शिशुमंदिर

शिशुमंदिरची मुहूर्तमेढ

१ जून १९८७ रोजी संस्थेचे तेंव्हाचे सचिव मा. श्री. मो. द. रावेतकर यांनी पुढाकार घेऊन शिशुमंदिरची मुहूर्तमेढ रोवली.

त्यावेळी श्रीमती पुष्पा जोशी, श्रीमती लीला सोहनी, श्रीमती शकुंतला कटककर हे सदस्य कार्यकारणीवर कार्यरत होते.

सुरवातीला प्रचंड आत्मविश्वास, परस्पर संघटीत भावनेने प्रेरीत असलेल्या, एकमेकींच्या सहकार्याने व जिद्दीने कार्यरत असलेल्या ५ शिक्षिका व ४ सेविका असा शिशुमंदिरचा कर्मचारीवर्ग होता.

सन १९८७ पासून ते सन २०१६ पर्यंत शिशुमंदिरने यशस्वी वाटचाल करीत संस्थेच्या नावलौकिकात भरच टाकली. नुकतेच शिशुमंदिरने आपले रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरे केले. वर्षभरात पालकांसाठी, विद्यार्थिनींसाठी, शिक्षिका, सेविकांसाठी व माजी विद्यार्थिनींसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

विद्यमान शिशुमंदिर कार्यकारिणी

मुख्याध्यापिका - श्रीमती अनघा रानडे
शिक्षिका- १४
सेविका- १४
संगीत शिक्षिका- १
सहाय्यक शिक्षिका- २
३ गट शाळेत आहेत.

शिशुरंजन - १०६ विद्यार्थिनी
छोटा गट - १५९ विद्यार्थिनी
मोठा गट - १६७ विद्यार्थिनी

उल्लेखनीय बाबी

शालेय उपक्रम २०१८ - १९

शाळा प्रवेश व इतर माहिती

अर्ज वाटपाची तारीख
३ जानेवारी २०१९
४ जानेवारी २०१९
५ जानेवारी २०१९

प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण
हुजूरपागा शिशुमंदिर लक्ष्मी रोड, पुणे

वेळ
दुपारी १२.३० ते २.३०

प्रवेशासाठी आवश्यक असलेले वय
शिशुरंजन गट- ३ वर्षे पूर्ण (३० सप्टेंबर २०१९ पर्यंत)
छोटा गट - ४ वर्षे पूर्ण (३० सप्टेंबर २०१९ पर्यंत)
मोठा गट - ५ वर्ष पूर्ण (३० सप्टेंबर २०१९ पर्यंत)

शाळेची वेळ

सर्व गटांसाठी : दु. १२. ३० ते ३. ३०

मुलींच्या संख्येनुसार छोटा गट, सकाळ व दुपार विभागामध्ये विभागला जाईल.

शाळेचा दूरध्वनी क्रमांक - ०२०- ६५२१७१९०

पालकांनी वर्गशिक्षिकांना भेटण्याची वेळ - शनिवार स. १० ते ११

शनिवारी विद्यार्थिनींना सुट्टी असते.

उल्लेखनीय बाबी

सांस्कृतिक कार्यक्रम

विद्यार्थीनींना आपल्या उज्ज्वल भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून वर्षभर शिशुमंदिरामध्ये पालखी, गुरुपौर्णिमा, लो. टिळक पुण्यतिथी, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, दहीहंडी, गणेश उत्सव, दसरा, दिव्याची अमावस्या, दीपावली, संक्रांत, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, रंगपंचमी गुढीपाडवा असे सांस्कृतिक सण मोठ्या धुमधडाक्यात, जल्लोषात साजरे केले जातात.

स्नेहसंमेलन

मुलींचा आत्मविश्वास वाढावा, ताला-सुराचे ज्ञान पक्के व्हावे, आई बाबांची कौतुकाची थाप पाठीवर पडावी म्हणून मोठ्या संख्येने मुली स्नेहसंमेलना मध्ये सहभागी होतात. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुली अल्पोपहाराचा आस्वाद घेतात, त्याचप्रमाणे मुलीसाठी शिक्षिकांद्वारे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ केला जातो.

सहल

वर्षभरात पावसाळी सहल, पायी सहल व बागेतील सहल काढली जाते.
छोटा गट व शिशुरंजन गटासाठी एकत्र मोठी व मोठ्या गटासाठी स्वतंत्र मोठी सहल काढली जाते.

शेकोटी

हिवाळ्यात एखाद्या शनिवारी संध्याकाळी मुली शाळेच्या मैदानावर नाच व गाणी म्हणून शेकोटीचा आनंद लुटतात, नंतर गरम खिचडीचा आस्वाद घेतात.

आनंद मेळावा

फेब्रुवारी महिन्यात ४ ते ५ दिवसांचा मुली, पालक, शिक्षिका, सेविकांचा आनंद मेळावा साजरा केला जातो. यामध्ये मुलींसाठी गम्मत जत्रा तर पालकांसाठी विविध स्पर्धा, पालकांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम तसेच शिक्षिकांसाठी, सेविकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात, आजी आजोबांचा मेळावा भरवला जातो. पालकांसाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते.

पोलीस मैत्री

समाजात वावरताना मुलींच्या मनात पोलीसांबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी म्हणून मुद्दाम शाळेत पोलिसांना बोलवले जाते . मुलींकडून पोलिसांना राखी बांधली जाते.

शैक्षणिक साहित्य प्रदर्शन

वर्षातून एकदा पालकांसाठी सर्व साधनांचे शाळेत प्रदर्शन मांडण्यात येते.

वार्षिक नियतकालिक

'अंकुर ' नावाचे एक नियतकालिक दरवर्षी निघते. या मध्ये पालकांचे व शिक्षिकांचे विविध विषयांवर आधारीत असलेले योग्य ते लेख छापले जातात.

पालकशाळा

उद्याचे सुजाण नागरीक निर्माण करण्यासाठी मुलींचे योग्य संगोपन कसे करावे यासाठी शाळेत पालकांना विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभते.

आंतरशालेय स्पर्धा

दरवर्षी मोठ्या संख्येने विध्यार्थिनी, शिक्षिका व सेविका विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी घेतात व हमखास यश मिळवतात.

शालेय उपक्रमांची प्रातिनिधिक क्षणचित्रे


स्नेहसंमेलन


सहल


सहभोजन


आनंद मेळावा


लो. टिळक पुण्यतिथी कार्यक्रम


पालकशाळा


पौष्टिक खाऊ

येरे येरे पावसा..

शनिवार दि. १८/८/१८ रोजी मोठ्या गटांची पावसाळी सहल "ग म भ न प्रकाशन संचालित विद्याविकास निसर्ग शाळा , पानशेत" येथे गेली होती.

ल. म. कडू काका यांनी मुलींना वाटेत खडकवासला धरणाची माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्ष, वेली, झुडूप, रोप, गवत हे झाडांचे प्रकार दाखविले. प्रत्येक झाडाच्या पानाचा आकार, रंग , स्पर्श वेगळा असतो हे मुलींच्या निदर्शनास आणून दिले. तसेच गप्पी मासे, गांडूळ खत व खेकड्याची गंमत मुलींनी प्रत्यक्ष अनुभवली.

यावेळी मुलींनी बटाटे लावले व बैलांची नांगरणी पाहिली.

Panshet sahal Panshet sahal Panshet sahal Panshet sahal Panshet sahal Panshet sahal

नागोबा आला...

मंगळवार दि. १४/८/२०१८ रोजी नागपंचमीचा सण शिशुमंदिरमध्ये साजरा करण्यात आला. नागप्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागांचे व सापांचे महत्व मुलीना सांगण्यात आले. नागांची माहिती सांगणारी गोष्ट सांगून मुलींच्या मनातील नाग – सापांची भिती साफ नाहिशी करण्यात आली.
झिम्मा फुगडी सारखे पारंपरिक खेळ खेळून मुलीनी नागपंचमीचा सण साजरा केला. या प्रसंगी मुलीना हातावर मेंदी काढण्यात आली

Nagpanchami Nagpanchami Nagpanchami Nagpanchami Nagpanchami Nagpanchami

चला रंग ओळखुया....

शिशुमंदिर मध्ये लाल, निळा, पिवळा हे मूळ रंगदिन साजरे करण्यात आले. या रंगदिनांच्या निमित्ताने त्या त्या रंगांच्या हस्तव्यवसायाच्या कृती, रंगांच्या वस्तूंची मांडणी द्वारे मुलीना मूळ रंगांची ओळख देण्यात आली. रंगदिनांच्या दिवशी त्या त्या रंगांचे फ्रॉक घालून मूली शाळेत उपस्थित होत्या.

Rangdin Rangdin Rangdin Rangdin Rangdin Rangdin Rangdin Rangdin

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे....

बुधवार दि. १/८/२०१८ रोजी शिशुमंदिरच्या विद्यर्थीनींनी केसरी वाडा, नारायण पेठ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून लो. टिळकांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी मुलींनी 'या चला लोकमान्या' ही लो. टिळकांची प्रार्थना ..
'मी शेंगा खाल्ल्या नाहीत' हे नाटुकले...
'आज लो. टिळक पुण्यात अवतरले तर...' ही नाट्यछटा
सादर करून उपस्थित पालकांकडून शाबासकीची थाप मिळवली. मुलींनी पालकांसमवेत केसरीवाडा येथील संग्रहालय बघितले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Lokmanya tilak Lokmanya tilak Lokmanya tilak Lokmanya tilak Lokmanya tilak Lokmanya tilak

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा...

दि. ३०/७/२०१८ रोजी शिशुमंदिर मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी रानडे बालक मंदिरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन व गुरुपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोठ्या गटातील मुलींनी गुरुशिष्यांवर आधारीत असलेल्या काही पौराणिक गोष्टी व सचिन तेंडुलकर व आचरेकर गुरुजी यांसारख्या आधुनिक गुरुशिष्यांच्या प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या.

Gurupaurnima Gurupaurnima Gurupaurnima

जय जय विठोबा ...

दि. १८/७/१८ रोजी विठोबाचा गजर करत शिशुमंदिरच्या मुलींनी शाळेच्या आवारात पालखी मिरवली. या वर्षीचा पालखीचा विषय होता ‘प्लॅस्टिक बंदी’. ‘चल ग सखे, चल ग सखे पंढरीला.. प्लॅस्टिक मुक्त करू या धरतीला..’ अशा स्वरूपाच्या विविध घोषणा देत ‘कापडी व कागदी पिशव्या वापरा’ हा संदेश देण्यात आला.

Palkhi sohala Palkhi sohala Palkhi sohala Palkhi sohala Palkhi sohala Palkhi sohala

ये रे ये रे पावसा...

दिनांक १३ जुलै व १६ जुलै रोजी अनुक्रमे शिशुरंजन व छोट्या गटाची पावसाळी सहल ‘वर्तक बाग’ येथे गेली होती. पावसाचा आनंद घेत मुलींनी बागेत फेरफटका मारला व विविध झाडांची माहिती घेतली व पावसाळी सहलीचा आनंद लुटला.

Vartak bag Vartak bag Vartak bag Vartak bag Vartak bag Vartak bag

शाळेचा पहिला दिवस

दि.१५/०६/२०१७ रोजी सरस्वती पूजनाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिशूरंजन गट व छोट्या गटास सुरुवात झाली. वर्ग छान सजवलेले होते, फळ्यावर छान चित्रे काढली होती. घरी जाताना मुलींना छोटा रुमाल व शिशूरंजन गटातील मुलींना खेळ देण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात पार पडला.

Shalecha pahila divas Shalecha pahila divas Shalecha pahila divas

मागील वर्षांचे शालेय उपक्रम