कात्रज उच्च माध्यामिक

व्यवसाय अभ्यासक्रम

कात्रज सारख्या उपग्रामीण विभागातील सर्वसामान्य मुलींना उच्च शिक्षणाबरोबर स्वयंरोजगाराची संधी मिळावी या हेतूने कात्रज येथे २०११ साली उच्च माध्यमिक स्तरावर व्यवसाय अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली.

व्यवसाय विभागा अंतर्गत अभ्यासक्रम:

१) कम्प्युटर टेक्नॉलॉजी २) अकौंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट

माध्यम:
१) कम्प्युटर टेक्नॉलॉजी - इंग्रजी
२) अकौंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट - मराठी

इयत्ता: ११ वी व १२ वी

शाळेची वेळ: सकाळी ७.१० ते ११.४५
पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ: १२.०० ते १२.३०

२०१८ - १९ मधील विशेष उपक्रम

मागील वर्षातील उपक्रम

वार्षिक निकाल २०१७ - २०१८

शाळेचा पत्ता
हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा राजस सोसायटी, कात्रज

फोन नं
०२०-२६९६०२२३

ईमेल
hujurpagakatraj@yahoo.in

मुख्याध्यापिका
श्रीमती विद्या नामदेव गालिंदे
MA. MEd

व्यवसाय अभ्यासक्रमात
शिकविले जाणारे विषय :

१) Subjects of कम्प्युटर टेक्नॉलॉजी (Computer Technology) -

11th

 • English
 • Marathi
 • General Foundation
 • Office automation
 • Desktop Publishing
 • Computer hardware and network
 • Environment
 • Physical Education

12th

 • English
 • Marathi
 • General Foundation
 • Web Page Designing
 • Database system
 • Multimedia & Animation
 • Environment
 • Physical Education

२) Subjects of अकौंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट (Accounting & Office Management) -

11th

 • English
 • Marathi
 • General Foundation
 • Office Management & Organisation
 • Fundamentals of Accounting
 • Fundamentals of Costing & Auditing
 • Environment
 • Physical Education

12th

 • English
 • Marathi
 • General Foundation
 • Office Motivation
 • Advance Financial Accounting
 • Advance Costing & Auditing
 • Environment
 • Physical Education

व्यवसाय अभ्यासक्रमाची
वैशिष्ट्ये :

वार्षिक निकाल २०१७ - २०१८
इयत्ता १२वी

12th result

कम्प्युटर टेक्नॉलॉजी

वार्षिक निकाल २०१७ - २०१८
एकूण पट २४
परीक्षेस बसलेल्या २४
उत्तीर्ण विद्यार्थिनी २४
अनुत्तीर्ण विद्यार्थिनी ००
अनुपस्थित विद्यार्थिनी ००
शेकडा निकाल १००%
वार्षिक निकाल २०१७ - २०१८
क्रमांक विद्यार्थिनींची नांवे टक्के
प्रथम कु. फाटे प्रज्ञा नंदकुमार ८०.८५%
द्वितीय कु. जाधव कालिंदा पंढरीनाथ ७७.५४%
तृतीय कु. कुमावत उत्कर्षा देवानंद ७७.२३%

अकौंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट

वार्षिक निकाल २०१७ - २०१८
एकूण पट २४
परीक्षेस बसलेल्या २४
उत्तीर्ण विद्यार्थिनी २४
अनुत्तीर्ण विद्यार्थिनी ००
अनुपस्थित विद्यार्थिनी ००
शेकडा निकाल १००%
वार्षिक निकाल २०१७ - २०१८
क्रमांक विद्यार्थिनींची नांवे टक्के
प्रथम कु. ताटे साक्षी शेखर ८२.७७%
द्वितीय कु. विश्वकर्मा प्रीती राजेश ७९.५४%
तृतीय कु. धनावडे वैष्णवी संतोष ७६.४६ %

२०१८ - १९ मधील विशेष उपक्रम

शैक्षणिक क्षेत्रभेट

हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागातर्फे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन शनिवार दिनांक १९/०१/२०१९ रोजी श्री शारदा सहकारी बँक कात्रज कोंढवा रोड शाखा व सोमवार दिनांक २१/०१/२०१९ आणि मंगळवार दिनांक २२/१/२०१९ रोजी मुद्रिका प्रिंटर्स आणि नेहा इंटरप्राईजेस् येथे करण्यात आले. कम्प्युटर टेक्नोलॉजीच्या ४३ व अकौटींग ऑफिस मॅनेजमेंट च्या ४१ विद्यार्थिनी या शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी हजर होत्या.

श्री शारदा सहकारी बँक कात्रज कोंढवा रोड शाखेतील श्रीयुत शिर्के सर व श्री चव्हाण सर यांनी विद्यार्थिनींना बँकेत खाते उघण्यासाठी लागणाऱ्या दस्तावेजांची माहिती सांगितली. तसेच बँकेचे व्यवहार जसे cheque clearing, RTGS, Core Banking, Locker System, Net banking याविषयी माहिती सांगितली. ATM card, Credit card वापरताना कोणती काळजी घ्यावी यांचे मार्गदर्शन केले.

मुद्रिका प्रिंटर्स येथे श्रीयुत पटवर्धन सर यांनी Photoshop & Coraldraw या सॉफ्टवेअर्स च्या सहाय्याने DTP चे काम कसे केले जाते ते सांगितले. Printing machine, Offset printer, Cutting machine, packing machine अशा विविध प्रकारच्या मशीन्स पाहण्याची संधी मिळाली.

नेहा इंटरप्राईजेस् येथे श्रीयुत टोणगे यांनी अॅल्युमिनिमच्या प्लेट पासून पातेली, इडलीपात्र अशी विविध प्रकारची भांडी कशी तयार केली जातात तसेच भांड्यांचे पॉलीशिंग आणि पॅकिंग कसे केले जाते हे विद्यार्थिनींना दाखविले. Raw material assembling, product manufacturing, processing, finishing, packing या सर्व प्रक्रिया विद्यार्थीनींना पाहायला मिळाल्या.

शैक्षणिक क्षेत्रभेट शैक्षणिक क्षेत्रभेट शैक्षणिक क्षेत्रभेट शैक्षणिक क्षेत्रभेट शैक्षणिक क्षेत्रभेट शैक्षणिक क्षेत्रभेट

उदयोजकता विकास शिबीर

हुजूरपागा कात्रज उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाअंतर्गत मंगळवार दिनांक १२/१२/२०१८ ते शनिवार दिनांक १५/१२/२०१८ या कालावधीत उदयोजकता विकास शिबीरचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये खालील कार्यशाळा व उपक्रम घेण्यात आले.

१) स्पोकन इंग्लिश – मार्गदर्शिका मा. श्रीमती गायत्री फडके
२) सायबर क्राईम - मार्गदर्शिका मा. श्रीमती दीप्ती लेले
३) Graphics & Animation Techniques - श्रीमती मेघा चव्हाण
४) शैक्षणिक प्रदर्शन
५) पौष्टिक डबा स्पर्धा

स्पोकन इंग्लिश

मंगळवार दिनांक १२/१२/२०१८, बुधवार दिनांक १३/१२/२०१८ व शनिवार दिनांक १५/१२/२०१८ या तीन दिवसात स्पोकन इंग्लिश या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी मा. श्रीमती गायत्री फडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत त्यांनी English Grammar, Communication skill, letter witting या बाबतीत विद्यार्थीनींना स्लाईड शो प्रेझेन्टेशनच्या सहाय्यान मार्गदर्शन केले. इंग्लिश ग्रामर मधील in, on, above, a, an, the या शब्दांचा वापर कधी करावा या विषयी उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्याच बरोबर Active Voice and passive, Tenses याविषयी विविध उदाहरणे घेऊन विद्यार्थिनींना स्पष्टीकरण केले. इंग्रजीमधील Formal and Informal letter writing या बाबतीतसुद्धा उत्तम मार्गदर्शन केले.

सायबर क्राईम

मंगळवार दिनांक १२/१२/२०१८ रोजी सायबर क्राईम या विषयवार व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी मा. डॉ. दीप्ती लेले यांनी मार्गदर्शन केले. सायबर क्राईम म्हणजे काय? सायबर क्राईम चे विविध प्रकार यांची माहिती व्हिडीओ व प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थीनींना सांगितली. तसेच फेसबुक, वॉट्सअप सारख्या सोशल मिडिया यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याचे उत्तम मार्गदर्शन केले. सायबर जगात आपण चॅटिंग करताना आपल्या समोर असणारी व्यक्ती कोण असते हे आपल्याला कळत नाही. म्हणूनच विद्यार्थिनींनी आपली वैयक्तिक माहिती शेयर करू नये. तसेच मोबाईलच्या सहाय्याने गेम्स खेळताना त्यात गुंतून जाण्याचा धोका असतो. अशी विद्यार्थिनींच्या दृष्टीने आवश्यक माहिती सांगितली. तसेच सर्व विद्यार्थीनींना या सायबर जगातील कोणत्याही समस्या आल्यास सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

Computer Graphics & Animation

गुरुवार दिनांक १४/१२/२०१८ रोजी Computer Graphics & Animation या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. या व्याख्यानासाठी सोहम कॉम्प्युटर इन्स्टीटयूट मधील श्रीमती मेघा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानात त्यांनी Computer Graphics & Animation या विषयातील करियरच्या संधी या विषयी माहिती सांगितली. ग्राफिक्स डिझाईन यासाठी आवश्यक असणारी सॉफ्टवेअर्स म्हणजेच कोरल ड्रॉ, फोटोशॉप यांचा वापर करून ग्राफिक्स कसे तयार करावे याचे व फ्लॅश या अॅनिमेशन सॉफ्टवेअर चा वापर करून अॅनिमेशन कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले.

शैक्षणिक प्रदर्शन

शुक्रवार दिनांक १४/१२/२०१८ रोजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन मा. मुख्याध्यापिका श्रीमती विद्या गालिंदे यांनी केले. या प्रदर्शनात कम्प्युटर टेक्नोलॉजी च्या विद्यार्थिनींनी कम्प्युटरच्या संदर्भातील माहिती जसे कम्प्युटर व त्याची वैशिष्ट्ये, इनपुट डिव्हाइस, आऊटपुट डिव्हाइस, मदरबोर्ड, नेटवर्क व त्याचे प्रकार, क्लाएंट व सर्व्हर, केबल व त्याचे प्रकार चार्ट व मॉडेलच्या स्वरुपात दर्शवली. अकौटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट च्या विद्यार्थिनींनी मॅनेजमेंटच्या संदर्भातील माहिती जसे व्यवस्थापनेचे कार्य, मटेरियल कॉस्टिंग व त्याचे प्रकार या विषयी चार्टच्या स्वरुपात दर्शवली.

पौष्टिक डबा स्पर्धा

शुक्रवार दिनांक १४/१२/२०१८ रोजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींसाठी पौष्टिक डबा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी मोड आलेली कडधान्ये, विविध भाज्या, फळे आणि सुका मेवा यापासून पौष्टिक पदार्थ तयार केले. या स्पर्धेचे परीक्षण उच्च माध्यमिक विभागातील शिक्षिका श्रीमती परचंडे व श्रीमती वाबळे यांनी केले. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

क्रमांक विद्यार्थिनीचे नाव इयत्ता व तुकडी
प्रथम कु. पोटे पायाल रणजित इ ११ वी सी.टी.
द्वितीय कु. वैद्य विनिता यल्लाप्पा इ १२ वी ओ.एम.

या उद्योजकता विकास शिबाराच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळा, व्याख्याने या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, पाहुण्यांची ओळख आणि आभार प्रदर्शन विद्यार्थिनींनी केले.

उदयोजकता विकास शिबीर उदयोजकता विकास शिबीर उदयोजकता विकास शिबीर उदयोजकता विकास शिबीर उदयोजकता विकास शिबीर उदयोजकता विकास शिबीर उदयोजकता विकास शिबीर उदयोजकता विकास शिबीर

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित क्रीडा स्पर्धा २०१८-१९

ड्रील स्पर्धा

सूर्यनमस्कार स्पर्धा

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने सूर्यनमस्कार स्पर्धेत – व्दितीय क्रमांक प्राप्त केला.

योगासन स्पर्धा

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने योगासन स्पर्धेत – तृतीय क्रमांक प्राप्त केला. कुमारी ऐश्वर्या कुंजीर (१० अ) हिने "उत्कृष्ट संघनायिका" हा मान पटकाविला.

कॅलेस्थनिक्स

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने कॅलेस्थनिक्स स्पर्धेत – प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुमारी ऐश्वर्या कुंजीर (१० अ) हिने "उत्कृष्ट संघनायिका" हा मान पटकाविला.

लेझीम स्पर्धा

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने लेझीम स्पर्धेत –प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुमारी यामिनी थेऊरकर (१० ब) हिने "उत्कृष्ट संघनायिका" हा मान पटकाविला.

लोकनृत्य स्पर्धा

प्रथम क्रमांक (चांदीची परडी)

सांघिक स्पर्धा

स्पर्धेचे नाव गट निकाल
लंगडी लहान गट विजयी संघ
कबड्डी लहान गट विजयी संघ
मारचेंडू लहान गट विजयी संघ
कबड्डी मध्यम गट विजयी संघ
मारचेंडू मध्यम गट विजयी संघ
थ्रोबॉल मध्यम गट विजयी संघ
कबड्डी मोठा गट विजयी संघ
खोखो मोठा गट विजयी संघ
थ्रोबॉल मोठा गट विजयी संघ
रिंग टेनिस मोठा गट विजयी संघ
सर्व साधारण बक्षिसे
सांघिक स्पर्धा लहान गट विजेते पद
सांघिक स्पर्धा मध्यम गट विजेते पद
सांघिक स्पर्धा मोठा गट विजेते पद
सर्व ड्रीलस्पर्धा उपविजेते पद
सांघिक खेळ सर्व खेळ सर्व गट विजेते पद

क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा