटाच्या दूध प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती. दूध देणारे प्राणी, दुधाचे पदार्थ, दुधाचे उपयोग, दुधाचे आरोग्यासाठीचे महत्व अशी विविध माहिती देणारे तक्ते आणि साधने ह्याची मांडणी करण्यात आली. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष पालकांना माहिती सुद्धा सांगितली. पालकांनी प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद दिला.

Doodh prakalp Doodh prakalp Doodh prakalp Doodh prakalp Doodh prakalp Doodh prakalp

बाग प्रकल्प (शिशुरंजन गट)

शनिवार १८/११/२०१७ रोजी बाग प्रकल्पांतर्गत शिशुरंजन गटाची सहल पु.ल.देशपांडे उद्यान सिंहगड रोड येथे नेण्यात आली होती. विविध खेळ जसे घसरगुंडी, झोका, जंगलजीम ह्यांचा आनंद विद्यार्थींनींनी घेतला. तसेच भटकंतीचाही अनुभव विद्यार्थिनींनी घेतला. क्रीमरोल खाऊ सुद्धा देण्यात आला. सोमवार ६/११/२०१७ रोजी वर्गामध्ये बाग प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती.

Baag prakalp Baag prakalp Baag prakalp

जंगली प्राणी प्रकल्प मांडणी (छोटा गट)

गुरुवार दिनांक १६/११/२०१७ रोजी छोट्या गटाचा जंगली प्रकल्पाची मांडणी करण्यात आली होती. प्राण्यांची घरे, खाद्ये, बाळे त्याची नावे अशी विविध माहिती देणारी साधने प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली होती. पालकांनी विद्यार्थीनिंना घेऊन प्रदर्शनाला भेट दिली.

Jangali prani prakalp Jangali prani prakalp Jangali prani prakalp Jangali prani prakalp Jangali prani prakalp

आकार दिन

बुधवार दिनांक ८/११/२०१७ रोजी शिशुमंदिरमध्ये आकार दिन साजरा करण्यात आला होता. विद्यार्थीनिंनी त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, आयत अशा विविध आकाराच्या वस्तू आणल्या होत्या. त्याची वर्गामध्ये मांडणी करण्यात आली होती. रंगकाम, चिकटकाम अशा हस्त व्यवसाय कृती देण्यात आल्या. खेळाद्वारे विविध आकाराची ओळख विद्यार्थिनींना करून देण्यात आली. तसेच चौकोन, आयत ,वर्तुळ अशा आकाराची बिस्किटे खाऊ म्हणून देण्यात आली. अशाप्रकारे आकारदिन हा अतिशय वेगळा उपक्रम राबवण्यात आला.

Aakar din Aakar din Aakar din
Aakar din Aakar din

कात्रज दूध डेअरी भेट

शनिवार दिनांक ४/११/२०१७ रोजी मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींनी दूध प्रकल्पांतर्गत कात्रज येथील दूध डेअरीला भेट दिली. डेअरीमध्ये दूध आल्यानंतर केल्या जाणा-या विविध प्रक्रियांची माहिती देण्यात आली. दुधाचे पदार्थ तयार कसे करतात हे प्रत्यक्ष पाहता आले. विद्यार्थिनीचे आवडीचे आईस्क्रीम देण्यात आले.

Katraj doodh dairy bhet Katraj doodh dairy bhet Katraj doodh dairy bhet Katraj doodh dairy bhet

राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट

शनिवार दिनांक ४/११/२०१७ रोजी छोट्या गटाच्या विद्यार्थिनींनी कात्रज येथील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. जंगली प्राणी प्रकल्पांतर्गत ह्या सहलीचे आयोजन करण्यातआले होते. सिंह, वाघ, साळिंदर, साप, नाग, हत्ती, माकड असे विविध प्राणी प्रत्यक्ष पहायला मिळाले. खाऊ म्हणून क्रीमरोल सुद्धा देण्यात आला.

Rajiv gandhi prani sangrahlay Rajiv gandhi prani sangrahlay Rajiv gandhi prani sangrahlay Rajiv gandhi prani sangrahlay Rajiv gandhi prani sangrahlay

पालकसभा

गुरुवार दिनांक २/११/२०१७ रोजी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. पालकसभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.अनिल पानसे उपस्थित होते. वय वर्षे ३ ते ५ मधील मुलांचे आरोग्य ह्या विषयावर पालकांना डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. तसेच पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच डॉ.सुषमा जलमकर ह्या सुद्धा पालक सभेसाठी उपस्थित होत्या. १०८ क्रमांक रुग्णवाहिका सेवेबद्दल माहिती डॉ.सुषमा जलमकर ह्यांनी प्रात्यक्षिकासह पालकांना दिली.

Palaksabha Palaksabha Palaksabha
Palaksabha Palaksabha Palaksabha

पाणी प्रकल्प ( मोठा गट )

गुरुवार दिनांक २०/७/२०१७ रोजी ‘पाणी’ या विषयावर प्रकल्प मांडणी करण्यात आली. पाण्याचे उपयोग, पाणी स्त्रोत, पाणी शुद्धीकरण, पाणी प्रदुषण या माहितीचा समावेश करण्यात आला होता. विविध साधने, चित्रे मांडणी पाहण्यासाठी पालक उपस्थित होते. विद्यार्थीनींनी पाणी प्रकल्पाबद्दल माहिती पालकांना दिली.

Pani Prakalp Pani Prakalp Pani Prakalp Pani Prakalp Pani Prakalp Pani Prakalp

पालकसभा

शाळेमध्ये राबवण्यात येणारे विविध प्रकल्प तसेच शिकवण्यात येणारे विषय याबद्दल पालकांना माहिती व्हावी या उद्देशाने गुरुवार दिनांक ६/७/२०१७ रोजी मोठ्या गटाची, शनिवार दिनांक ८/७/२०१७ छोट्या गटाची आणि शनिवार १५/७/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची पालक सभा आयोजित केली. पालकांना प्रात्यक्षिकाद्वारे अध्यापनाच्या विविध पद्धतींची माहिती देण्यात आली. प्रकल्प पद्धत, अक्षरवळण, अंकओळख, गाणी, गोष्ट, जीवनव्यवहार, इंद्रिय विज्ञान, गणिती संकल्पना अशा विषयांची साधनाद्वारे माहिती देण्यात आली.

Palak Sabha Palak Sabha Palak Sabha

स्वागत समारंभ

बुधवार दिनांक १२/७/२०१७ रोजी स्वागत समारंभ करण्यात आला. शिशुरंजन आणि छोट्या गटातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे स्वागत मोठ्या गटातील विद्यार्थीनींनी केले. चिकटकाम, रंगकाम याद्वारे शोभेच्या वस्तू मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी तयार केल्या आणि नवीन विद्यार्थीनींना भेट म्हणून दिल्या. मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. तसेच सँडविच तयार करून खाऊ म्हणून दिले.

Swagat Samarambh Swagat Samarambh Swagat Samarambh Swagat Samarambh Swagat Samarambh Swagat Samarambh

वारी विठ्ठलाची

सोमवार दिनांक २/७/२०१७ रोजी विठ्ठलाच्या नामघोषात पालखी काढण्यात आली. वारक-याच्या पोशाखात आलेल्या विद्यार्थिनींनी वाहतूक नियमनाचा संदेश दिला. पालखीसोबत सायकल रॅली शाळेच्या परिसरात काढण्यात आली. तसेच दृकश्राव्य ( ppt ) साधनाद्वारे माहिती सांगण्यात आली.

Palakhi Palakhi Palakhi Palakhi Palakhi Palakhi

रमजान ईद

बालवयात सर्वधर्म समभाव हे मूल्य रुजवण्याच्या उद्दिष्टाने मंगळवार दिनांक २७/६/२०१७ रोजी शिशुमंदिर मध्ये रमजान ईद हा सण साजरा करण्यात आला. छोटया गटातील विद्यार्थिनींनी माहिती सांगून नृत्य सादर केले. एकमेकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. शिरखुर्मा खाऊ म्हणून देण्यात आला.

Eid Eid Eid

शाळेचा पहिला दिवस

गुरुवार दिनांक १५/६/२०१७ रोजी छोटा गट, सोमवार दिनांक १९/६/२०१७ रोजी मोठा गट आणि शुक्रवार दिनांक २३/६/२०१७ रोजी शिशुरंजन गटाची शाळा सुरु झाली. शाळेमध्ये राबवले जाणारे विविध प्रकल्प आणि शाळेबद्दल माहिती पालकांना सांगण्यात आली. तसेच छोट्या गटातील पालकांना पाहण्यासाठी विविध साधन खेळांची मांडणी करण्यात आली होती. मोठ्या गटातील पालकांनी पाल्याबरोबर फिंगर पपेट तयार करून गाणे म्हटले. शिशुरंजन गटातील पालकांनी आपल्या पाल्याबरोबर ठसेकाम ह्या कृतीचा आनंद लुटला. घरी जाताना भेट म्हणून रुमाल आणि खाऊ म्हणून सुकामेवा देण्यात आला. शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींना भेट म्हणून खेळ देण्यात आला.

Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas Shalecha Pahila Divas

शिक्षक प्रशिक्षण ( पपेट तयार करणे. )

मंगळवार दिनांक १३\६\२०१७ आणि बुधवार दिनांक १४\६\२०१७ रोजी कात्रज विभागातील शिक्षकांसाठी पपेट्स बनवणे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रभावी अध्यापनासाठी प्रशिक्षणाचा उपयोग शिक्षकांना होणार आहे. माननीय श्री. प्रदीप वाघमारे ( scert चे कर्मचारी ) यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. कागदी पक्षी बनवणे, स्टिक पपेट, हँडपपेट, कळसूत्री बाहुल्या बनवणे आणि त्यांचा वापर करण्याच्या पद्धतींचा वापर प्रात्यक्षिकातून देण्यात आला. कमीतकमी वेळात आणि कमीतकमी खर्चात आकर्षक साधने बनविण्याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले.

Prashikshan Prashikshan Prashikshan

शिक्षकांचे प्रशिक्षण ( फुले तयार करणे. )

सोमवार दिनांक १२\६\२०१७ रोजी शिशुमंदिर शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. विविध प्रकारची कागदी फुले बनविण्यास शिकविण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी माननीय श्रीमती सुवर्णा अवचट उपस्थित होत्या. जास्वंद, गुलाब, झेंडू यासारखी विविध प्रकारची आकर्षक फुले शिक्षकांनी तयार केली. प्रशिक्षणामध्ये बनविलेल्या फुलांचा उपयोग शाळा सुशोभन आणि शाळेच्या इतर उपक्रमामध्ये होणार आहे.

Prashikshan Prashikshan Prashikshan Prashikshan