हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा


इयत्ता - १ ली ते ७ वी (प्रत्येकी ४ तुकड्या)

माध्यम - मराठी.
इ. १ ली पासून सेमी इंग्रजी.

शाळेची वेळ:
इ. १ ली ते इ. ५ वी सकाळी ७.३० ते १२.३०
इ. ६ वी ते इ. ७ वी दुपारी १२.३० ते ५.३०

मुख्याध्यापिका: श्रीम. ज्योती राजमणी

शिक्षक: ३४. शिक्षकेतर: लेखनिक १. सेवक: ४. सफाई कामगार: २.

एकूण विद्यार्थिनी संख्या: १७८५

पालकांना शाळेत भेटण्याची वेळ:
इ. १ ली ते इ. ५ वी गुरुवार आणि शनिवार ११ ते १२
इ. ६ वी ते इ. ७ वी गुरुवार ११.४५ ते १२.३० आणि शनिवार ११.०० ते ११.३०

२०२३ - २४ मधील विशेष उपक्रम व क्षणचित्रे


प्रवेश प्रक्रिया

  • एप्रिल मध्ये हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर विभागातील विद्यार्थिनींचे इ. १ ली मध्ये प्रवेश केले जातात.
  • मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक निकालानंतर नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु होते. इ. २ री ते ७ वी मधील प्रवेश उपलब्ध जागांनुसार होतात. बाहेरील प्रवेशांबाबत प्रशालेच्या बोर्डवर उपलब्ध जागांनुसार सूचना लावल्या जातात.

शासनाच्या धोरणानुसार व नियमानुसार प्रवेश प्रक्रिया होते.



२०२३ - २४ मधील विशेष उपक्रम व क्षणचित्रे

हुजूरपागेत रंगवल्या रंगीबेरंगी छत्र्या...

पावसाळा म्हंटले की छत्री आलीच... हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मुलीसाठी ऋतूमानाप्रमाणे छत्री रंगवण्याचा उपक्रम घेण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमणी यांनी शिक्षणासोबतच व्यवसायिक शिक्षण देण्यासाठी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. सहावी व सातवीच्या विद्यार्थीनींनी पर्यावरण, अंतराळ, विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित सुंदर चित्राचे रेखाटन या छत्री वर केले.

प्रशालेतील शिक्षिका सुचिता सावंत, शीतल वणवे, हेमलता गोरे, सारिका झावरे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

Umbrella colouring

इयत्ता पाचवीच्या वर्गाचा उपक्रम.....

कापसापासून वाती, फुल वाती, वस्त्र बनवणे. तसेच पूजेची सुपारी सजवणे. तसेच बियांपासून विविध कीटक प्राणी तयार करणे.

इ. ४ थी च्या विद्यार्थिनींनी सीड बॉल तयार करून शाळे जवळील परिसरात त्यांची रुजवण केली.

दीपावली निमित्ताने सामाजिक संदेश देणारे आकाशकंदील विद्यार्थिनींनी तयार केले.

Seed birds Seed ball Lantern making Lantern making Lantern making Deeputsav

भोंडला

शाळेत नवरात्रा निमित्त भोंडल्याचे आयोजन केले होते. हत्तीचे पूजन करून विविध भोंडल्याची गाणी म्हणत व फेर धरत विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात भोंडला खेळला. तसेच खंडे नवमी निमित्त संगणक कक्षातील संगणकांचे तसेच बाग कामासाठी लागणारे अवजारे यांचे पूजन केले.

राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमेचे औचित्य साधून पालकांसाठी पर्यावरण पूरक राखी तयार करणे स्पर्धा आयोजित केली.

श्रावणी शुक्रवार

शुक्र वार दि. ८/०९/२०२३ रोजी स. १० ते ११ यावेळेत श्रावणी शुक्रवार व निसर्गदेवता पूजनाचा उपक्रम शाळेत घेण्यात आला. इ.४थी च्या विद्यार्थिनी निसर्ग देवता म्हणून तयार करण्यात आल्या होत्या.त्या निसर्ग देवतांचे पूजन शाळेच्या मा.मुख्याध्यापिका श्रीमती राजमणी बाई यांनी केले.

Nature Nature Leaf colouring

दहीहंडी

दहीहंडीचे औचित्य साधून विद्यार्थिनीमध्ये वाचनाची गोडी वाढावी म्हणून शाळेत पुस्तक हंडीचे आयोजन करण्यात आले. मुलींना गोष्टीचे पुस्तक देण्यात आले.

Pustak handi Pustak handi

नागपंचमी

नागपंचमी हा सण शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थिनींसमवेत सर्पोद्यानाला भेट देली. सर्पमित्रांनी विद्यार्थिनींना सापांबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली.

Naagpanchami

क्रांति सप्ताह

हुजूरपागा प्राथमिक शाळेत क्रांतीसप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थींनी मध्ये देशप्रेमाचे बाळकडू रुजवण्याचा प्रयत्न.

स्वराज्य सभा निवडणूक व शपथविधी समारंभ

हुजूरपागा प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्गातून स्वराज्य सभा अंतर्गत आपापले वर्ग प्रतिनिधी निवडले. तसेच शपथविधी समारंभाला आपलीच माजी विद्यार्थिनी वरदा रांजणे कृषी अधिकारी लाभली. शपथविधी समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.

Election Election

पालखी सोहळा

विविध पारंपारिक दिंड्या व सामाजिक बांधिलकी जपत समाज प्रबोधन करण्यासाठी जल दिंडी, वाहतूक दिंडी, पर्यावरण दिंडी यांसारख्या अनेक दिंड्या पालखीत होत्या.

योग दिन

हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत योगदिन मोठ्या उत्साहात विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करत पार पडला.

Yog din

नवागतांचे स्वागत

सन २०२३-३०२४ या शैक्षणिक वर्षात हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. फुग्यांनी सजवलेली कमान, आकर्षक फलक लेखन या मुळे शालेय परिसर विद्यार्थिनी स्वागतासाठी सज्ज होता. विद्यार्थिनींचे शाळेत मोठया उत्साहात स्वागत झाल

Welcome Welcome



मागील वर्षांचे शालेय उपक्रम