कात्रज उच्च माध्यामिक

वाणिज्य विभाग

इयत्ता
११वी व १२वी

माध्यम
मराठी

वेळ
सकाळी ७.१० ते ११.४५

पालकांसाठी भेटण्याची वेळ
दुपारी १२:०० ते १२:३०

पत्ता
हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
राजस सोसायटी, कात्रज
फोन- ८०८७४०२३८९
ईमेल आयडी- hujurpagakatraj@yahoo.in

उच्च माध्यमिक वाणिज्य विभागात शिकविले जाणारे विषय

इ. ११वी- मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, जमाखर्च(Account), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, चिटणीसांची कार्यपद्धती, शारिरीक शिक्षण, पर्यावरण

इ. १२वी- मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, जमाखर्च(Account), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, चिटणीसांची कार्यपद्धती, शारिरीक शिक्षण, पर्यावरण

मुख्याध्यापिका
श्रीमती विद्या नामदेव गालिंदे
M.A., M.Ed.

सन २०१४ - २०१५ मधील विविध उपक्रम

वर्षभरात विद्यार्थिनींनी शिक्षक दिन, गुरुपौर्णिमा या सारखे दिन साजरे केले. तर महिला सबलीकरण व स्त्री विषयक सुरक्षितता, विविध करिअरच्या संधी, एड्स जनजागृती, सायबर क्राईम, परीक्षेच्या काळात टेन्शन घेऊ नये इ. विविध व्याख्यानांचा लाभ घेतला. इ. ११वी च्या विद्यार्थिनींची ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. स्नेहसंमेलनात इ. ११वी च्या विद्यार्थिनींनी संत रचनेवर आधारित नृत्य नाटिका व इ. १२वी च्या विद्यार्थिनींनी विनोदी नाटक सादर केले.

२०१८-१९ मधील विशेष उपक्रम व क्षणचित्रे

मागील वर्षातील उपक्रम

इतिहास व उद्देश

कात्रज सारख्या उपनगरीय भागातील सर्वसामान्य मुलींना १० वी नंतरच्या शिक्षणाची संधी मिळावी या हेतूने कात्रज येथे २००४ साली उच्च माध्यमिक वाणिज्य विभागाची सुरुवात करण्यात आली.


H.S.C (१२ वी) परीक्षा २०१७-१८ चा निकाल

इयत्ता १२ वी कॉमर्स(मराठी माध्यम) 12th result
एकूण पट ६७
परीक्षेस बसलेल्या

६७
उत्तीर्ण विद्यार्थिनी ६६
अनुत्तीर्ण विद्यार्थिनी ०१
अनुपस्थित विद्यार्थिनी ००
शेकडा निकाल ९८.५१%

क्रमांक विद्यार्थिनींची नांवे टक्के
प्रथम कु. पिलाणे सुजाता भरत ८१.२३%
द्वितीय कु. गारगोटे प्रणिता नंदकुमार ७८.७७%
तृतीय कु. घाटे काजल दगडू ७६.३१%


वाणिज्य विभागाचा H.S.C (१२ वी) परीक्षेचा वार्षिक शेकडा निकाल

सन शेकडा निकाल
२००६ १००%
२००७ १००%
२००८ १००%
२००९ १००%
२०१० ९७.९६%
२०११ ९६.४९%
सन शेकडा निकाल
२०१२ ९२.९८%
२०१३ ९८.००%
२०१४ १००%
२०१५ १००%
२०१६ १००%
२०१७ ९८.११%
२०१८ ९८.५१%
 

एड्स जनजागृती दिन

१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स जनजागृती दिन म्हणून संबोधला जातो. शनिवार दिनांक ८/१२/२०१८ रोजी एड्स जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी श्रीमती रिबेका गोरडे जोसेफ यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानामध्ये त्यांनी एड्स व HIV या विषयी माहिती सांगितली. HIV चा इतिहास, त्याचा वाढता प्रसार, तरुणांमध्ये रोगाचे वाढते प्रमाण, HIV ची प्रमुख कारणे, एड्सची लक्षणे या विषयी विद्यार्थिनींशी संवाद साधला.
जागतिक एड्स जनजागृती दिनाचे औचित्य साधून हुजूरपागा कात्रज प्रशालेत इयत्ता ११वी व १२वीच्या विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निबंधाचे विषय पुढीलप्रमाणे :
१) एड्स मुक्त भारत काळाची गरज
२) एड्स – एक यक्षप्रश्न
या स्पर्धेसाठी इयता ११वी व १२वी च्या एकूण ३९ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या निबंध स्पर्धेचे परीक्षण श्रीमती रेखा जेरे यांनी केले. स्पर्धेतून निवडण्यात आलेले क्रमांक पुढीलप्रमाणे
क्रमांक विद्यार्थिनीचे नाव इयत्ता व तुकडी
प्रथम कु. सय्यद सना खय्यूम ११ वी वाणिज्य
द्वितीय (वि) कु. खुटेकर मोनिका रघुनाथ ११ वी ओएम
द्वितीय (वि) कु. जाधव स्तुती सुरेंद्र ११ वी ओएम
तृतीय(वि) कु. कोंढरे मोनिका बंडू १२ वी वाणिज्य
तृतीय(वि) कु. चव्हाण ऋतुजा विजय १२ वी सीटी

एड्स जनजागृती दिन एड्स जनजागृती दिन

२०१७ - १८ मधील विशेष उपक्रम

इयत्ता ८ वी, ११ वी, १२ वी शैक्षणिक सहल – अॅग्री टुरिझम, बारामती

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील इयत्ता ८ वी, ११ वी, १२ वी च्या विद्यार्थिनींची एकदिवसीय शैक्षणिक ऐच्छिक सहल सोमवार दिनांक २७/११/२०१७ रोजी अॅग्री टुरिझम, बारामती या ठिकाणी गेली होती. सहली विषयी अधिक माहिती >>>

Educational Trip