HHCP Girls' Highschool

इयत्ता
५ वी ते १० वी

माध्यम
सेमी इंग्रजी व मराठी
(गणित आणि विज्ञान विषय इंग्रजीमधे शिकवले जातात)

५ वी ते १० वी च्या प्रत्येक इयत्तेमधे ६ तुकड्या आहेत.
सेमी इंग्रजी: ३ तुकड्या मराठी माध्यम: ३ तुकड्या

शाळेची वेळ
(सन २०१८- १९ पासून शाळेच्या वेळात पुढीलप्रमाणे बदल झाला आहे)
इ. ५ वी ते ८ वी: दुपारी १२.३० ते ५.४०
इ. ९ वी व १० वी: सकाळी ७.३० ते १२.१५


पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
गुरुवार व शनिवार शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर इतर दिवशी भेटायचे असल्यास पूर्व कल्पना द्यावी.

पालकांसाठी शालेय कचेरीची वेळ
मंगळवार, बुधवार व गुरुवार ११ ते २

शाळेचा पत्ता
एच.एच.सी.पी. हायस्कूल फॉर गर्ल्स, हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे – ३०

फोन नं
०२०-२४४५५८२१

ईमेल आयडी
headmistress_hhcp@yahoo.in

श्रीमती सीमा मांधाता झोडगे,
मुख्याध्यापिका
B.Sc., B.Ed

शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, शारिरीक शिक्षण, संगणक, चित्रकला, शिवण, गाईड, पर्यावरण, कार्यानुभव, गायन, कलारसास्वाद (चित्रकला, शिवण, पाककला).

शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ मधील एकूण विद्यार्थीनी: २२२०
शिक्षक कर्मचारी : ५९
शिक्षकेतर कर्मचारी:
१४

विविध विभाग

 • भाषा
 • विज्ञान व गणित
 • सामाजिक शास्त्र
 • वनिता समाज
 • स्वराज्यसभा
 • क्रीडा विभाग
 • वैकल्पिक विषय विभाग
 • सहल विभाग
 • ग्रंथालय
 • स्वच्छता विभाग
 • कलारसास्वाद विभाग

Establishment: 2nd october 1884

First Girls' High school in Maharashtra, second Girls' High school in India for secondary education of Girls. (First had been established in Kolkata)

Established by the great visionary, social workers and liberal scholars like Justice Ranade, Shri. Ramkrishna Bhandarkar, Shri V.A.Modak, Shri. Pandit who realized the importance of women's education.

स्थापना: २ ऑक्टोबर १८८४

मुलींच्या माध्यमिक शिक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा, भारतातील दुसरे मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय. (प्रथम कोलकाता येथे स्थापन करण्यात आली होती)

महान द्रष्ट्या, सामाजिक कार्यकर्ते आणि उदारमतवादी विद्वान न्यायमूर्ती रानडे, श्री. रामकृष्ण भांडारकर, श्री. व्ही. ए. मोडक, श्री. पंडित यांनी महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखुन शाळेची स्थापना केली.

  

इ ५ वी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा निकाल ( २०१७ - २०१८)
महाराष्ट्र राज्याचा निकाल : २३.०९ %
शाळेचा निकाल :

परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थिनी : १००
परीक्षेस अनुपस्थित विद्यार्थिनी : ०४
पात्र विद्यार्थिनी : ५४
अपात्र विद्यार्थिनी : ४२
शाळेचा शेकडा निकाल : ५८.०६

मार्गदर्शन वर्गाचा निकाल :
मार्गदर्शन वर्गाला येणाऱ्या विद्यार्थिनी : ६१
पात्र विद्यार्थिनी : ५२
अपात्र विद्यार्थिनी : ०९
मार्गदर्शन वर्गाचा शेकडा निकाल : ८५.२५

गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थिनी :

क्रमांक विद्यार्थिनीचे नाव गुण ( २९८ पैकी )
कु. शिंदे समृद्धी महादेव २२२
कु. मोटे दीक्षा सचिन २१२
कु. शेलार तृप्ती दशरथ २०६
कु. कुलकर्णी भार्गवी वैभव २००
कु. जाधव त्रिवेणी सचिन १९८

इ ८ वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा निकाल (२०१७ - २०१८)
महाराष्ट्र राज्याचा निकाल : १२.६४ %
शाळेचा निकाल :

परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थिनी : ५९
परीक्षेस अनुपस्थित विद्यार्थिनी : ०४
पात्र विद्यार्थिनी : २९
अपात्र विद्यार्थिनी : २६
शाळेचा शेकडा निकाल : ५२.७३

मार्गदर्शन वर्गाचा निकाल :
मार्गदर्शन वर्गाला येणाऱ्या विद्यार्थिनी : ३०
पात्र विद्यार्थिनी : २३
अपात्र विद्यार्थिनी : ०७
मार्गदर्शन वर्गाचा शेकडा निकाल : ७६.६७

गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थिनी :

क्रमांक

विद्यार्थिनीचे नाव

गुण
(२९८ पैकी)
कु. फिरोदिया सिद्धी २२४
कु. जाधव आर्या २२०
कु. शिंदे संस्कृती २०८
कु. तांबे श्रावणी २००
कु. बोराडे पायल, कु. ओसवाल रिया, कु. वणे गायत्री १९८

NMMS परीक्षा निकाल (२०१७ – २०१८)
परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थिनी : ३९
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी :

१. कु. धोकटे श्रावणी विनोद - जिल्ह्यात ४६ वी
२. कु. शिंदे संस्कृती दत्तात्रय - जिल्ह्यात १०६ वी
३. कु. दळवी ऐश्वर्या ऋषिकेश - जिल्ह्यात १०६ वी
४. कु. जाधव तन्वी अभिजित - जिल्ह्यात १२४ वी

MTS परीक्षेचा निकाल ( २०१७ – २०१८ )
परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थिनी : २०

इ ९ वीच्या : १६
इ १० वीच्या : ०४

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी :
१. कु. मणेरे सृष्टी विद्याचरण – गुण १४९ – जिल्ह्यात ७ वी
२. कु. पालकर निसर्गा नरेश – गुण १३९ – SPECIAL PRIZE
३. कु. शेख फिजा मुश्ताक – गुण १२८ – CONSOLATION PRIZE

Sports / Facilities

 • Hostel facility available for girls living outside Pune.
 • 2 big playgrounds, central assembly hall, spacious and well ventilated classrooms, 2 e-Learning rooms, well developed computer laboratories. 'Talwalkar Bhagini ICT computer lab' with latest version of computers for 9th and 10th std.
 • Grade subjects for 9th and 10th like music, drawing, art and craft, embroidering, electronics, home-science as well as personality development, vocational guidance, social work, Girl Guide, MCC.
 • Facility and special coaching is available for the games like Badminton, Volley ball, Throw ball, Basket ball, Kabaddi, Langdi, Swimming etc.
 • State level players - near about 180
 • National level players - near about 140

क्रीडा / सुविधा

 • पुण्याबाहेर राहणार्या मुलींसाठी वसतिगृह सुविधा.
 • २ मोठी क्रीडांगने, सेंट्रल असेंबली हॉल, प्रशस्त आणि हवेशीर वर्ग, २ ई-लर्निंग रुम्स, विकसित संगणक प्रयोगशाळा. ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थिनींसाठी नवीन आवृत्तीसह 'तळवलकर भगिनी आय. सी. टी. संगणक प्रयोगशाळा'.
 • ९ वी व १० वीच्या विद्यार्थिनींसाठी ग्रेड विषय उदा. संगीत, रेखाचित्र, कला आणि हस्तकला, ​​भरतकाम, इलेक्ट्रॉनिक्स, गृह-विज्ञान तसेच व्यक्तिमत्व विकास, व्यावसायिक मार्गदर्शन, सामाजिक कार्य, मुलींचे मार्गदर्शक, एम. सी. सी.
 • बॅडमिंटन, वॉली बॉल, थ्रो बॉल, बास्केट बॉल, कबड्डी, लंगडी, पोहणे इत्यादी खेळांची सुविधा आणि विशेष प्रशिक्षण उपलब्ध आहे.
 • राज्यस्तरीय खेळाडू - जवळपास १८०
 • राष्ट्रीय खेळाडू - जवळपास १४०

Donations / Schemes

 • There is 'Savitribai Phule Dattak Palak Yojana' for economically needy students. Under this scheme parents of our students can donate money as per their wish. This year 127 students got the benefit of this scheme.
 • 'Sawali Seva Trust' also donated the sum of Rs. 98,000/- for the needy students from the school and Jr. College.
 • For the establishment of 'Talwalkar Bhagini ICT computer lab' Dr.Yashwant Talwalkar from U.S.A donated amount of Rs. 8,25,000/-

देणग्या / योजना

 • आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थिनींसाठी 'सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना' आहे. या योजनेअंतर्गत आमच्या विद्यार्थिनींचे आई-वडील आपल्या इच्छेनुसार पैसे दान करू शकतात. यावर्षी १२७ विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला.
 • शाळा आणि ज्युनि. कॉलेजमधील गरजू विद्यार्थिनींसाठी 'सावली सेवा ट्रस्ट' ने रु. ९८,०००/- देणगी दिली.
 • 'तळवलकर भगिनी आय. सी. टी. संगणक प्रयोगशाळे' च्या स्थापनेसाठी यू.एस.ए. चे डॉ. यशवंत तळवलकर यांनी रू. ८,२५,०००/- देणगी दिली.
 

प्रजासत्ताकदिन

शनिवार दिनांक २६ जानेवारी २०१९ रोजी एच.एच.सी.पी.हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड प्रशालेत स्वतंत्र भारताचा ७० वा प्रजासत्ताकदिन अतिशय दिमाखात साजरा झाला. म. ग. ए. संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. श्रीमती विनायाताई देशपांडे, सदस्य मा. श्री. देवस्थळी सर, N.C.C. चे ऑफिसर मा. श्री. एस. एम. राम प्रकाश सर, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विविध विभागांचे मा. मुख्याध्यापक, उप.मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग तसेच शिशुमांदिरपासून महाविद्यालयापर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थिनी, त्यांचे पालक बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते धवजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर घोषपथकाने अतिशय तालबद्ध असे राष्ट्रगीत सादर केले. हुजूरपागा परिवारातील सर्व विभागातील विद्यार्थीनींनी ध्वजगीत सादर केले. त्यानंतर दिमाखदार असे संचलन होऊन मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. या संचलनात N.C.C. सीनिअर व ज्युनिअर विंग, शालेयमंत्रिमंडळ, घोष पथक तसेच हुजूरपागेचा झेंडा कायम उंचावत नेणाऱ्या विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांच्या विविध पथकांनी नेत्रदीपक अशी मानवंदना दिली. भारत अर्थात विविधतेत एकता... भारताच्या विविध प्रांतातील वेशभूषा सादर केलेल्या विद्यार्थीनींनी अनोखी मानवंदना देऊन कार्यक्रमास उठाव आणला. उपस्थितांनी संविधानाचे वाचन करून भारतीय संविधानाचे स्मरण केले. हुजूरपागापरिवारातील शिक्षकवृंदाने देशभक्ती जागृत करणारे समूहगीत सादर केले. वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाषण करण्याच्या सुवर्णसंधीचा मान कु. वेदिका कडू, ९ब च्या विद्यार्थिनीस मिळाला.

संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. श्रीमती विनायताई देशपांडे, N.C.C. चे ऑफिसर मा. श्री. राम प्रकाश सर यांनी विद्यार्थिनींशी सुसंवाद साधून सर्वानाच देशाप्रती असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली. इटली वरून भारत भेटीस आलेल्या खास पाहुण्या मिस. एलिना यांनी देखिल भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी कॅलेस्थेनिक्स, लेझिम, लोकनृत्य अशा विविध कला क्रीडांची अप्रतिम प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली. या सर्व कार्यक्रमासाठी मराठी व इंग्रजी विभागांचे मा. मुख्याध्यापक, मा. उप.मुख्याध्यापक, मा. पर्यवेक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

वार्षिक स्नेहसंमेलन

एच.एच.सी.पी.हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०१८ या कालावधीत उत्साहाने पार पडला. इ.५वी ते १०वी च्या विद्यार्थिनींनी विविध नृत्ये व नाटीकांमधून आपली कला सादर केली. तसेच गुणी विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले. सर्व रंजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शानाखाली केले.

शनिवार दिनांक २२ डिसेंबर २०१८ रोजी स्नेहसंमेलनाचा मुख्य दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ वृतपत्र समूहाचे मा. मल्हार अरणकल्ले सर , तसेच म.ग.ए. संस्थेच्या आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.शामाताई जाधव, संस्थेचे सर्व सन्मानीय पदाधिकारी मा. रविंद्र साळुंके सर, मा. रमाकांत सोनावणी सर, मा. जयश्रीताई बापट उपस्थित होते. प्रशालेच्या मा. मुख्याधापिका सीमा झोडगे, उप.मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.

जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणतीही अशक्य गोष्ट सहजसाध्य करता येते. विद्यार्थिनींनी भरपूर अभ्यास करून शाळेचा नावलौकिक असाच उंचवावा असे मोलाचे मार्गदर्शन मा. मल्हार अरणकल्ले सरांनी केले. शाळेत विज्ञान, कला आणि क्रीडा प्रदर्शन ही भरविण्यात आले होते.

यावेळी इ.८वी अ मधील विद्यार्थिनी कु. गौरी चंदनशिवे या विद्यार्थिनीने इ. ५वी ते १०वी च्या मनोरंजन कार्यक्रमांच्या कार्यक्रमपत्रिका तयार केल्या होत्या. सूत्रसंचालन तसेच महाराष्ट्राची लोकधारा व भारतीय लोकनृत्ये या संकल्पनेवर आधारीत उत्कृष्ट रंगमंच सजावट शिक्षक व विद्यार्थिनींनी केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सई नेर्लेकर यांनी केले. मा. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्रीमती सुधा कांबळे यांनी करून दिली. ज्यु. कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती शिल्पा वडके यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे, मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती मंगला वाघमोडे, मा. पर्यवेक्षिका श्रीमती रंजना वाठोरे, श्रीमती वसुधा कुलकर्णी, श्रीमती हेमलता भूमकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

वार्षिक स्नेहसंमेलन वार्षिक स्नेहसंमेलन वार्षिक स्नेहसंमेलन वार्षिक स्नेहसंमेलन

हुजूरपागा माध्यमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड प्रशालेमध्ये दिनांक १५-१०-२०१८ रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी व विद्यार्थिनींमध्ये वाचन संस्कृतीची अभिरुची निर्माण व्हावी ह्या हेतूने इ. ५ वी ते १० वी मधील सर्व विद्यार्थिनींनी अवांतर पुस्तकांचे वाचन केले.
मा. उप. मुख्याध्यापिका श्रीमती मंगला वाघमोडे ह्यांच्या हस्ते मा. डॉ. अब्दुल कलाम ह्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. डॉ. अब्दुल कलाम ह्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ग्रंथालयात भरवण्यात आले. शिक्षकांनी, विद्यार्थिनींनी अभिवाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला. विद्यार्थिनींना प्रत्येकी एक अशी इ. ५ वी ते १० वी साठी अवांतर वाचनाची पुस्तके वाचण्यासाठी शाळेत उपलब्ध करून दिली. विद्यार्थिनींनी वाचलेल्या पुस्तकाचे, लेखकाचे नाव, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, आशयाची स्वतःच्या वहीत वर्णनात्मक नोंद केली.
मा. उप. मुख्याधापिका श्रीमती मंगला वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पर्यवेक्षिका श्रीमती वसुधा कुलकर्णी, मा. पर्यवेक्षिका श्रीमती हेमलता भूमकर तसेच सर्व शिक्षक ह्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन

शिष्यवृत्ती

एच. एच. सी .पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड प्रशालेत शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनींचा कौतुक समारंभ गुरूवार दिनांक, ०४-१०-२०१८ रोजी पार पडला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. हनुमंत कुबडे सर (राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक) तसेच अध्यक्ष म्हणून पालक शिक्षक संघाचे मा. प्रविण गुरव सर, म. ग. ए. संस्थेचे मा. सभासद श्रीयुत रमाकांत सोनवणी सर, प्रशालेच्या मा. उप. मुख्याध्यापिका श्रीमती मंगला वाघमोडे बाई, मा. यशवंत बेंद्रे सर, प्रशालेच्या पर्यवेक्षिका मा. वसुधा कुलकर्णी, मा. हेमलता भूमकर, सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते. यावेळी इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यावृतीप्राप्त विद्यार्थिनी तसेच MTS, NMMS आणि I-Qube परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. या विद्यार्थिनींना श्रीमती वीर अश्विनी, श्रीमती कांबळे कविता, श्रीमती गवते वैशाली, श्रीमती सोनवलकर, श्रीमती माधुरी पन्हाळे, श्रीमती अनघा केळकर, श्रीमती रेखा बोरा, श्रीमती नीता देशमुख ह्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. मा. उप. मुख्याधापिका मंगला वाघमोडे ह्यांनी निकाल वाचन केले.

शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती

वर्धापनदिन

२ ऑक्टोबर २०१८ रोजी म. ग. ए. संस्थेचा १३४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध ओन्कॉलोजीस्ट डॉ. अनुराधा सोवनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. श्यामाताई जाधव यांनी भुषविले. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुरेल स्वरात शालामाता गीत व वैष्णव जन तो या भजनाने झाली. संस्थेच्या सचिव मा. श्रीमती रेखाताई पळशीकर यांनी संस्थेच्या सर्व शाखातील गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थिनींची नावे जाहीर केली व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. अनुराधा सोवनी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या प्रभारी कोषाध्यक्ष उषाताई वाघ यांनी केले. संस्थेच्या स्थापनेपासुन ते आजपर्यंत १३४ वर्षात झालेल्या संस्थेच्या प्रगतीचा अहवालाचे वाचन केले. एच. एच. सी. पी. हायस्कूल लक्ष्मी रोड च्या पर्यवेक्षिका मा. श्रीमती हेमलता भूमकर यांनी प्रमुख पाहुणे व संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती श्यामाताई जाधव यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्र संचलन कात्रज माध्यमिक विभागाच्या श्रीमती साधना घोडके यांनी केले. समाजातील कोणत्याही वयाच्या व्यक्तीला cancer होऊ शकतो. डॉ. च्या सल्ल्याने वारंवार होणाऱ्या वेदनांची तपासणी केली पाहिजे. ताणतणावामुळे सुद्धा cancer पेशींची वाढ होऊ शकते, त्यामुळे स्ट्रेस मँनेजमेंट करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन डॉ. अनुराधा सोवनी यांनी केले.

वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन वर्धापनदिन

लायन्स क्लब

लायन्स क्लब ऑफ पुना तर्फे आयोजित आपल्या प्रशालेच्या गुणी विद्यार्थिनींनी मध्यम गटाच्या विजेतेपदाचा करंडक पटकावला. या स्पर्धेत शमिका महामुनी आणि ऋता सप्तर्षी या दोघींचा विभागातून दुसरा नंबर आला, तर कनिष्ठ गटात सुहानी चव्हाण तिसरा नंबर आणि वरिष्ठ गटात रिया ओसवाल हिचा तिसरा नंबर आला.
या सर्व विद्यार्थिनींना मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे, मा. पर्यवेक्षिका श्रीमती हेमलता भूमकर (वनिता समाज) तसेच शाळेतील शिक्षिका श्रीमती कविता माळवदे यांचे मार्गदर्शन लाभले.

लायन्स क्लब लायन्स क्लब लायन्स क्लब

हुजूरपागा स्वच्छ भारत पंधरवडा साजरा

१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत हुजूरपागा प्रशालेत ‘स्वच्छ भारत पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचाही मोठा सहभाग होता. शालेय व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक कार्यकारिणी यांची सभा घेऊन कार्यक्रमाचे नियोजन सांगण्यात आले. त्यांनी सुचवलेल्या सूचनांचे, कार्यक्रमांचे स्वागत केले. दि. १ सप्टेंबर रोजी सगळ्यांच्या सहकार्याने नियोजनपूर्वक संपूर्ण शाळेची स्वच्छता केली.
खूप उत्साहाने व आनंदाने विद्यार्थिनींनी शालेय स्वच्छता केली. बॅनर्स तयार करून लावले, रोज स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली, मधल्या सुट्टीत स्वच्छता गीत ऐकवले, विद्यार्थिनींनी ठिकठिकाणी सुंदर फलक लेखन केले, स्वच्छतादूतांची नेमणूक करून त्यांनी सर्वत्र देखरेख ठेवली.
घरातील साफसफाई करून विद्यार्थिनींनी पालकांना मदत केल्याचे फोटोही सादर केलेत, इयता ९ वी च्या विद्यार्थिनींसाठी चिन्मय हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ. राधा संगमनेरकर यांनी स्वच्छता व आरोग्य यांचा घनिष्ट संबंध स्पष्ट केला. मासिक पाळी संबंधीच्या समज-गैरसमज याविषयी विद्यार्थिनींनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. तसेच मा. श्रीयुत प्रमोद तांबे यांनी ओल्या कचऱ्यापासून खत करून फुलवलेल्या बागेचे महत्व, घरच्या घरी कम्पोस्ट खत, गांडूळ खत, बायोगॅस निर्मिती करण्याविषयी सविस्तर सांगितले. विविध उपक्रमांचे आयोजन केले जसे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण केले.
प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती नातू यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती हा उपक्रम राबवित आहेत. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती ज्योती महाजन, श्रीमती सुधा कांबळे, श्रीमती माधुरी दोडकर, श्रीमती सुनंदा कांबळे, श्रीमती ज्योती गोरे यांनी मा. मुख्याधापिका सीमा झोडगे, मा. उप. मुख्याधापिका मंगला वाघमोडे व मा. स्वाती भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने उत्तमरित्या पार पडले.

स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा स्वच्छ भारत पंधरवडा

कमवा – शिका उपक्रम

एच. एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा प्रशालेत कमवा - शिका चे ६ वे वर्ष आहे. विद्यार्थिनी स्वतः वस्तू बनवून स्वतः च शाळेत विकतात. त्यातून जमा झालेल्या रक्कमेद्वारे दुर्मिळ ग्रामीण भागातील शाळांना भेट दिली जाते. ही भेट कधी पुस्तक रुपात तर कधी शालेय उपक्रम साहित्याच्या रुपात दिली जाते. शाळेतील मा. पर्यवेक्षिका हेमलता भूमकर गेली ६ वर्षे हा प्रकल्प राबवत आहेत.

 कमवा – शिका कमवा – शिका कमवा – शिका कमवा – शिका

शिक्षकदिन

५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. एच. एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा प्रशालेत विद्यार्थिनी स्वराज सभेअंतर्गत हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मा. श्रीमती स्नेहा गायकवाड तसेच अध्यक्षा म्हणून पालक - शिक्षक संघाच्या अध्यक्षा मा. श्रीमती सुजाता गाजेंगी तसेच प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका सीमा झोडगे, मा. उप. मुख्याधापिका मंगला वाघमोडे, पर्यवेक्षिका मा. रंजना वाठोरे, मा. वसुधा कुलकर्णी, मा. हेमलता भूमकर उपस्थित’ होत्या. इयता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका उत्तमपणे पार पडल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पथनाट्य, नृत्याविष्कार आणि चित्रकला सादरीकरण केले.
स्वच्छता पंधरवड्या निमित्त वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता तसेच गुरु - शिष्य परंपरा दाखवणारी चित्रांची सजावट इयता ९ वी मधील मंत्रिमंडळतील विद्यार्थिनींनी केली. प्रमुख पाहुण्या मा. श्रीमती स्नेहा गायकवाड यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. शालेय जीवनात शिक्षकांनी केलेले संस्कार कसे जीवनभर उपयोगी पडतात ते संगितले.
स्वराजसभा पर्यवेक्षिका मा. श्रीमती वाठोरे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्वराजसभा प्रमुख श्रीमती सोळंके, श्रीमती गडदे, श्रीमती वीर ह्यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थिनी शिक्षकदिन अतिशय उत्साहात साजरा केला.

शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन शिक्षकदिन

एच.एच.सी.पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड प्रशालेत NCC ज्युनिअर विंग आणि NCC सिनीअर विंग या दोन्ही विभागातून सर्जीकल स्ट्राईक डे साजरा....

एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड प्रशालेत NCC ज्युनिअर विंग आणि NCC सिनीअर विंग या दोन्ही विभागातून शनिवार दि. २९-०९-२०१८ रोजी सर्जीकल स्ट्राईक डे साजरा करण्यात आला. प्रथम एच. एच. सी. पी. हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती स्वाती भिडे यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका मा. श्रीमती मंगल वाघमोडे आणि मा. पर्यवेक्षिका श्रीमती रंजना वाठोरे यांनी फित कापून रॅलीला सुरुवात केली. सिनीअर विंगच्या कॅडेट्सने प्लास्टिक वापर करू नये या विषयावर नुक्कड नाटक सादर केले. ज्युनिअर विंगच्या साठ कॅडेट्स आणि सिनीअर विंगच्या पन्नास कॅडेस रॅलीत सहभागी झाल्या होत्या. हुजूरपागा प्रशाला, लक्ष्मी रोड ते शनिवारवाड्यापर्यंत रॅली काढण्यात आली. शनिवारवाड्याची सफाई करण्यात आली, घोषणा देण्यात आल्या. सर्जीकल स्ट्राईक याविषयावर मॉर्डन महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. सौ. निशा किशोर भंडारे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले. कमांडो प्रशिक्षणातूनच नाही तर स्वतः सजग राहून स्वतःचे संरक्षण केले पहिजे हे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, आपण निडर असायला हवे सांगितले. रॅलीमध्ये ज्युनिअर विंगच्या ऑफिसर सौ. संध्या प्र. पंचमुख, सिनीअर विंगच्या लेफ्टनंट सौ. प्रज्ञा तावडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.

NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC NCC

७२ वा स्वातंत्रदिन

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या हुजूरपागा लक्ष्मी रोडवरील रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, शिशुमंदिर, एच. एच. सी. पी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, महिला वाणिज्य महाविद्यालय तसेच हुजूरपागा इंग्रजी माध्यम या सर्व शाखांनी मिळून ७२ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा केला. यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव, संस्थेचे मा. श्री. रमाकांत सोनावणी सर, महिला वाणिज्य महाविद्यालयाचे श्री. बैरागी सर, हुजूरपागा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे, रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती साधना जक्कल, श्रीमती स्वाती भिडे, श्रीमती रानडे, हुजूरपागा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती निलिमा वळामे उपस्थित होत्या. पालक शिक्षक संघाचे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सभासदही यावेळी उपस्थित होते.
मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी एन. सी. सी. ज्युनिअर व सिनिअर विंग प्लाटून्स, स्वराज्यसभा मंत्रीमंडळाने उत्कृष्ट संचलनाद्वारे ध्वजाला व उपस्थितांना मानवंदना दिली. हुजूरपागा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील NCC कॅडेट्सना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल रँक प्रदान करण्यात आले.
शालेय मंत्रीमंडळाचे पंतप्रधान कु. ईश्वरी कुलकर्णी हिने "शालेय शिस्त, स्वच्छता तसेच अभ्यास" या विषयावर भाषण केले. यानिमित्त विद्यार्थिनींनी देशाभिमान व देशभक्ती जागृत करणारी सजावट केली होती. "वंदे मातरम्" या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर विद्यार्थिनींना खाऊवाटप करण्यात आले. श्रीमती शिवांगी मलगुंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन ७२ वा स्वातंत्रदिन

मेहंदी रेखाटन स्पर्धा

सोमवार दिनांक १३ व मंगळवार दिनांक १४ ऑगस्ट २०१८, रोजी एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे ३० प्रशालेत वनितासमाज अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींसाठी मेहंदी रेखाटन स्पर्धा हा उपक्रम राबवण्यात आला. ह्या उपक्रमाला विद्यार्थिनींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे , मा. उप. मुख्याध्यापिका मंगला वाघमोडे आणि सर्व मा. पर्यवेक्षिका ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व सहभागी विद्यार्थिनींचे मा. मुख्याध्यापिका ह्यांनी कौतुक केले.

मेहंदी रेखाटन स्पर्धा मेहंदी रेखाटन स्पर्धा
मेहंदी रेखाटन स्पर्धा मेहंदी रेखाटन स्पर्धा

इको फ्रेंडली राखी कार्यशाळा

पुणे नगर वाचनालयातर्फे इको फ्रेंडली राखी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत एच. एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड प्रशालेतील इ. ७ वी तील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. मुलींनी अतिशय सुंदर राख्या बनवल्या. या कार्यशाळेत विद्यार्थिनींबरोबर श्रीमती दिक्षित सहभागी झाल्या.

इको फ्रेंडली राखी कार्यशाळा इको फ्रेंडली राखी कार्यशाळा इको फ्रेंडली राखी कार्यशाळा इको फ्रेंडली राखी कार्यशाळा इको फ्रेंडली राखी कार्यशाळा इको फ्रेंडली राखी कार्यशाळा

P.G.S.S.A. स्पर्धा

पूना गर्ल्स स्कूल स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या प्रथम सत्रातील योगासन स्पर्धेमध्ये एच. एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, प्रशालेस तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेतील विद्यार्थिनींना श्रीमती सोनवलकर यांनी मार्गदर्शन केले.

P.G.S.S.A. स्पर्धा P.G.S.S.A. स्पर्धा

पूना गर्ल्स स्कूल स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या प्रथम सत्रातील सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये एच. एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, प्रशालेस तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेतील विद्यार्थिनींना श्रीमती सोळंके यांनी मार्गदर्शन केले.

पूना गर्ल्स स्कूल स्पोर्ट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या प्रथम सत्रातील जलतरण स्पर्धेमध्ये एच. एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, प्रशालेस उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेतील विद्यार्थिनींना श्रीमती गिरमे यांनी मार्गदर्शन केले.

विज्ञान मंडळ उदघाटन (२०१८-१९)

एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे ३० प्रशालेत दिनांक ३१ जुलै रोजी विज्ञान मंडळा अंतर्गत विज्ञान मंडळ २०१८-१९ चे उदघाटन संपन्न झाले. वैज्ञानिक मा. श्रीमती अंकिता नगरकर प्रमुख पाहुणे म्हणून तसेच मा. श्रीमती शामाताई जाधव ह्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. अंकिता नगरकर यांनी १६ व्या वर्षीच संशोधनाला सुरुवात केली. २४ व्या वर्षापर्यंत त्यांच्या नावावर ८ पेटंटस जमा झाले आहेत. इयत्ता ८ वी मधील यशिका शेट्टी हिने चांद्रयान अग्निबाणाची प्रतिकृती तयार केली होती. इ. ५ वी ते १० वी च्या ६० विद्यार्थिनींनी बनवलेल्या विविध खेळणी, रोबो, प्रकल्पांचे प्रदर्शन भरवले होते. या विद्यार्थिनींना सर्व शास्त्र शिक्षकांचे सहकार्य मिळाले. या प्रसंगी मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे, मा. उप. मुख्याध्यापिका मंगला वाघमोडे आणि सर्व मा. पर्यवेक्षिका माधुरी पन्हाळे याच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन रिया ओसवाल हिने केले. निसर्गा पालकर हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला तर गायत्री पाटील हिने आभार मानले.

विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन विज्ञान मंडळ उदघाटन

सकाळ यंग बझ तर्फे उपक्रम

बुधवार दिनांक २५ जुलै २०१८ रोजी एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे ३०, इयत्ता ७वी च्या विद्यार्थिनींसाठी सकाळ यंग बझ तर्फे उपक्रम राबवण्यात आला. मा. प्रा. राव यांनी विद्यार्थिनींना आर्यभट्ट या उपग्रहाचे मॉडेल पेपर फोल्डींग पद्धतीने तयार करण्यास शिकवले. श्रीमती विजया नार्वेकर यांनी मानवी सांगाड्याची प्रतिकृती तयार करण्यास शिकवले तसेच हाडांची व सांध्यांची माहिती विद्यार्थिनींना दिली. ह्या दोन्ही उपक्रमांना श्री. पियुष टांकसाळे ह्यांचे सहकार्य लाभले. मा. मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे, मा. उप. मुख्याध्यापिका मंगला वाघमोडे आणि सर्व मा. पर्यवेक्षिका ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ यंग बझ

आंतरराष्ट्रीय योगा दिन

एच. एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे ३० प्रशालेत दिनांक २१ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला गेला. इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींना योगासने व प्राणायाम यांचे महत्व सांगण्यात आले आणि त्यांच्या कडून शास्त्रोक्त पध्दतीने सूर्यनमस्कार व योगासने यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी मा. श्रीमती संध्या गायकवाड या उपस्थित होत्या व विद्यार्थिनींबरोबर मा. प्रमुख पाहुणे, मा. मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले.

 योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन योगा दिन

स्वराज्यसभा नवनिर्वाचित मंत्रीमंडळ शपथविधी २०१८-१९

शुक्रवार दिनांक २० जुलै २०१८ रोजी एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे ३० प्रशालेत सकाळी ११.०० वाजता स्वराज्यसभे अंतर्गत नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी व मावळत्या मंत्रीमंडळाचा निरोप समारंभ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, पुणे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव उपस्थित होत्या. प्रशालेच्या मा. उप. मुख्याध्यापिका. श्रीमती मंगला वाघमोडे यांनी नवनिर्वाचित मंडळास गोपनीयतेची व पदाची शपथ दिली. मा. सुरज मांढरे यांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थीनींचा सर्वांगीण विकास तसेच बदलत्या सामाजिक जीवनाशी जुळवून घेण्याची क्षमता शाळेतील विविध उपक्रमांतून होते. सुसंस्कृत नागरिक घडविण्याचा संस्कार हा शाळेतील उपक्रमातून घडतो. त्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शामाताई जाधव यांनी विद्यार्थीनींना आज निर्भयतेने सर्व सामाजिक घटकांना सामोरे जाण्याची वृत्ती अंगी बाळगावी हा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.पर्यवेक्षिका श्रीमती रंजना वाठोरे यांनी केले.

शपथविधी शपथविधी शपथविधी शपथविधी शपथविधी शपथविधी शपथविधी शपथविधी शपथविधी

स्वराज्यसभा वर्गप्रतिनिधी निवडणूक २०१८-१९

स्वराज्यसभा वर्गप्रतिनिधी निवडणूक २०१८-१९, बुधवार दिनाक ४ जुलै २०१८ रोजी संपन्न झाली. इयता ५ ते १० वी मधील विद्यार्थिनींना निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते आणि प्रत्यक्ष गुप्त मतदान कसे होते ह्याचा अनुभव प्राप्त झाला. निवडून आलेल्या वर्गप्रतिनिधींमधूनच शालेय नवनिर्वाचित मंत्रीमंडळाची स्थापना होते.

निवडणूक निवडणूक
निवडणूक निवडणूक

इयत्ता १० वी माध्यमिक शालांत परीक्षा निकाल (२०१७ - २०१८)

इ १० वी एकूण विद्यार्थिनी : ३९९

परीक्षेस बसलेल्या विद्यार्थिनी : ३९९

उत्तीर्ण विद्यार्थिनी : ३९६

उत्तीर्णांची टक्केवारी : ९९.२४

विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थिनी
(७५ किंवा त्यापेक्षा जास्त %) : १८४

प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी ( ६० % - ७४.९९%) : १३९

द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी (४५%- ५९.९९%) : ६४

उत्तीर्ण श्रेणी प्राप्त विद्यार्थिनी ( ३५% - ४४.९९ %) : ९

क्र.

विद्यार्थिनीचे नाव

प्राप्त गुण

१.

कु . सिद्धी जाधव

९६ %

२.

कु. संजना कोकीळ

९५.८० %

३.

कु . मृण्मयी भंडारे

९५.६० %

४.

कु. श्रेया लोहकरे

९५.४० %

५.

कु. गौरी खटावकर, कु. स्वामिनी देशमाने

९५ %


इ १० वी निकाल

इ १० वी निकाल

Srushti Manere - Topped the I-Qube Scholarship Examination

क्रीडा सप्ताह

एच.एच.सी.पी.हायस्कूल हुजूरपागा लक्ष्मी रोड प्रशालेत दिनांक १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. या क्रीडासप्ताहासाठी प्रमुख पाहुण्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी कबड्डीपटू श्रीमती केतकी फाटक होत्या. प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका श्रीमती सीमा झोडगे, मा.उप.मुख्याधापिका मंगला वाघमोडे, मा.क्रीडापर्यवेक्षिका श्रीमती वसुधा कुलकर्णी, मा. पर्यवेक्षिका श्रीमती रंजना वाठोरे, मा.पर्यवेक्षिका श्रीमती हेमलता भूमकर तसेच सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

राष्टीय खेळाडू कु.मनस्वी अदुंरकर, सृष्टी जराड, जान्हवी कदम, मुग्धा धर्माधिकारी, कनिष्का दुधगी या क्रीडा ज्योत घेऊन आल्या. टाळ्यांच्या गजरात क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. प्रमुख पाहुण्या श्रीमती केतकी फाटक यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. शालेयक्रीडामंत्री कु. श्रेया एडके इयत्ता ८-क, हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली. प्रशालेच्या मा.मुख्याधापिका श्रीमती सीमा झोडगे ह्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. श्रीमती संध्या पंचमुख ह्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा.क्रीडापर्यवेक्षिका श्रीमती वसुधा कुलकर्णी ह्यांनी क्रीडासप्ताहाचे महत्त्व आणि खेळामुळे होणारे फायदे ह्याचे महत्व पटवून दिले. श्रीमती केतकी फाटक ह्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय जीवनातील खेळाचे महत्त्व, अभ्यास आणि खेळ ह्यांची सांगड कशी घालावी ह्याविषयी विचार मांडले.

मा.प्रमुख पाहुण्यांचे आभार क्रीडाप्रमुख श्रीमती संगीता वाघमारे ह्यांनी मानले. सर्व क्रीडास्पर्धा चार कुलांमध्ये घेण्यात आल्या. स्पर्धांचे पंच श्रीमती सीमा पवार ह्या होत्या.

दिनांक १२/१२/२०१८ ते दिनांक १५/१२/२०१८ ह्या कालावधीत इयता ५वी ते१०वी या वर्गांमध्ये आंतरकुलक्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या कुलांना स्नेहसंमेलनाच्या दिवशी बक्षीस देण्यात आले. सर्व कुलांमध्ये विजयी कुल अंबुजा व सरोजा ठरले. विजयी कुलांना ढाल देऊन गौरवण्यात आले.

आंतरकुलस्पर्धांमुळे चांगले खेळाडू घडतात. संघ भावना जोपासली जाते.

सर्व क्रीडास्पर्धांसाठी मा.मुख्याधापिका, मा.उप.मुख्याधापिका तसेच क्रीडा पर्यवेक्षिका ह्यांचे मार्गदर्शन मिळाले.

क्रीडा सप्ताह क्रीडा सप्ताह क्रीडा सप्ताह क्रीडा सप्ताह क्रीडा सप्ताह क्रीडा सप्ताह क्रीडा सप्ताह क्रीडा सप्ताह

कु. मुग्धा धर्माधिकारी इ. ९ वी तील विद्यार्थिनी हिने गोवा येथे झालेल्या 'NATIONAL TAEKWONDO CHAMPIONSHIP' स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.

Mugdha Dharmadhikari - NATIONAL TAEKWONDO CHAMPIONSHIP WINNER

Some of our well-known Alumni doing extra ordinary work in different fields.

Sr.no.NameField
1Dr. Irawati KarveWriter and researcher
2Dr. Manda Khandgewriter
3Shrimati Shanta Shelkepoetess
4Shrimati Smita Talwalkaractress
5Shrimati Reema Laguactress
6Shrimati Mrunal Kulkarniactress
7Shrimati Aruna Dherewriter
8Shrimati Sanjivanji Bokilpoetess
9Shrimati Shirish Paipoetess
10Shrimati Sarojini Vaidyawriter
11Shrimati Dipti Chavdharipolitics
12Shrimati Rupali Thombre Patilpolitics
13Dr. Rohini Godboleresearcher
14Dr. Prachi Sathemedical
15Dr. Pratibha Dandvatemedical
16Dr. Kalpana Joshiresearcher
17Shrimati Sampada MehtaIAS Officer
18Shrimati Sonali PonksheIAS Officer
19Shrimati Madhurani Gokhaleactress