हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा

इयत्ता
८ वी ते १० वी

माध्यम
सेमी इंग्रजी व मराठी

शाळेची वेळ
दुपारी १२:४० ते ५:५०

पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
१२:०० ते १२:३०

शाळेचा पत्ता
हुजूरपागा कात्रज माध्यामिक शाळा
राजस सोसायटी, कात्रज

फोन नं
०२०-२६९६०२२३

ईमेल आयडी
hujurpagakatraj@yahoo.in

शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, शारिरीक शिक्षण, संगणक, चित्रकला, शिवण, गाईड, समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण, कार्यानुभव.

मुख्याध्यापिका
श्रीमती विद्या नामदेव गालिंदे
M.A., M.Ed.

शाळेचा इतिहास व उद्देश

महाराष्ट्र गर्ल्स एज्यूकेशन सोसायटीने पुण्याच्या भोवतालच्या उपनगरीय भागातील मुलींच्या शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन कात्रज येथील राजस सोसायटी मध्ये १९९१ साली हुजूरपागा कात्रज शाळा सुरु केली. ही शाळा राजस सोसायटी मधील बंगल्यामध्ये भरत होती. २६ जानेवारी १९९५ साली याच जागेवर शाळेची इमारत बांधली.
जून १९९६ पासून ५ वी व ८ वी चे वर्ग सुरु झाले.
१९९७ - मध्ये शाळेची दुसरी इमारत बांधून पूर्ण झाली
१९९९ - इयत्ता १० वी एस.एस.सी. परीक्षा पास होऊन पहिली बॅच बाहेर पडली.
२००४ - ११ वी वाणिज्यचे वर्ग सुरु करण्यात आले.
२०११ - उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) चे ११ वी चे वर्ग सुरु करण्यात आले.

शाळा प्रवेशासंबंधी माहितीसाठी इथे क्लिक करा

२०१८-१९ मधील विशेष उपक्रम

२०१७-१८ एस. एस. सी. बोर्ड परीक्षा निकाल


२०१७-१८ एस. एस. सी. बोर्ड परीक्षा निकाल

S.S.C Result S.S.C Result

राज्याचा निकाल ८९.४१%
पुणे विभाग निकाल ९२%
परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थिनी १९६
उत्तीर्ण विद्यार्थिनी १९६
शेकडा निकाल १००%

शाळेतील गुणानुक्रमे क्रमांक

क्रमांक विद्यार्थिनीचे नाव शेकडा गुण
प्रथम (विभागून) कु. पांडे स्नेहा मोतीराम ९७.२०%
प्रथम (विभागून) कु. कामठे आकांक्षा राजेंद्र ९७.२०%
द्वितीय कु. गर्जे मयुरी संतोष ९६.४०%
तृतीय कु. महाजन पूर्वा अजय ९५.८०%
चौथा कु. चिंधे वैष्णवी रमेश ९५.६०%
पाचवा कु. अजगर गौरी गजानन ९५.२०%

कु. कामठे आकांक्षा राजेंद्र या विद्यार्थिनीला समाजशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत व एस.एस.सी बोर्डात समाजशास्त्र या विषयात प्रथम क्रमांक आणि रु १५००/- चे पारितोषक मिळाले.

परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थिनी विशेष योग्यता प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी पास श्रेणी एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनी
१९६ १०५ ६५ २२ ०४ १९६

स्नेहसंमेलन २०१८-१९

दिनांक २६/११/२०१८ रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अण्णा भाऊ साठे सभागृहात साजरे करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संशोधक मा. श्रीयुत श्रीनिवास सारंगपाणी होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.ग.ए. सोसायटीच्या सहसचिव मा. श्रीमती शालिनीताई पाटील होत्या. तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. श्रीयुत हरिश्चंद्र गायकवाड, संस्थेच्या उपाध्यक्षा मा. श्रीमती उषाताई वाघ, सचिव मा. श्रीमती रेखाताई पळशीकर, सभासद मा. श्रीयुत रमाकांत सोनावणे, नगरसेवक मा. श्रीयुत प्रकाशभाऊ कदम लक्ष्मी रोड व कात्रज शाळेतील सर्व विभागाच्या मा. मुख्याध्यापिका व प्राचार्य उपस्थित होते.

मा. प्रमुख पाहुणे श्रीयुत श्रीनिवास सारंगपाणी यांनी आपल्या संवादात “सर्जनतेवर माझा दृढ विश्वास आहे. फक्त शालेय शिक्षणात बांधले न जाता चालू प्रश्नांवर विचार करा. उत्तर नक्की सापडेल. तसेच तुम्ही सर्जनशीलतेला चालना दिली तर तुम्हाला यश मिळणारच.” असे व्यक्तव्य केले. त्याचबरोबर स्वतः घरी संशोधन करून तयार केलेल्या उपकरणांची माहिती विद्यार्थिनींना सांगितली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मा. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी “डॉक्टर इंजिनियर सोडून दुसरे काही करता येत नाही का? असा प्रश्न विद्यार्थिनींना केला” स्वतःची जिद्द वापरली तर कोठेही आपण कमी पडत नाही. त्याचबरोबर आमच्या विद्यार्थिनीही संशोधक होतील अशी खात्री देखील व्यक्त केली.

मा. मुख्याध्यपिका श्रीमती विद्या गालिंदे यांनी २०१८-२०१९चा आढावा व भरगोस यशाचे आपल्या अहवालातून सदरीकरण केले.

या प्रसंगी झालेल्या रंजन कार्यक्रमात विद्यार्थिनींनी “मृद् गंध मराठीचा” या संकल्पाने आधारित विविध नृत्य व नाटिकांमधून सादरीकरण केले. यामध्ये नांदी, भूपाळी, भारुड, पोवाडा, गोंधळ, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य, मी मराठी व वाऱ्यावरची वरात हे नाटक इ. समावेश होता.

या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती घोडके आणि इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनींनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीमाती महाले यांनी करून दिला. आभार प्रदर्शनाचे काम प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती फलटणे यांनी केले.

स्नेहसंमेलन २०१८-१९ स्नेहसंमेलन २०१८-१९ स्नेहसंमेलन २०१८-१९ स्नेहसंमेलन २०१८-१९ स्नेहसंमेलन २०१८-१९

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित क्रीडा स्पर्धा २०१८-१९

ड्रील स्पर्धा

सूर्यनमस्कार स्पर्धा

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने सूर्यनमस्कार स्पर्धेत – व्दितीय क्रमांक प्राप्त केला.

योगासन स्पर्धा

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने योगासन स्पर्धेत – तृतीय क्रमांक प्राप्त केला. कुमारी ऐश्वर्या कुंजीर (१० अ) हिने "उत्कृष्ट संघनायिका" हा मान पटकाविला.

कॅलेस्थनिक्स

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने कॅलेस्थनिक्स स्पर्धेत – प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुमारी ऐश्वर्या कुंजीर (१० अ) हिने "उत्कृष्ट संघनायिका" हा मान पटकाविला.

लेझीम स्पर्धा

पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या ४०० ते ८०० विद्यार्थिनी गटात आपल्या शाळेने लेझीम स्पर्धेत –प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुमारी यामिनी थेऊरकर (१० ब) हिने "उत्कृष्ट संघनायिका" हा मान पटकाविला.

लोकनृत्य स्पर्धा

प्रथम क्रमांक (चांदीची परडी)

सांघिक स्पर्धा

स्पर्धेचे नाव गट निकाल
लंगडी लहान गट विजयी संघ
कबड्डी लहान गट विजयी संघ
मारचेंडू लहान गट विजयी संघ
कबड्डी मध्यम गट विजयी संघ
मारचेंडू मध्यम गट विजयी संघ
थ्रोबॉल मध्यम गट विजयी संघ
कबड्डी मोठा गट विजयी संघ
खोखो मोठा गट विजयी संघ
थ्रोबॉल मोठा गट विजयी संघ
रिंग टेनिस मोठा गट विजयी संघ
सर्व साधारण बक्षिसे
सांघिक स्पर्धा लहान गट विजेते पद
सांघिक स्पर्धा मध्यम गट विजेते पद
सांघिक स्पर्धा मोठा गट विजेते पद
सर्व ड्रीलस्पर्धा उपविजेते पद
सांघिक खेळ सर्व खेळ सर्व गट विजेते पद

क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा

पाऊस धारा

दिनांक ५ सप्टेंबर २०१८ रोजी मराठी विभाग प्रमुख श्रीमती महाले यांनी इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थिनींच्या सहभागाने “पाऊस धारा” हा पावसाच्या विविध रुपांवरील आधारित एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला. यावेळी जेष्ठ कवियत्री शांता शेळके, इंदिरा संत तसेच कवी अनिल, पाडगांवकर, बा. भ. बोरकर यांच्या कवितांचे वाचन व गायन या स्वरुपात सादरीकरण करण्यात आले. तसेच सुनिता देशपांडे, दुर्गा भागवत यांच्या पुस्तकातील उता-याचे वाचन देखील करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाची आखणी, सूत्रसंचालन श्रीमती महाले यांनी केली. मा. मुख्याध्यापिका श्रीमती गालिंदे बाई यांनी यावेळी दोन कवितांचे वाचन केले. त्याच बरोबर या कार्यक्रमातील विद्यार्थिनींचे कौतुक केले. सुरेख बहारदार असा हा कार्यक्रम झाला. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनी व शिक्षकांनी याचा आनंद घेतला.

Paus dhara Paus dhara

असे साजरे झाले रक्षाबंधन

दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभागाच्या विद्यार्थीनींनी एका वेगळ्या प्रकारे “रक्षाबंधन” हा सण साजरा केला.
सुमती बालभवन निंबाळकरवाडी या शाळेतील मुलांना राखी बांधण्यात आली. हुजुरपागेच्या इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनी यात सहभागी झालेल्या होत्या. या शाळेतील वसतिगृहात एकल पालकत्वाची मुले (Single Parent) राहतात. तसेच ज्या मुलांची घरची परिस्थिती बिकट आहे व या मुलांचा शिक्षणाचा भार पेलू शकत नाहीत, ती मुले देखील येथे राहतात. या मुलांना विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या. तसेच स्वतःच्या खाऊच्या पैशातून आणलेले साहित्य, पुस्तके, पेन, स्केचपेन मुलांना दिले. शाळेच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी काही गाणी मुलांना म्हणून दाखवली. तसेच तेथील विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. या सर्व कार्यक्रमासाठी मा. मुख्याध्यापिका गालिंदे बाई यांनी मार्गदर्शन केले.

Rakshabandhan Rakshabandhan

गणित विभाग

"The one Foundation" यांच्या तर्फे ३० जुलै २०१८ रोजी शाळेत गणिती जत्रेचे आयोजन केले गेले. गणितातील संबोध, खेळ, प्रतीकृती यांच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विद्यार्थिनींनी गणित समजावून घेतले. इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला.

संस्कृत दिन

दिनांक १६/७/२०१८ रोजी शाळेमध्ये कालिदास दिन सजरा करण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यपिका मा. श्रीमती विद्या गालिंदे व जेष्ठ शिक्षिका श्रीमती फालाताने, श्रीमती भागवत यांनी कालिदासांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. संस्कृत शिक्षिका श्रीमती ताठे यांनी प्रास्ताविक केले. इयत्ता १० वी अ मधील विद्यार्थिनी कु. निधी सुतार व कु. मृणालिनी सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनींनी कालिदास गीत, कालिदासांचे खळकाव्य, महाकाव्य व नाटकाविषयी माहिती सांगितली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Kalidas din

स्वराज्यसभा मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम २०१८

बुधवार दिनांक ०१/०८/२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता हुजूरपागा कात्रज प्राथमिक, माध्यमिक प्रशाला कात्रज येथे स्वराज्य सभा मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कोथरूड मतदार संघाच्या आमदार मा. श्रीमती मेधाताई कुलकर्णी व अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रभारी उपाध्यक्ष मा. अँड सुधीर निरफराके, संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शामाताई जाधव, संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. श्रीमती उषाताई वाघ, सभासद मा. रवींद्र साळुंके, प्रशालेच्या मुख्याध्यापिका विद्या गालिंदे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यपिका मा. श्रीमती उन्नती जावडेकर, शिशुमंदिर विभागाच्या मा. श्रीमती उमा गोसावी, इंग्रजी प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुचेता मिठारी हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
मा. मुख्याध्यापिका विद्या गालिंदे, मा. मुख्याध्यपिका मा. श्रीमती उन्नती जावडेकर यांनी नवनिर्वाचित मंत्रीमंडळास गोपनीयतेची व कामाप्रती निष्ठा राखण्याची शपथ दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मावळत्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
"शालेय जीवनात भावनिक व सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे तसेच राज्यशास्त्र, नागरिक शास्त्र या विषयांचा अभ्यास चाकोरीबद्ध न ठेवता त्या विषयाचे ज्ञान बाहेरील जगात वावरताना अंगी बाणविणे गरजेचे आहे. तसेच राजकारणात उच्च शिक्षित व्यक्तींनी नेतृत्त्व करण्याची गरज आहे. ही गरज तुमच्या आमच्यासारखी भावी पिढी पूर्ण करेल" असा विश्वास मेधाताईंनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड सुधीर निरफराके सरांनी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचे औचीत्य साधून या थोर व्यक्तींचा वारसा पुढे नेण्याचे विद्यार्थिनींना आवाहन केले.
कार्यक्रमास नगरसेवक मा. प्रकाशभाऊ कदम, नगरसेविका मा. राणीताई भोसले, मा. मनीषाताई कदम, सामाजिक कार्यकर्ते मा. राजाभाऊ कदम, मा. रायबा भोसले, मा. राजेंद्र टापरे हे उपस्थित होते.
श्रीमती साधना घोडके यांनी प्रमुक पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची ओळख करून दिली. श्री. प्रसाद दीक्षित यांनी आभार व्यक्त केले. श्रीमती ज्योत्स्ना पवार यांनी सूत्रसंचालन केले. "वंदेमातरम" या गीतानी कार्यक्रमाची सांगता झाली.

Shapathvidhi

मेहंदी स्पर्धा (२०१८-१९)

सांस्कृतिक विभागा अंतर्गत दिनांक १०/०७/२०१८ रोजी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता ८ वी ते १० वी मधील एकूण २५० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. खालील विद्यार्थिनींनी त्यामध्ये प्राविण्य मिळविले.

क्रमांक विद्यार्थिनीचे नाव इयत्ता व तुकडी
इयत्ता ८ वी
प्रथम कु. प्रगती वीर ८ वी अ
द्वितीय (विभागून) कु. श्रद्धा भूमकर ८ वी अ
द्वितीय (विभागून) कु साक्षी निवंगुणे ८ वी ड
इयत्ता ९ वी
प्रथम कु. संस्कृती लोंढे ९ वी अ
द्वितीय (विभागून) कु. लक्ष्मी संदे ९ वी अ
द्वितीय (विभागून) कु. गायत्री अहिरराव ९ वी ड
इयत्ता १० वी
प्रथम (विभागून) कु. साक्षी वीर १० वी ब
प्रथम (विभागून) कु. श्रुती काशीद १० वी ब
द्वितीय (विभागून) कु. अस्मिता भोसले १० वी ब
द्वितीय (विभागून) कु. साक्षी केंद्रे १० वी क

Mehendi

स्वराज्य सभा निवडणूक

हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेत शुक्रवार दिनांक २९/०६/२०१८ रोजी स्वराज्यसभा मंत्रिमंडळाच्या प्रतिनिधींची निवडणूक दु. ३.४० ते ४.४० या वेळेत घेण्यात आली.
इयत्ता ८ वी ते १० वीच्या प्रत्येक तुकडीतून वर्गप्रतिनिधी पदासाठी चार प्रतिनिधींची निवड वर्गशिक्षकांच्या मार्फत करण्यात आली. प्रत्येक वर्गातून निवडणूकीची तयारी करण्यात आली व दोन प्रतिनिधींसाठी दोन मते (प्रत्येकी १) देण्यात आली. नियोजित वेळात वर्गशिक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया शिस्तीत पर पडली. मा. मुख्याध्यापिका श्रीमती विद्या गालिंदे यांनी प्रत्येक वर्गात भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली व सुरळीत आणि शाळेच्या शिस्तीत उत्साहाने निवडणूक प्रक्रिया झाल्यामुळे विद्यार्थिनींना शाबासकी दिली.

Election Election

मागील वर्षांचे शालेय उपक्रम