रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा

इयत्ता
१ ली ते ४ थी

वयोगट
६ वर्षे ते १० वर्षे

माध्यम
मराठी व सेमी इंग्रजी

शाळा प्रवेश इयत्ता पहिलीपासून सुरु

शाळेची वेळ
दररोज सकाळी ११ ते ४.३० व शनिवारी सकाळी ७.४५ ते ११.४५

पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
गुरुवार सायं. ४.३० ते ५.०० वाजता व शनिवारी दु. १२ वाजता

संपर्कासाठीचा पत्ता व फोन
६८९, नारायण पेठ, पुणे-३०.
०२० २४४५६२९०

ईमेल - huzurpaga1884@gmail.com

शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, गणित, परिसर, इंग्लिश, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण
(इयत्ता १ ली ते ४ थी चे प्रत्येकी ४ वर्ग हे सेमी इंग्रजी चे आहेत)

मुख्याध्यापिका
श्रीमती साधना जक्कल

शिक्षक - २२
शिक्षकेतर कर्मचारी - २ लेखनिक, ३ सेवक, ३ सफाई कामगार.
एकूण विद्यार्थी - १११६

शाळेचा इतिहास

दि. २९ सप्टेंबर १८८४ विजयादशमीच्या मुहूर्तावर गव्हर्नर सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते ‘हायस्कूल फोर नेटिव्ह गर्ल्स’ संस्थेचे उदघाटन झाले. दि. २ ऑक्टोबर १८८४ पासून वाळवेकर वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. १७ नोव्हेंबर १८८४ मध्ये किबे वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. ४ मार्च १८८५ रोजी सांगलीचे श्रीमंत तात्यासाहेब पटवर्धन यांच्या मालकीच्या ‘हुजूरपागा’ या वास्तूत शाळेच्या इमारतीची कोनशिला सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते बसविण्यात आली.
रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी प्राथमिक विभाग सुरु करण्यासाठी त्याकाळी पाच हजार रुपये देणगी दिली.
सन १९०७ साली प्राथमिक शाळा व मुलींना खेळण्यासाठी प्लेशेड बांधण्यात आले. प्राथमिकचे वर्ग सुरु झाले. शाळेच्या आवारात ‘आमराईत’ सन १९७८ मध्ये शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली. दि. १३ जुलै १९७९ पासून आत्ताच्या वास्तूत प्राथमिक शाळा भरू लागली.
दि. २ ऑक्टोबर १९८३ मध्ये शाळेला रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा असे नाव रँ. र. पु. परांजपे यांच्या कन्या श्रीमती. शकुंतलाताई परांजपे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

मागील वर्षांचे शालेय उपक्रम


शालेय उपक्रम २०१८ - १९

१ ऑगस्ट | बालसभा

रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळेत बुधवार दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी बालसभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हायस्कूलमधील इ. ९ वी ब मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. सिद्धी फिरोदिया हिला आमंत्रित केले होते. मुलींनीच या कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख, सूत्रसंचालन इ. उत्तमरीत्या केले. तसेच मुलींनी लोकमान्य टिळकांचा पोवाडा, गाणी, त्यांचे कार्य, माहिती गोष्टीरूपात सांगितली. तसेच सिद्धी फिरोदिया हिने मुलींना अतिशय सुंदर उपदेशपर मार्गदर्शन केले.

Balsabha Balsabha Balsabha Balsabha Balsabha

३१ जुलै | निवडणुक

मंगळवार दि. ३१ जुलै, रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे “विद्यार्थिनी मंत्रिमंडळ निवडणुका“ घेण्यात आल्या. विद्यार्थिनींना सार्वत्रिक निवडणुकांची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेने प्रथमच हा उपक्रम राबविला. मुलींकडूनही यास भरघोस प्रतिसाद मिळाला. इयत्ता १ ली ते ४ थीच्या सर्व मुलींनी उमेदवार पत्रिका तयार करणे, उमेदवार निवडणे, योग्य चिन्हावर शिक्का मारणे, प्रचार, पोलीस बंदोबस्त ही सर्व कामे आवडीने केली. तसेच आवडता प्रतिनिधी निवडून आल्यावर जल्लोषही साजरा केला. विविध वर्गांतून नाविन्यपूर्ण रीतीने व कल्पकतेने निवडणूक घेण्यात आली. शाळेने राबविलेल्या या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Nivadnuk Nivadnuk Nivadnuk Nivadnuk Nivadnuk Nivadnuk

१४ जुलै २०१८ | विठ्ठलाच्या नामगजरात हुजूरपागा दुमदुमली

शनिवार दि. १४ जुलै २०१८ रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने स्वच्छता, पर्यावरण, वृक्ष, ग्रंथ अशा विविध दिंड्यांसह आधुनिक काळाचे प्रतिनिधित्व करणारी ‘डिजिटल दिंडी’ ही दिमाखात सहभागी झाली होती. यावेळी मुलींनी लक्ष्मी रोड येथून पालखी मार्गस्थ होताना नागरिकांना तुळशीची रोपे वाटली. यातूनच “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश या चिमुकल्यांनी अप्रत्यक्षरीत्या दिला. तसेच “प्लास्टिक टाळा, कापडी पिशव्या वापरा” असा जयघोष करत कापडी पिशव्यांचे वाटप रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना केले. विद्यार्थिनींचे कौतुक करत रिक्षावाले काकाही उत्साहाने या दिंडीत सहभागी झाले.
या नाविन्यपूर्ण दिंडीचे आयोजन सर्व उत्साही शिक्षकांनी केले, तर त्यांना मार्गदर्शन शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांनी केले.

Palakhi Palakhi Palakhi Palakhi Palakhi Palakhi Palakhi

२१ जून २०१८ | हुजूरपागा प्राथमिक शाळेत योगदिन उत्साहात साजरा

"आंतरराष्ट्रीय योगदिनाचे" औचित्य साधून गुरुवार दि. २१ जून २०१८ रोजी रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे 'योगदिन' उत्साहात साजरा झाला. शाळेच्या विद्यार्थिनींना योगदिनाचे महत्व सांगण्यात आले. सूर्यनमस्कार, प्राणायम, विविध व्यायाम प्रकार, आसने इ. प्रात्यक्षिकांचे सादरीकरण इ. ४ थीच्या सर्व विद्यार्थिनींनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल तसेच सर्व इ. ४ थीचे सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते.

Yogdin Yogdin Yogdin Yogdin Yogdin

जून २०१८ | हुजूरपागा प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत

रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा येथे शालेय आवारात फुगे लावून, रांगोळ्या काढून सनईच्या मधुर सुरांनी मुलींचे स्वागत करण्यात आले.
शिक्षण मंडळ पुणे मनपाच्या सहाय्यक प्रमुख मा. श्रीमती रंधवे मॅडम, पर्यवेक्षक मा. श्री. मेमाणे सर, सोनवलकर सर, डायटचे प्रमुख मा. श्री. शेवाळे सर व शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल बाई यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले.
शाळेतील सर्व मुलींना पाठ्यपुस्तके व खाऊ देऊन तर पालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Navagatanche Swagat Navagatanche Swagat

शालेय उपक्रम २०१७ - १८

२७ फेब्रुवारी २०१८ | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धा

२७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त आपल्या रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत आंतरशालेय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध शाळांमधील १०५ मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मुलांसाठी कवितेचा विषय त्यांच्या भावविश्वातील त्यांना आवडणारी कविता त्याचे वाचन करायचे होते. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन होऊन स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मा. श्रीमती अपर्णा निरगुडे बाई, श्रीमती जोगळेकर बाई, श्रीमती ठाकूर बाई, श्रीमती साळुंखे बाई यांना बोलाविले होते. स्पर्धा संपल्यावर लगेचच बक्षीस समारंभ झाला. यशस्वी स्पर्धकांना परिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

Kavyawachan Spardha Kavyawachan Spardha Kavyawachan Spardha Kavyawachan Spardha

जानेवारी २०१८ । क्रीडा स्पर्धा

सोमवार दि. ८/१/२०१८ ते गुरुवार दि. ११/१/२०१८ या काळात आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. सोमवार दि. ८/१/२०१८ या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर आसने, सूर्यनमस्कार, साधन कवायते, एरोबिक्स, पिरॅमिड, लेझीम ही प्रात्याक्षिके सादर केली. इ. १ ली ते ४ थीच्या मुलींच्या सांघिक व वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. चेंडू पास, रिले, लंगडी, चकवा चेंडू या सांघिक स्पर्धा व धावणे, अडथळ्याची शर्यत, लंगडी, चेंडूफेक अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही चेंडूपास, भरभर चालणे, चेंडू फेक या स्पर्धा घेण्यात आल्या.

Krida Spardha Krida Spardha

नोव्हेंबर २०१७ | सहल

शाळा हे उपक्रमांचे मोहोळ असते, असे शिक्षणतज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे मत. खरंच शाळेत अनेक विविधांगी वैशिष्ठ्यपूर्ण उपक्रमांची रेलचेलच असते. या सर्व उपक्रमांत सर्वांचा आवडता उपक्रम म्हणजे “शैक्षणिक सहल”. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थिनींनी वर्गमैत्रिणीं बरोबर वेगवेगळ्या सहलींचा आनंद लुटला. इ. पहिलीची सहल बुधवार दि. २२ नोव्हेंबर रोजी 'नरेंद्र मुंदडाजी कि वाडी' या ठिकाणास भेट देण्यास गेली होती. येथे मुलींनी अस्सल गावरान मेनूचा आस्वाद घेत शेतीला भेट दिली. तर काही शूर मुलींनी सर्पमित्रांबरोबर सापही अंगावर घेतले.
इ. दुसरीची सहल मंगळवार दि. २१ नोव्हेंबर रोजी खेड शिवापूर येथील "माउंटमाची" येथे गेली. येथे मुलींनी विविध खेळांचा, झाडांवरील घरांचा तसेच नयनरम्य दृश्यांचा आनंद घेतला.
इयत्ता तिसरीची सहल सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी "चोखी दाणी" येथे जाऊन आली. राजस्थानी जेवण, घोडागाडीची सफर, मातीची भांडी, राजस्थानी नृत्य, जादुगार याचा आनंद लुटला.
इयत्ता चौथीची सहल गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी "प्रथमेश रिसोर्ट" येथे जाऊन आली. येथील अनेक साहसी खेळांचा जसे रोप वे, वॉल क्लायबिंग अशा खेळांचा अनुभव घेतला.

Sahal Sahal Sahal Sahal Sahal

१५ नोव्हेंबर २०१७ | बालदिन

१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. पंडित नेहरूंना मुले खूप आवडत म्हणून त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
यावर्षीही आपण आपल्या शाळेत बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला. सर्व मुली आवडीचा पोशाख घालून आल्या. फुग्यांनी शाळेची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. शाळेच्या ऑफिसबाहेर पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. त्यांच्या विषयीची पुस्तके मांडण्यात आली व माहिती सांगण्यात आली. या दिवशी अभ्यासाला सुट्टी देऊन सर्व विद्यार्थिनींनी वर्गावर्गातून विविध मनोरंजक खेळाचा व खाऊचा आस्वाद घेतला.

Baldin Baldin Baldin Baldin

१४ ऑक्टोबर २०१७ | दिवाळी

आली आली दीपावली जिची पाहात होते वाट |
आनंदाचे तरंग सर्वत्र पसरली उत्साहाची लाट ||
खरोखरच दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, सौख्य, समृद्धी आणि चैतन्याचा उत्सव.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शनिवार दि. १४ ऑक्टोबर २०१७ रोजी शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. सर्व मुली आवडीचा पोशाख करून नटून थटून शाळेत आल्या होत्या. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच इतिहासाची साक्ष देणारा किल्ला बनवण्यात आला होता. सुंदर फलकलेखन करण्यात आले होते. सर्व मुलींनी पणत्या आणून शाळेत दीपोत्सव साजरा केला. सर्वत्र विलोभनीय दृश्य होते. मा. मुख्याध्यापिका श्रीमती जक्कल बाई व सर्व शिक्षक, मुलींनी आनंदाने दिवाळी साजरी केली. शाळेकडून मुलींना दिवाळी भेट म्हणून लाडू, चिवडा व एक लहान आकाशकंदील देण्यात आला.
अशाप्रकारे उत्साहाने व आनंददायी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.

Diwali Diwali Diwali Diwali

२ ऑक्टोबर २०१७ | संस्थेच्या वर्धापनदिनी हुजूरपागेने रोवली डिजिटल शाळेची मुहूर्तमेढ

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचा १३३ वा वर्धापन दिन २ ऑक्टोबर २०१७ रोजी साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आपल्या प्राथमिक शाळेने शिक्षण पद्धतीतील आधुनिक क्रांती स्विकारत डिजिटल शाळेचे स्वप्न पाहिले व अल्पावधीतच ते पूर्ण केले. यावेळी इ. पहिली ते चौथीचे सर्व वर्ग अपग्रेड करताना २ वर्ग डिजिटल केले तर एक वर्ग 'Tab Lab (टॅब लॅब)' तयार करण्यात आला. या दिवशी तीनही वर्गांचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यापुढे आता विद्यार्थिनी अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यावर आधारीत व्हिडीओ पाहतील व पाठाशी संबंधित खेळही टॅबवर खेळतील.
या डिजिटल शाळेच्या संकल्पनेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षकवर्गाने हि संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी मोलाची जबाबदारी उचलली.

Digital shala Digital shala Digital shala Digital shala Digital shala

२३ सप्टेंबर २०१७ | भोंडला

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा |
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारव घुमतय पारावरी ||
शनिवार दि. २३ सप्टेंबर २०१७ रोजी शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला साजरा करण्यात आला. इ. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात नटून थटून आल्या होत्या. शाळेच्या प्रांगणात हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या प्रतिमेभोवती फेर धरून मुलींनी भोंडल्याची पारंपारिक गाणीही म्हटली. भोंडल्याची खिरापत ओळखून मुलींना खिरापत देण्यात आली.
इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी या भोंडल्याचा मनसोक्त आनंद घेतला.

Bhondala Bhondala Bhondala

९ सप्टेंबर २०१७ | विद्यार्थिनी दिन

नव्याच वाटा शोधू आम्ही,
नवेच रस्ते घडवू आम्ही |
नव्या दिशा अन् नव्याच आशा,
नव्या युगाच्या आम्ही मुली,
मुली आम्ही..........||
शनिवार दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी शाळेच्या परंपरेनुसार शिक्षकदिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी दिन साजरा करण्यात आला. यावेळी इ. चौथीच्या विद्यार्थिनींनी शाळेचा पूर्ण दिवसाचा कारभार व्यवस्थित सांभाळला. मुख्याध्यापिकेंपासून शिपायांपर्यंतची सर्व कामे मुलींनी स्वतः उत्साहाने केली. वर्गा वर्गांतून शिकविण्याचा अनुभवही घेतला.
दरवर्षी देण्यात येणारा सेवा ज्येष्ठतेचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुषमा वैद्य यांना देण्यात आला.

Vidyarthini din Vidyarthini din Vidyarthini din

१९ ऑगस्ट २०१७ | हुजूरपागेत गोविंदांनी फोडली पुस्तकहंडी

शनिवार दि. १९ ऑगस्ट १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत छोट्या गोविंदांनी उत्साहात पुस्तकहंडी साजरी केली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनी राधा - कृष्णाच्या पोशाखात नटून आल्या होत्या. गोविंदा बनलेल्या इयत्ता चौथीच्या मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे मानवी मनोरे रचले होते. प्रत्येक वर्गाच्या हंडीमध्ये पटसंख्येप्रमाणे कार्डशीटच्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. हंडी फोडल्यानंतर ज्या क्रमांकाची चिट्ठी मिळेल त्या क्रमांकाचे पुस्तक मुलींना प्रसाद म्हणून देण्यात आले. अशाप्रकारे ही दहीहंडी उत्साहात साजरी झाली.

pustak handi pustak handi pustak handi

१५ ऑगस्ट २०१७ | स्वातंत्र्यदिन

दि. ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट शाळेत ‘क्रांती सप्ताह’ साजरा करण्यात आला. यावेळी शालेय परिपाठामध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावरील आधारीत माहिती व गोष्टी सांगण्यात आल्या. तसेच क्रांतिदिन सप्ताहानिमित्त सानेगुरुजी कथामालेच्या सदस्य श्रीमती. सुषमा इनामदार यांनीही शालेय परिपाठामध्ये क्रांतीकारकांची गोष्ट सांगितली.
मंगळवार दि. १५ ऑगस्ट १७ रोजी शाळेत ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शाळा रांगोळी व क्रांतिकारकांच्या फोटोंनी सजली होती. इ. पहिली ते चौथीच्या सर्व मुली सकाळी ७.४५ वाजता शाळेत हजर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सोनावणी सर उपस्थित होते. मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्यावर समूहगीत व नृत्य सादर केले. असा हा राष्ट्रीय सण आनंदात साजरा करण्यात आला.

15 august 15 august 15 august

११ ऑगस्ट २०१७ | श्रावणी शुक्रवार

शुक्रवार दि. ११ ऑगस्ट १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागेत श्रावणी शुक्रवार निमित्त हळदी - कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थिनी आवडीच्या पोशाखात हजर होत्या.
या कार्यक्रमात श्रीमती मुजुमले बाई यांनी या सणाचे महत्त्व सांगणारी पारंपारिक गोष्ट सांगितली. भजन, देवीचा गजर तसेच श्रीलक्ष्मी देवीची आरती इ. गोष्टींनी कार्यक्रम सजलेला होता. सर्वात शेवटी मुलींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती साधना जक्कल यांनी केले.

Shravani-shukrawar Shravani-shukrawar

०९ ऑगस्ट २०१७ | हुजूरपागेत आगळीवेगळी रक्षाबंधन

बुधवार दि. ०९ ऑगस्ट रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेच्या विद्यार्थिनींनी एका आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाचा आनंद घेतला. इ. ४ थी च्या मुलींनी स्वतः राख्या तयार केल्या. तसेच काही शिक्षक, मुख्याध्यापिका व मुलींनी विश्रामबाग पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील पोलीस बांधवांना राख्या बांधून औक्षण केले. तसेच त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. मग या पोलीसदादांनीही चिमुकल्या बहिणींना ओवाळणी म्हणून खाऊ दिला. मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या उपक्रमातून बालवयातच संस्कारांचे व मूल्यांचे धडे मिळतात तसेच पोलिसांबद्दल असलेली भीती नाहीशी होऊन आदर निर्माण होण्यास मदत होते.

rakshabandhan rakshabandhan rakshabandhan rakshabandhan

०१ ऑगस्ट २०१७ | बालसभा

मंगळवार दि. १ ऑगस्ट १७ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत बालसभा आयोजित करण्यात आली. हुजूरपागा माध्यमिक विभागातून इ. ९ वी तील विद्यार्थिनी कु. अंकिता अलगुडे हिला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले. या कार्यक्रमात लोकमान्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इ. ४ थी तील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच काही मुलींनी टिळकांच्या जीवनावर आधारीत गोष्टी सांगितल्या. मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Bal Sabha Bal Sabha Bal Sabha Bal Sabha

२६ जुलै २०१७ | हुजूरपागेत रंगला मेंदी महोत्सव

“श्रावण महिना म्हणजे सणांची लयलूट, या महिन्यातील पहिलाच सण नागपंचमी” बुधवार दि. २६ जुलै १७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेत नागपंचमी निमित्त आयोजित मेंदी महोत्सवात शिक्षक, पालक व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तसेच मेंदी काढण्याचा व काढून घेण्याचा आनंद लुटला. या सणानिमित्त माता-पालक संघ, पालक संघ तसेच शिक्षकांचीही मेंदी स्पर्धा घेण्यात आली. शिक्षक व पालकांनी यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला तसेच इ. पहिली व दुसरीच्या मुलींच्या हातावर पालकांनी मेंदी काढली व इ. तिसरी व चौथीच्या मुलींनी एकमेकींच्या हातावर मेंदी काढली. अशाप्रकारे शाळेत उत्साही वातावरणात नागपंचमी निमित्त मेंदी महोत्सव साजरा करण्यात आला.

Nagpanchami Nagpanchami Nagpanchami

२२ जुलै २०१७ | दीप पूजन

शनिवार दि. २२ जुलै १७ रोजी प्राथमिक शाळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मा. मुख्या. श्रीमती साधना जक्कल तसेच सेवाज्येष्ठ शिक्षकांनी दिव्यांची पूजा केली. या दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना माईक वरून सांगण्यात आले. यांसारखे पारंपारिक सण शाळेत नेहमीच उत्साहाने साजरे करण्यात येतात.

Deep Pujan Deep Pujan Deep Pujan

१ जुलै २०१७ | वृक्षारोपण

शनिवार दि. १ जुलै २०१७ रोजी वृक्षदिनाचे औचित्य साधून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल, सेवाज्येष्ठ शिक्षिका तसेच विद्यार्थिनींच्या समवेत शालेय परिसरात वृक्षारोपण केले. विविध प्रकारची औषधी झाडे व फुलझाडे शाळेच्या प्रांगणात लावण्यात आली.

vruksharopan vruksharopan vruksharopan

२७ जून २०१७ | रमजान ईद

मंगळवार दि. २७ जून २०१७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत रमजान ईदचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. श्री. अन्वर राजन सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना ईद विषयी माहिती दिली. आपले मुस्लिम धर्मी बांधव पालक देखील उपस्थित होते. विद्यार्थिनींनी मुलाखतीद्वारे पालकांना व प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारून रमजान सणाची माहिती जाणून घेतली.

Eid Eid Eid Eid

२४ जून २०१७ | हुजूरपागा झाली पंढरीमय

शनिवार दिनांक २४ जून रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींनी पालखी सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. सकाळपासून शाळेत विठ्ठलाच्या नामगजरात वातावरण पांडुरंगमय झाले होते. बऱ्याच मुली ज्ञानेश्वर, तुकाराम व वारकऱ्यांच्या वेशात आल्या होत्या. तसेच काही जणींनी वृंदावन, झेंडे अशा पारंपारिक वेशात तर वृक्ष दिंडी, स्वच्छता दिंडी अशा विविध आधुनिक दिंड्यांसह सामाजिक संदेश देत पालखी लक्ष्मी रोड वरून शाळेच्या परिसरात आली. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल यांसह नामगजरात रिक्षावाले काकाही सहभागी झाले होते.

Palakhi Palakhi Palakhi Palakhi Palakhi

२१ जून २०१७ | आंतरराष्ट्रीय योग दिन

दिनांक २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून हुजूरपागा प्राथमिक शाळेतील सुमारे ८७० विद्यार्थिनींनी विविध आसन प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून आनंद घेतला. तसेच या दिनाचे औचित्य साधून मुलींनी नियमित योगासने करण्याचे आश्वासनही दिले. तसेच नियमित योगासने करण्याचे फायदेही सांगण्यात आले. कार्यक्रमाची सांगता ओमकारानेकरण्यात आली. मा. मुख्याध्यापिका श्रीम. साधना जक्कल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Yog Din Yog Din Yog Din Yog Din

१५ जून २०१७ | नवागतांचे स्वागत

१५ जून २०१७ रोजी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेत सर्व बालचमुंचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. सर्व पहिलीच्या विद्यार्थिनींना हसरे फुगे देण्यात आले. सर्व शिक्षकांनी विविध प्रकारे गोष्टी सांगून, नाट्यीकरणाने पहिला दिवस साजरा केला. तसेच पहिल्या दिवशी मुलींना पाठ्यपुस्तकांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. अशा आनंदी वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.

Navagatanche Swagat Navagatanche Swagat Navagatanche Swagat Navagatanche Swagat