शिशुमंदिर

मुख्याध्यापिका - श्रीमती उमा अशोक गोसावी

एकूण कार्यरत शिक्षिका संख्या - १२

वर्गशिक्षिका - ९ , सहायक शिक्षिका - १ , संगीत शिक्षिका - १

कॉम्प्युटर शिक्षिका - १

शाळेची वेळ :
शिशुरंजन आणि छोटा गट
- सकाळी ८.३० ते ११.३०
मोठा गट - सकाळी ८.३० ते १२वैशिष्ट्यपूर्ण शालेय उपक्रम

पालकांसाठीचे उपक्रम

शिक्षक व शिक्षकेतरांसाठीचे उपक्रम

२०१८ - १९ मधील विशेष उपक्रम व क्षणचित्रे

शाळा प्रवेश व इतर माहिती

अर्ज वाटपाची तारीख
२९ डिसेंबर २०१८
३१ डिसेंबर २०१८

प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण
हुजूरपागा कात्रज शाळा, शिशुमंदिर

वेळ
सकाळी ९ ते ११

प्रवेशासाठी आवश्यक वय
शिशुरंजन गट – ३ वर्षे पूर्ण (३० सप्टेंबर २०१९ पर्यंत)
छोटा गट – ४ वर्षे पूर्ण (३० सप्टेंबर २०१९ पर्यंत)
मोठा गट – ५ वर्षे पूर्ण (३० सप्टेंबर २०१९ पर्यंत)

शाळा प्रवेशाविषयी सविस्तर माहिती -

 

विद्यार्थिनींसाठी वैशिष्ट्यपूर्ण शालेय उपक्रम

शाळेत संस्कृत व इंग्रजी हे विषय शिकवले जातात.

लहान मुलींच्या लहान-मोठया स्नायूंचा विकास होण्यासाठी शाळेत खास प्रयत्न केले जातात. यात प्रामुख्याने लहान स्नायूंचा विकास होण्यासाठी मुलींना चित्रकला, रंगकाम, मातीकामातून रचना इत्यादी कृती घेतल्या जातात. त्यामुळे याची आवड निर्माण होते व अक्षर लेखनाचा पूर्व सराव म्हणूनही या कृती उपयोगी ठरतात. या कृतींमुळे एकाग्रता वाढते. ह्स्तनेत्र समन्वय साधण्यास मदत होते.

दैनंदिन जीवन व्यवहारातूनही लहान स्नायूंचा विकास होण्यास मदत होते. या कृती मुली आनंद घेत करतात. तसेच मोठ्या स्नायूंचा विकास घडवताना विविध खेळ घेतले जातात. कला-क्रीडा सप्ताह घेतला जातो. उदा- १) बोगद्यातून जाणे २) कोलांटी उडी मारणे ३) सायकल चालवणे.

रंगाची दुनिया जाणून घेण्यास, कृतिशीलता व निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी रंगदिन साजरे होतात.

मुले प्रत्यक्ष अनुभवातून खूप शिकत असतात त्यासाठी प्रत्येक प्रकल्प विषय शिकवताना विषयानुसार स्थळ भेटींचे आयोजन केले जाते.

व्यवसायिक लोक, त्यांची कामे यांचे आपल्या आयुष्यातले महत्व जाणून घेण्यासाठी शाळेमध्ये व्यवसायिक लोकांना बोलावले जाते. तसेच व्यवहार ज्ञानाची शिकवण लहानपणापासून अंगी बाणवली जावी आणि सामाजिक जाणीव व्हावी यासाठी उपक्रम राबवले जातात.

शाळेत सर्वधर्मीय सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. त्यातून घडणाऱ्या संस्कारांतून सर्वधर्म समभावाची भावना रुजते.

मुलींचा सभाधीटपणा वाढवा, मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी फळ प्रकल्पाला अनुसरून फळाच्या वेशभूषेचे आयोजन केले. पक्षी प्रकल्पाला अनुसरून नाटुकल्याद्वारे पक्षी संवर्धन संदेश दिला. स्नेहसंमेलन व त्यासाठी सुत्रसंचलन असे उपक्रम राबवले. मुलींमधे आत्मविश्वास निर्माण व्हायला याची मदत होते.

पूरक आहार व आरोग्य:
शिक्षणासोबत मुलींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पूरक आहार - ऋतूमान, पोषणमूल्य, स्वच्छता चव याचा विचार करून शाळेत दर बुधवारी विद्यार्थिनींना शाळेत बनवलेला खाऊ दिला जातो.

पालकांसाठीचे उपक्रम

शाळेतल्या अध्ययन पद्धतीची माहिती पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रकल्प विषयांचे मार्गदर्शनपर शैक्षणिक प्रदर्शन भरविले जाते. या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजतो. कुटुंब प्रकल्प अंतर्गत आमच्या पालकांनी वर्गात येऊन गोष्टी सांगितलेल्या. आजी आजोबा संमेलन, शाळेचा वर्धापन दिन, वसंतोत्सव, एक उनाड दिवस (स्वयं अध्ययन) इत्यादी उपक्रमही शाळेमध्ये घेतले जातात. ज्यामध्ये पालक, विद्यार्थिनी व शिक्षक सर्वांच्या विकासाचा, आनंदाचा विचार केलेला असतो.

शिक्षक व शिक्षकेतरांसाठीचे उपक्रम

एक प्रशिक्षित शिक्षक हा शाळेची शान आसतो. त्यासाठी शिक्षकांच्या उतरोत्तर प्रगतीसाठी सतत ज्ञान ग्रहणाचे कामं चालू असते. त्यामुळे शिक्षकांचा बौद्धिक दर्ज्यासोबत शाळेचा दर्जा वाढतो.

शिक्षक प्रबोधन शिबिर.

श्री. बाळकृष्ण मुजुमले सरांनी घेतलेले सुलेखन शिबिर.

श्रीम. जवळेकर यांनी घेतलेले सुलभ वाचन पद्धती.

श्रीम. गंभीर यांनी शिकवलेले विज्ञानातील सोपे प्रयोग.

श्रीम. अनुजा साठे यांनी शिकवलेले संस्कृत विषयाचे मार्गदर्शन.

श्री. पंकज मिठभाकारे यांनी शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यावर घेतलेले शिबीर.

याशिवाय सामुहिक पुस्तक वाचन घेतले जाते. मुलांना शिकवताना जी अध्ययन पद्धती वापरली जाते त्याच्याशी निगडीत पुस्तके वाचली जातात. उदा. १) प्रिय बाई २) बिनभिंतीची उघडी शाळा ३) फुलोरा.

कल्पकता दिन - शिक्षकांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवले जाते. शाळा भेट हा त्यातील एक अध्ययनाचा भाग. दरवर्षी दोन शाळांना भेट देऊन तेथील वेगळ्या अध्ययन पद्धतीचे निरीक्षण केले जाते. आतापर्यंत भेट दिल्या गेलेल्या शाळा -
१ निमकर बाल भवन (फलटण)
२ रानडे बालक मंदिर (पुणे)
३ शि.प्र. मंडळींची शिशुमंदिर. (पुणे)
४ अक्षरनंदन (पुणे)
५ ग्राममंगल (पुणे)
६ अब नॉर्मल स्कूल.
७ फुलोरा (कोल्हापूर)

पालकशाळा - पालक व शिक्षकांच्या सहाय्याने मुलींचा विकास होत असतो. त्यामुळे पालकांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पालकशाळेमधून केले जाते. खेळ व कृतींद्वारे हे मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी तज्ञ व्यक्तींना बोलावण्यात येते.
१) मा. श्रीम. शोभाताई भागवत. – संचालिका गरवारे बालभवन. पुणे
२) मा श्रीम. उमा बापट – एम. ए. मानसशास्त्रज्ञ
३) श्री. पंकज मिठभाकारे – एम. ए. मानसशात्रज्ञ
४) श्रीम. अनुपमा देसाई – B.sc. child development. & clinical psychology
५) डॉ. आगरखेडकर
६) डॉ. जोग - M.D. बालरोगतज्ञ
७) डॉ. प्रफुल्लता सुरु ८) डॉ. दुष्यंत कोठारी – M. M एम.डीबालरोगतज्ञ

मावशी दिवस व मावशी प्रशिक्षण
आपल्या सेविकांबाबतची कृतज्ञता आपल्या विद्यार्थिनींनी मावशी दिनातून व्यक्त केली. मा.शोभाताई भागवत यांनी खेळ व कृतीद्वारा मावशींचे प्रशिक्षण घेतले.

शालेय उपक्रमांची प्रातिनिधिक क्षणचित्रे

चिकटकाम

जोडकाम

पाणी प्रकल्प व झाडे प्रकल्पाला अनुसरून स्थळभेट, सहल श्री.ल.म.कडू (ग.म.भ.न.प्रकाशन) यांच्या फार्मवर

शैक्षणिक प्रदर्शन

करमणुकीतून शिक्षण गोष्टी, माहिती व गाणी
सी डी बघताना मुली

डॉ. दुष्यंत कोठारी – MM MD बालरोगतज्ञ.

मावशींचे प्रशिक्षण. मार्गदर्शक - शोभा भागवत.

आई बाबा व मी सॉलिड टीम

 

दीपोत्सव

मंगळवार दिनांक ३०/१०/२०१८ रोजी शिशुमंदिर विभागात दीपोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थीनींनी मातीचा किल्ला तयार केला. शाळेच्या परिसरामध्ये सजावट करण्यात आली होती. रांगोळी, पणत्या लावण्यात आल्या. त्यामुळे शाळेचा सर्व परिसर उजळून निघाला. सर्व विद्यार्थीनी आवडीच्या पोशाखात आल्या होत्या. दिवाळीच्या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. नाटुकल्याद्वारे विद्यार्थीनींनी फटाक्याविना दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व विद्यार्थीनींनी सांगितले. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी काय करतात हे वस्तूंच्या मांडणीद्वारे दाखवण्यात आले. शेवटी पुरी, छोले, श्रीखंड हे जेवण देण्यात आले. घरी जाताना प्रत्येक विद्यार्थिनीला रांगोळी छाप आणि छोटे आकाश कंदील भेट म्हणून देण्यात आले. जे विद्यार्थीनींनी बनवले होते. शालेय समिती अध्यक्ष मा. रविद्र साळुंखे सर शुभेच्छा व आशिर्वाद देण्यास उपस्थित होते. अशाप्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.

दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव दीपोत्सव

भाजी मंडई

बुधवार दिनांक २४/१०/२०१८ रोजी छोट्या गटाच्या भाजी प्रकल्पांतर्गत भाजी मंडई भरवण्यात आली होती. छोट्या गटाच्या विद्यार्थिनी भाजीवालीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. भाजी घ्या भाजी अशा आरोळ्या देत विद्यार्थिनी भाजी घेण्याचा आग्रह करत होत्या. मोठ्या गटामधील विद्यार्थिनी पालकांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होणे आणि भाज्याची माहिती होण्याच्या उद्देशाने भाजी मंडई भरवण्यात आली होती.

भाजी मंडई भाजी मंडई भाजी मंडई भाजी मंडई भाजी मंडई भाजी मंडई भाजी मंडई भाजी मंडई

कोजागिरी पौर्णिमा आणि पांढरा रंग दिन

मंगळवार दिनांक २३/१०/२०१८ रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. चांदोमामा ह्या गाण्यावर विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थीनी पांढरा पोशाख परिधान करून आल्या होत्या. मोठ्या गटाचा पांढरा रंग दिन सुद्धा त्याच दिवशी साजरा करण्यात आला. पांढऱ्या रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मोठ्या गटाच्या विदयार्थीनींनी पांढऱ्या रंगाच्या कापसाच्या वाती तयार केल्या. कोजागिरी निमित्त मसाले दुध सुद्धा देण्यात आले.

पांढरा रंग दिन पांढरा रंग दिन पांढरा रंग दिन पांढरा रंग दिन पांढरा रंग दिन

कात्रज दूध डेअरी भेट

शनिवार दिनांक २०/१०/२०१८ रोजी मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींनी दूध प्रकल्पांतर्गत कात्रज येथील दूध डेअरीला भेट दिली. डेअरीमध्ये दूध आल्यानंतर केल्या जाणा-या विविध प्रक्रियांची माहिती देण्यात आली. दुधाचे विविध पदार्थ तयार कसे करतात? हे प्रत्यक्ष विद्यार्थिनींना पाहता आले. शेवटी आवडीचे आईस्क्रीम खाऊ म्हणून देण्यात आले.

कात्रज दूध डेअरी भेट कात्रज दूध डेअरी भेट कात्रज दूध डेअरी भेट कात्रज दूध डेअरी भेट कात्रज दूध डेअरी भेट कात्रज दूध डेअरी भेट

बाग प्रकल्प

शनिवार दिनांक २०/१०/२०१८ शिशुरंजनगटाच्या विद्यार्थीनींची सहल बाग प्रकल्पांतर्गत पु. ल. देशपांडे उद्यान येथे नेण्यात आली. विविध खेळांचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला. विविध प्रकारच्या झाडांचे आणि फुलांचे सौंदर्य अनुभवले. तसेच क्रीमरोल हा खाऊ देण्यात आला. अशाप्रकारे बागेमध्ये सहल नेऊन प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थीनींना देण्यात आला.

बाग प्रकल्प बाग प्रकल्प
बाग प्रकल्प बाग प्रकल्प बाग प्रकल्प

दसरा

बुधवार दिनांक १७/१०/२०१८ रोजी दसरा हा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी आवडीच्या पोषाखामध्ये आल्या होत्या. विद्यार्थीनींनी नृत्याद्वारे देवीचा जागर सादर केला. तसेच खंडेनवमी निमित्त शस्त्रांचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थीनींच्या विविध साधनखेळांचे आणि सरस्वतीचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी ह्यांचा हस्ते करण्यात आले. विद्यार्थीनींनी पाटीचे पूजन करून प्रार्थना केली. तसेच नवरात्र उत्सवामध्ये गहू पेरून घेण्यात आले होते. ते गव्हांकुर विद्यार्थीनींना खाण्यास दिले. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पटवून सांगितले.

दसरा दसरा दसरा

भोंडला

मंगळवार दिनांक १६/१०/२०१८ रोजी शिशुमंदिरमध्ये सर्व गटांचा भोंडला साजरा करण्यात आला. फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणण्यात आली. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी ह्यांच्या हस्ते हत्तीची पूजा करण्यात आली. तसेच खिरापत म्हणून विद्यार्थिनींना डोसा, बटाटयाची भाजी, चटणी, जिलेबी देण्यात आले.

भोंडला भोंडला भोंडला भोंडला भोंडला भोंडला

केशरी रंग दिन

बुधवार १०/१०/२०१८ रोजी छोट्या गटामध्ये केशरी रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी केशरी रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. तसेच विविध केशरी रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. खाऊ म्हणून केशरी भात देण्यात आला.

केशरी रंग दिन केशरी रंग दिन केशरी रंग दिन

लाल रंग दिन

मंगळवार ३/१०/२०१८ रोजी शिशुरंजन गटामध्ये लाल रंग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी लाल रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. तसेच लाल रंगाच्या विविध वस्तूची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थीनींना लाल रंगाची भिंगरी तयार करून देण्यात आली. खाऊ म्हणून टोमॅटोची कोशिंबीर देण्यात आली.

लाल रंग दिन लाल रंग दिन लाल रंग दिन

पालकसभा

शुक्रवार दिनांक २८/०९/१८ रोजी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. पालक सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी माननीय डॉ. नंदिनी थत्ते उपस्थित होत्या. वय वर्षे ३ ते ५ मधील मुलांचे आरोग्य आणि आहार ह्या विषयावर पालकांना डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. तसेच पालकांच्या शंकांचे निरसन सुद्धा करण्यात आले. छोट्या छोट्या पौष्टिक पाककृती सांगून विद्यार्थीनींच्या आरोग्याचे महत्व पटवून दिले.

पालकसभा पालकसभा पालकसभा पालकसभा पालकसभा

गणेशोत्सव

शुक्रवार दिनांक १४/९/२०१८ रोजी छोट्या विद्यार्थीनींचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपतीची पालखीमधून वाद्ये आणि ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गणपती स्तोत्र, श्लोक, भजन तसेच आरती म्हणण्यात आली. शिशुरंजन गटाच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. गणपतीच्या गोष्टींची सी. डी. दाखवण्यात आली. तसेच विद्यार्थीनींना शाळेजवळील गणेश मंदिरात नेण्यात आले होते. वर्गामध्ये गणपतीसाठी सजावट विद्यार्थीनींनी केली आणि रोज आरती सुद्धा करण्यात येत होती. विद्यार्थीनींना मातीचे गणपती तयार करण्यास देण्यात आले होते. तसेच प्रसाद म्हणून उकडीचा मोदक देण्यात आला.

गणेशोत्सव गणेशोत्सव गणेशोत्सव गणेशोत्सव गणेशोत्सव गणेशोत्सव

वैद्यकीय तपासणी

गुरुवार दिनांक ६/९/२०१८ आणि शुक्रवार दिनांक ७/९/२०१८ रोजी सर्व विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अपूर्वा फौंडेशनचे संचालक माननीय डॉ. सुहास शितोळे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी तपासणी केली. ह्यावेळी माननीय राजेंद्र कोंडे ( पुणे जिल्हा व महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन सेक्रेटरी ), श्री. शैलेंद्र वालगुडे ( शिवसेना प्रमुख, वेल्हे तालुका ), श्री. हेमंत धायबर ( अध्यक्ष, राजस सोसायटी ) उपस्थित होते. विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करून योग्य उपचार सुचवण्यात आले.

वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी वैद्यकीय तपासणी

गोकुळाष्टमी

शुक्रवार दिनांक ३१/८/२०१८ रोजी शिशुमंदिर विभागात गोकुळाष्टमी आणि दहीहंडी साजरी करण्यात आली. कृष्णाची गाणी म्हणण्यात आली. तसेच मोठ्या गटामधील विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थिनी राधाकृष्णाचे पोशाख करून आल्या होत्या. दहीहंडी द्वारे सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण्याचा संदेश विद्यार्थीनींना देण्यात आला. दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी न फोडता त्यामध्ये मुठभर धान्य विद्यार्थिनींनी स्वतः शिडीवर चढून हंडीमध्ये भरले. हे धान्य प्रत्येक विद्यार्थिनींनी घरून आणले होते. असे जमा झालेले गहू, तांदूळ, ज्वारी हे धान्य ममता फौंडेशन ह्या अनाथ आश्रमाला भेट म्हणून देण्यात आले. प्रसाद म्हणून दहीपोहे देण्यात आले. अशाप्रकारे अतिशय उत्साहामध्ये गोकुळाष्टमी सण साजरा झाला.

गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी

राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट

शनिवार दिनांक २९/९/२०१८ रोजी छोट्या गटाच्या विद्यार्थीनींनी कात्रज येथील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. जंगली प्राणी प्रकल्पांतर्गत ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सिंह, वाघ, साळिंदर, साप, नाग, हत्ती, माकड असे विविध प्राणी प्रत्यक्ष पहायला मिळाले. खाऊ म्हणून क्रीमरोल सुद्धा देण्यात आला. तसेच गाडी मधून सफरीचा आनंद विद्यार्थीनींनी लुटला.

राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट राजीव गांधी प्राणी संग्रहालय भेट

श्रावणी शुक्रवार

शुक्रवार दिनांक ७/०९/१८ रोजी श्रावणी शुक्रवार हळदीकुंकू शिशुमंदिरमध्ये साजरे करण्यात आले. जिवतीची पूजा करण्यात आली. तसेच छोट्या विद्यार्थीनींना ओवाळण्यात आले. प्रसाद म्हणून फुटाणे देण्यात आले.

श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवार

पिवळा रंग दिन

बुधवार दिनांक २९/०८/१८ रोजी शिशुमंदिर मध्ये पिवळा रंग दिन साजरा करण्यात आला. शिशुरंजन गटामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनी पिवळ्या रंगाचे पोशाख करून आल्या होत्या. खाऊ म्हणून विद्यार्थीनींना लेमन राईस देण्यात आला.

पिवळा रंग दिन पिवळा रंग दिन पिवळा रंग दिन

राखी पौर्णिमा

शुक्रवार दिनांक २४/८/२०१८ रोजी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने राखी बांधण्यासाठी शाळेच्या परिसरातील राजस सोसायटीच्या सभासदांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थीनींना राखीपौर्णिमेची माहिती सांगण्यात आली. तसेच छोट्या विद्यार्थीनींनी कोळी नृत्य सादर केले. उपस्थित राजस सोसायटीच्या सर्व सभासदांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. शाळेतर्फे खाऊ म्हणून नारळाची करंजी देण्यात आली.

राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा

स्वातंत्र्य दिन

मंगळवार १४/८/२०१८ रोजी विद्यार्थिनींची एकत्र कवायत घेण्यात आली. भारताच्या ध्वजाबद्दल माहिती सांगण्यात आली. विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिनावर आधारित नृत्य सादर केले. भारताची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाची ध्वनीचित्रफीत विद्यार्थीनींना दाखवण्यात आली.

स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन

वर्षाविहार

पाणी आणि झाडे विषय प्रकल्पांर्गत मोठ्या गटाची सहल पानशेत येथील विद्याविहार रिसाॅर्ट येथे नेण्यात आली होती. शुक्रवार दिनांक १९/८/२०१८ आणि शनिवार दिनांक ११/८/२०१८ रोजी सहल नेण्यात आली होती. पानशेत, खडकवासला, वरसगाव ही धरणे दाखवण्यात आली. तसेच विद्याविहारचे प्रमुख आणि जेष्ठ बालसाहित्यिक माननीय श्री. ल. म. कडू ह्यांनी विविध औषधी वनस्पतींबद्दल माहिती दिली. प्रत्यक्ष पावसाळ्यातील कीटक जसे खेकडा, गांडूळ दाखवून ह्याची माहिती सांगितली. प्रत्यक्ष बैलासोबत शेत नांगरण्याचा अनुभव विद्यार्थीनींनी घेतला. बटाट्याची लागवड विद्यार्थिनींनी केली. दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन वर्षाविहार करत पानशेत सहल पार पडली.

वर्षाविहार वर्षाविहार वर्षाविहार वर्षाविहार वर्षाविहार वर्षाविहार

नागपंचमी

सोमवार दिनांक १३/८/२०१८ रोजी शिशुमंदिर मध्ये नागपंचमी साजरी करण्यात आली. मातीचे वारूळ आणि नाग विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर कल्पनेने तयार केले. नृत्य, गाणी, माहिती, झिम्मा फुगडी खेळून उत्साहामध्ये नागपंचमी सण साजरा करण्यात आला. तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी छोट्या मैत्रिणींच्या हातावर मेंदी काढली. कागदी नाग विद्यार्थिनींनी तयार केले. विद्यार्थिनींना खाऊ म्हणून पुरण देण्यात आले.

नागपंचमी नागपंचमी नागपंचमी नागपंचमी नागपंचमी नागपंचमी

निळा रंग दिन

मंगळवार दिनांक ३१/०७/१८ रोजी शिशुमंदिरमध्ये निळा रंग दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी निळ्या रंगाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. निळ्या रंगाच्या विविध वस्तूंची मांडणी वर्गामध्ये करण्यात आली होती. तसेच विद्यार्थीनींच्या हातावर निळ्या रंगाच्या ढगाचा टॅटू काढण्यात आला होता.

निळा रंग दिन निळा रंग दिन निळा रंग दिन

माझे कुटूंब प्रकल्प

सोमवार दिनांक ३०/७/२०१८ रोजी शिशुरंजन गटामध्ये माझे कुटूंब प्रकल्पांतर्गत आगळावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी विद्यार्थिनींना वर्गात येऊन गोष्टी सांगितल्या. आपल्या पालकांना शाळेत बघून विद्यार्थिनी आनंदून गेल्या होत्या. पालकांनीसुद्धा ह्या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. शेवटी पालकांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.

माझे कुटूंब प्रकल्प माझे कुटूंब प्रकल्प माझे कुटूंब प्रकल्प माझे कुटूंब प्रकल्प माझे कुटूंब प्रकल्प

माझे आवडते घर [छोटा गट]

अभ्यासक्रमातील घरे प्रकल्पांतर्गत छोट्या गटातील विद्यार्थीनींना बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी भेट दिली. घर बांधण्याची पद्धत विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष बघितली. घरे बांधण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य विद्यार्थिनींना दाखवण्यात आले. अशा प्रकारे स्थळभेटीद्वारे छोट्या गटाचा घर प्रकल्प पार पडला.

माझे आवडते घर माझे आवडते घर माझे आवडते घर

दिव्या दिव्या दिपत्कार

प्रकाश देणाऱ्या दिव्याचे पूजन बुधवार दिनांक ७/८/२०१८ रोजी शिशुमंदिर विभागात करण्यात आले. शाळेमध्ये असणाऱ्या विविध दिव्यांची पूजा करण्यात आली.
लामणदिवा, समई पणती, दगडी दिवा, दीपमाळ, कंदील, मशाल अशा विविध दिव्यांची मांडणी करण्यात आली. दिव्यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींनी वर्गात कणकेचे अतिशय आकर्षक असे दिवे तयार केले. दिवे खाऊ म्हणून देण्यात आले. प्रसाद म्हणून लाह्या, बत्तासे देण्यात आले.

Diwyachi amawsya Diwyachi amawsya Diwyachi amawsya

शैक्षणिक प्रदर्शन

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शिशुमंदिर अभ्यासक्रमामध्ये विविध प्रकल्प विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासाठी वापरण्यात येणारे विविध साधनांचे प्रदर्शन शाळेमध्ये मांडण्यात आले होते. विद्यार्थीनी या प्रदर्शनाबद्दल माहिती सांगत होत्या. शनिवार दिनांक ४/८/२०१८ रोजी शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन बघण्यासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष माननीय श्रीमती उषा वाघ आणि संस्थेचे सभासद माननीय श्री. रमाकांत सोनावणे हे उपस्थित होते. तसेच इतर विभागाच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. पालकांनी प्रदर्शन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.

Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan Shaikshanik pradarshan

गुरुपौर्णिमा

शुक्रवार दिनांक २७/७/२०१८ रोजी शिशुमंदिरमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेची माहिती सांगण्यात आली. व्यास गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थीनींनी गुरुशिष्यांच्या गोष्टी सांगितल्या. अशाप्रकारे गुरूंना वंदन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

Gurupornima Gurupornima Gurupornima

बालसाहित्य संमेलन

विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड लहानपणापासूनच निर्माण व्हावी ह्या उद्देशाने बालसाहित्य संमेलनाचे आयोजन शिशुमंदिर विभागात करण्यात आले होते. मंगळवार दिनांक २४/७/२०१८ ते गुरुवार दिनांक २६/७/२०१८ रोजी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक २४/७/२०१८ रोजी ग्रंथ दिंडीद्वारे संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनामध्ये ज्येष्ठ बालसाहित्यिक माननीय श्री. ल. म. कडू आणि माननीय श्रीमती कल्पना संचेती ह्यांनी पालकांना मार्गदर्शन केले. तसेच मोठ्या गटासाठी वाचन कोपरा उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पालकांनी पाल्यासोबत गोष्टींची पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला. त्यासोबतच चित्र काढणे, मातीकाम ह्या कृती सुद्धा करण्यात आल्या. विविध प्रकारच्या पुस्तकांची विक्री सुद्धा ह्यावेळी करण्यात आली. अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणामध्ये बाल साहित्य संमेलन पार पडले.

Bal sahitya sammelan Bal sahitya sammelan Bal sahitya sammelan Bal sahitya sammelan Bal sahitya sammelan Bal sahitya sammelan Bal sahitya sammelan Bal sahitya sammelan

वारी विठ्ठलाची

बुधवार दिनांक १८/७/२०१८ रोजी विठ्ठलाच्या नामघोषात पालखी काढण्यात आली. वारकऱ्यांच्या पोशाखात आलेल्या विद्यार्थिनींनी खेळाचे महत्व सांगणारे संदेश दिले. तसेच ppt द्वारे माहिती सांगण्यात आली. मुख्याध्यापिका माननीय श्रीमती उमा गोसावी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. परिसरामध्ये विठ्ठलाच्या गजरात पालखी फिरवून आणण्यात आली. अशा अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये पालखी पार पडली.

Palakhi Sohala Palakhi Sohala Palakhi Sohala Palakhi Sohala Palakhi Sohala

पालक सभा

शिशुमंदिर विभागातील सर्व गटामध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती तसेच अध्ययनाच्या विविध पद्धती याबद्दल माहिती पालकांना व्हावी या दृष्टीने पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दिनांक २८/६/२०१८ रोजी मोठ्या गटाच्या, शुक्रवार दिनांक २९/६/२०१८ रोजी छोट्या गटाच्या आणि शनिवार दिनांक ७/७/२०१८ रोजी शिशुरंजन गटाच्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षिकांनी पालकांना मार्गदर्शन केले.

Palak sabha Palak sabha Palak sabha Palak sabha

स्वागत समारंभ

मंगळवार दिनांक ३/७/२०१८ रोजी शिशुमंदिर मध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षिकांनी पपेट शो सादर केला. गोष्टीमधून कागदी पिशवी वापरण्याचा संदेश दिला. तसेच मोठ्या गटामधील विद्यार्थिनींनी हस्तव्यवसाय कृती मधून multipurpose box तयार करून छोट्या आणि शिशुरंजन गटातील विद्यार्थींनींना भेट म्हणून दिला. तसेच सॅंडविच खाऊ देऊन स्वागत समारंभ साजरा करण्यात आला.

Swagat samarambha Swagat samarambha Swagat samarambha Swagat samarambha Swagat samarambha

शाळेचा पहिला दिवस

गुरुवार दिनांक १४/६/२०१८ रोजी पालक सभा घेऊन शाळेची सुरुवात झाली. शाळेच्या विविध नियम आणि उपक्रमांची माहिती यावेळी पालकांना देण्यात आली. शुक्रवार दिनांक १५/६/२०१८ रोजी छोट्या गटाची, सोमवार दिनांक १८/६/२०१८ रोजी मोठ्या गटाची आणि शुक्रवार दिनांक २२/६/२०१८ रोजी शिशुरंजन गटाची शाळा सुरु झाली. गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. पालक आणि विद्यार्थिनी मिळून हस्तव्यवसाय कृती करून घेण्यात आल्या. सुकामेवा खाऊ म्हणून देण्यात आला. तेली खडूची रंग पेटी भेटवस्तू म्हणून देण्यात आली. शिशुरंजन गटातील विद्यार्थिनींना स्टीलचे ताट भेट म्हणून देण्यात आले. अशाप्रकारे अतिशय उत्साहामध्ये शाळेची सुरुवात झाली.

Shalecha pahila divs Shalecha pahila divs Shalecha pahila divs Shalecha pahila divs Shalecha pahila divs Shalecha pahila divs Shalecha pahila divs

मागील वर्षातील विशेष उपक्रम व क्षणचित्रे