शिशुमंदिर - शालेय उपक्रम

<<< Back to laxmi rd marathi shishu mandir page

दिन दिन दिवाळी.....

शिशुमंदिरमध्ये विविध पणत्या, किल्ला, आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करण्यात आली. या निमित्त दिवाळीची माहिती सांगून मुलींना खाऊ देण्यात आला. आकाशकंदील भेट देण्यात आला. पहिल्या सत्रातील हा शेवटचा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Diwali Celebration Diwali Celebration Diwali Celebration Diwali Celebration Diwali Celebration Diwali Celebration

करूया वंदन सरस्वतीला....

दसऱ्यानिमित्त मुलींनी शाळेत पाटीपूजन केले. शाळेत आणलेल्या नवीन खेळाचे पूजन करण्यात आले. मुलींना नवरात्रीची व दसऱ्याची माहिती सांगण्यात आली.

Dasara Celebration Dasara Celebration Dasara Celebration

ऐलोमा पैलोमा...

नवरात्री निमित्त शिशुमंदिरमध्ये मुलींचा भोंडला आयोजित करण्यात आला होता. हस्त नक्षत्राची माहिती सांगून हत्ती भोवती मुलींनी फेर धरून पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हटली व खिरापतीचा आनंद लुटला.

Bhondla Celebration Bhondla Celebration Bhondla Celebration

गणपती बाप्पा मोरया......

गणेशोत्सवानिमित्त शिशुमंदिरमध्ये श्रींची स्थापना करण्यात आली. मुलींनी 'गणपती बाप्पाची पम् पम् छान' या बालगीतावर छान नाच केला व मोठ्या गटातील मुलींनी अथर्वशिर्षाचे पठण केले व गणपती बाप्पाला वंदन केले. यानिमित्ताने पालक श्री. गावडे यांनी शाडूच्या मातीची गणेशमुर्ती मुलींना करून दाखवली. मुलींनी मैद्याची गणेशमुर्ती तयार करण्याचा आनंद लुटला.

Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav Ganesh Uthsav

गोविंदा आला रे आला .....

या वर्षी शिशुमंदिर मध्ये ‘स्वच्छता हंडीचे’ आयोजन करण्यात आले होते. या प्रयोजनाने मुलींना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. पारंपारिक पद्धतीने बालकृष्णाने दहीहंडी फोडली.
मोठ्या गटातील मुलींनी ‘कालिया मर्दन’ हे नाटुकले सादर केले. या वर्षी मुलींनी स्वहस्ते दहीकाला तयार केला व त्याचा आनंद लुटला.

Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi
Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi Swachhata Handi

ग्रंथालय दिन

१२ ऑगस्ट या जागतिक ग्रंथालय दिनानिमित्त शिशुमंदिरच्या विद्यार्थीनींनी पुणे मराठी ग्रंथालय येथे भेट देऊन ग्रंथालयाच्या दैनंदिन कामकाजाबाबत माहिती घेतली.

Granthalay Din Granthalay Din Granthalay Din Granthalay Din Granthalay Din Granthalay Din Granthalay Din Granthalay Din Granthalay Din

रक्षाबंधन

दि ८ ऑगस्ट २०१७ रोजी नारळीपौर्णिमेनिमित्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या दिवशी मुलींना राखी बांधण्यात आली व नारळाची वडी खाऊ म्हणून देण्यात आली.
संस्थेतील ४ सफाई कामगार व शिशुमंदिर मधील एक सफाई कामगार यांना मुलींनी राखी बांधली व स्वच्छतेचे एक प्रेरणागीत म्हणून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. मुलींना या निमित्ताने स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले.

Rakhi Rakhi Rakhi

स्वराज्य हा माझा......

दि. १/८/२०१७ रोजी लो. टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मोठया गटातील मुलींची बालसभा आयोजित करण्यात आली होती. मुलींनी टिळकांच्या विविध गोष्टी सांगितल्या. P. P. T. द्वारे टिळकांचे बालपण ते टिळकांची महाअंतयात्रा हा प्रवास मुलींसमोर मांडण्यात आला.

Lokmanya Tilak Punyatithi Lokmanya Tilak Punyatithi Lokmanya Tilak Punyatithi Lokmanya Tilak Punyatithi Lokmanya Tilak Punyatithi Lokmanya Tilak Punyatithi

नवीन नियुक्ती

दि. ३१/७/२०१७ रोजी मा. मुख्याध्यापिका श्रीमती. मंजिरी मराठे या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. दि. १/८/२०१७ पासून मा. श्रीमती. अनघा रानडे यांनी मुख्यध्यापिका या पदाचा पदभार स्विकारला. त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन!!

ANGHA TAI NIYUKTEE ANGHA TAI NIYUKTEE ANGHA TAI NIYUKTEE

नागोबा आला.....

दि. २८/७/१७ शुक्रवार रोजी शिशुमंदीर मध्ये नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. त्यादिवशी सर्पमित्र श्री. अक्षय सूर्यवंशी यांना शाळेत निमंत्रित केले होते. त्यांनी P. P. T. च्या माध्यमातून साप व नागांविषयी मुलींना माहिती दिली. तसेच सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार काय करायचे हे ही सांगितले. नंतर नागाची पूजा केली. मुलींनी झिम्मा, फुगडी यासारखे पारंपारिक खेळ खेळले. कार्डशीटचे तयार केलेले नाग मुलींना घरी देण्यात आले.

NAGPANCHAMI NAGPANCHAMI NAGPANCHAMI NAGPANCHAMI NAGPANCHAMI NAGPANCHAMI

दीपज्योती नमोस्तुते।।

दि. २१/७/१७ शुक्रवार रोजी शिशुमंदीर मध्ये दिप पुजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी लामणदिवा, नंदादीप, कंदील इ. पारंपरिक दिव्यांचे तसेच ट्यूब, बल्ब, बॅटरी इ. आधुनिक दिव्यांचे पूजन करण्यात आले. तसेच काही मुलींनी दिव्यांची तोंडी माहिती सांगितली. दिप पुजनानिमित्त मुलींनी तयार केलेल्या मातीच्या पणत्या मुलींना घरी देण्यात आल्या.

Dip Pujan Dip Pujan Dip Pujan Dip Pujan Dip Pujan Dip Pujan Dip Pujan Dip Pujan

गुरुपौर्णिमा

दि. ११/७/२०१७ मंगळवार रोजी शिशुमंदीर, लक्ष्मी रोड शाळेत गुरुपौर्णिमा साजरी केली. गुरुपौर्णिमेनिमित्त मुलींनी स्वतः रंगविलेली फुले आपला ‘पहिला गुरु : आई’ म्हणून आईला देऊन कृतज्ञता व्यक्त केली. प्रातिनिधिक स्वरुपात एका आईला शाळेत निमंत्रित केले होते. म. ए. सो. शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका मा. मेधा दाते यांना पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. व्यासपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोठया गटातीला मुलींनी गुरु शिष्यांच्या उत्तम गोष्टी सांगितल्या. पूर्वीच्या काळातील गुरु शिष्यांची ओळख मुलींना व्हावी म्हणून धौम्य ऋषी व अरुणी यांच्यातील एक छोटासा संवाद मुलींनी सादर केला.

Gurupornima Gurupornima Gurupornima Gurupornima Gurupornima Gurupornima Gurupornima Gurupornima Gurupornima

विठ्ठल.... विठ्ठल....

दि. ३ जुलै १७ रोजी शिशुमंदीर मध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखीचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

या वर्षी पालखीचा विषय ‘शारिरीक स्वच्छता’ हा होता. त्या निमित्ताने माऊलींच्या पालखी बरोबर स्वच्छतेची एक स्वतंत्र पालखी काढण्यात आली. ‘ सकाळी लवकर उठलेच पाहिजे ’, ‘दात स्वच्छ घासलेच पाहिजेत ’, ‘ स्वच्छ आंघोळ केलीच पाहिजे ’ , ‘ नियमित व्यायाम केलाच पाहिजे’ इत्यादी या घोषणा देत आमच्या बालचमूंची छोटीशी दिंडी लक्ष्मी रोड वरून चालत चालत शिशुमंदिरच्या प्रांगणात आली. विठोबाच्या गजराने अवघी शाळा दुमदुमली.

Palkhi Palkhi Palkhi Palkhi Palkhi Palkhi Palkhi Palkhi Palkhi

योगादिन

शिशुमंदिरमध्ये दि. २१/६/१७ रोजी योगादिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. मुलींनी वज्रासन, पर्वतासन, शंखासन, वृक्षासन, त्रिकोणासन या सारखी आसने व सूर्यनमस्कार घातले. एक वेगळाच आनंद व सकारात्मक ऊर्जा घेऊन मुली घरी गेल्या.

Yogadin Yogadin Yogadin Yogadin Yogadin Yogadin

शाळेचा पहिला दिवस

दि. १५/०६/२०१७ रोजी सरस्वती पूजनाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिशूरंजन गट व छोटा गटास सुरुवात झाली. वर्ग छान सजवलेले होते, फळ्यावर छान चित्रे काढली होती. घरी जाताना मुलींना छोटा रुमाल व शिशूरंजन गटातील मुलींना खेळ देण्यात आले. शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात पार पडला.

Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas Shala pahila divas

शिक्षिकांचे कलाकौशल्य शिबीर

दि. १२/६/१७ रोजी श्रीमती सुवर्णा अवचट यांच्या मार्गदर्शनाद्वारे विविध प्रकारच्या कागदांची फुले तयार करण्याचे कौशल्य शिक्षिकांनी आत्मसात केले.

Kala kaushalya shibir Kala kaushalya shibir Kala kaushalya shibir

सेविकांसाठी उद्बोधन शिबीर २०१७-२०१८

दि. १०/६/२०१७ रोजी वा. दी. वैद्य मुलींची शिशुशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. जयश्री एडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेविकांसाठी उद्बोधन शिबीर आयोजित करण्यात आले. विविध खेळांच्या माध्यमाद्वारे व परस्पर संवादातून सेविकांसाठी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेचा सेविकांचा विकास होण्यास निश्चितच फायदा झाला.

Sevikansathi shibir Sevikansathi shibir Sevikansathi shibir Sevikansathi shibir Sevikansathi shibir Sevikansathi shibir

बक्षिस समारंभ

६ फेब्रुवारी २०१७ पालक स्पर्धा, शिक्षिका व सेविकांच्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ या दिवशी आयोजित करण्यात आला होता. एच. एच. सी. पी. हुजूरपागेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती स्वाती कुळकर्णी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

prize-distribution prize-distribution prize-distribution prize-distribution prize-distribution

प्रदर्शन व विक्री

४ फेब्रुवारी २०१७ या दिवशी पालकांनी खाद्य पदार्थ व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मांडले व त्यांची विक्री केली. याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Exhibition and sale Exhibition and sale Exhibition and sale

पालक स्पर्धा

३ फेब्रुवारी २०१७, पालकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिशुमंदीरमध्ये ‘एक मिनिट स्पर्धा’ व एक ‘टाकाऊ वस्तूंमधून सुशोभनाचे तक्ते तयार करणे’ ह्या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Palak spardha Palak spardha Palak spardha Palak spardha Palak spardha Palak spardha

आजी-आजोबा मेळावा

२ फेब्रुवारी २०१७ या दिवशी खास आजी–आजोबांसाठी शिशुमंदिरमध्ये एक मंगलमय सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुलाबपुष्प व अत्तरा द्वारे आजी- आजोबांचे स्वागत करण्यात आले. छोट्या गटातील निधी आल्हाटे व स्वरा पंडित यांनी आजी –आजोबांची वेशभूषा करून एक आजी–आजोबांचा संवाद सादर केला. आजी –आजोबांनी याला उत्तम दाद दिली. शिक्षिकांनी व सेविकांनी करमणुकीचे विविध कार्यक्रम सादर केले. आजी–आजोबांनी नातीच्या मदतीने ग्रिटींग तयार करण्याचा आनंद घेतला.

Aaji-Ajoba Melava Aaji-Ajoba Melava Aaji-Ajoba Melava Aaji-Ajoba Melava Aaji-Ajoba Melava Aaji-Ajoba Melava Aaji-Ajoba Melava Aaji-Ajoba Melava

पपेट शो

१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी शिक्षिकांनी वेगवेगळ्या पपेट्सद्वारे विविध बालकथांचे उत्तम सादरीकरण केले. या उपक्रमाला मुलींनी उत्तम प्रतिसाद दिला.

Puppet show Puppet show Puppet show

शेकोटी

हिवाळ्यानिमित्त एका संध्याकाळी मुलींना शाळेत बोलवून शेकोटीचा कार्यक्रम करण्यात आला. या दिवशी हिवाळ्याची माहिती सांगण्यात आली. शेकोटी भोवती मुलींनी नाच केला. शेकोटीचे औचित्य साधून आकाशवाणीवरील बालोद्यान कार्यक्रमात सादर झालेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पालकांसाठी व मुलींसाठी पुन्हा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुलींना गरम खिचडीचा खाऊ देण्यात आला.

Shekoti Shekoti Shekoti

बालदिन

१४ नोव्हेंबर रोजी शाळेत पं. नेहरुंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे स्मरण करण्यात आले. मुलींसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. शिक्षककृत भेटवस्तू मुलींना देण्यात आली. मुलींनी या दिवसाचा मनमुराद आनंद लुटला.

Baldin Baldin Baldin Baldin Baldin Baldin

दिवाळी

दिवाळी निमित्त शिशुमंदीर मध्ये किल्ला मांडण्यात आला. पणत्या व आकाशकंदिल लावण्यात आला. फुलबाज्या उडवून मुलींनी दिवाळी साजरी केली. दिवाळीनिमित्त मुलींना खाऊ देण्यात आला.

Diwali Diwali Diwali

भोंडला

नवरात्रीनिमित्त शाळेत भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. हत्ती भोवती फेर धरून मुलींनी उत्स्फूर्तपणे भोंडल्याची गाणी म्हटली. भोंडल्यानंतर मुलींना खिरापत वाटण्यात आली.

Bhondla Bhondla Bhondla

रंगदिन

मुलींना रंगांची ओळख व्हावी म्हणून शिशुमंदिर मध्ये विविध रंगदिन साजरे करण्यात आले. रंगदिनादिवशी त्या त्या रंगाची हस्तकलेची कृती मुलींकडून करून घेण्यात आली. त्या त्या रंगांच्या वस्तू व कृती मुलींना बघण्यासाठी मांडण्यात आल्या. या मांडणीमुळे मुलींना रंग ओळख झाली व रंगदिनाचा हेतू साध्य झाला.

Ranga din Ranga din Ranga din Ranga din Ranga din Ranga din

शैक्षणिक साहित्य प्रदर्शन (दि.३०.९.२०१६)

शिशुरंजन गट, छोटा गट व मोठा गट या तीनही वर्षामध्ये मुलींना कश्याप्रकारे शिकविले जाते, कोणती साधने वापरली जातात, प्रकल्पानुसार कसे शिक्षण दिले जाते या सर्व गोष्टी या प्रदर्शनातून पालकांना बघायला मिळाल्या. तीनही गटाचे पालक मोठया संख्येने प्रदर्शन बघण्यास आले होते.

Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan Pradarshan

गणपती बाप्पा मोरया

दि.५.९.२०१६ रोजी गणेश स्थापना मा.मुख्याध्यापिका मंजिरीताईंनी केली. दि. ६.९.२०१६ रोजी गणेशपूजा केली. मुलींनी उत्साहाने आरती म्हणली. गणपतीची गाणी म्हणली. दि.७.९.२०१६ या दिवशी मुलींना तळणीचा मोदक प्रसाद म्हणून देण्यात आला.

Ganpati Ganpati Ganpati

पावसाळा सहल (मोठा गट)

दि. २९.८.२०१६ रोजी मोठ्या गटाची पावसाळी सहल पु. ल. देशपांडे उद्यान येथे गेली होती. मुलींनी बागेतील पूल, पाण्यातील मासे, वेगवेगळी झाडे, फुले बघून व बागेत फिरून सहलीचा आनंद लुटला.​

Sahal Sahal

दहिहंडी

शिशुमंदिरमध्ये दहिहंडीचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या निमित्ताने छोट्या गटातील मुलींनी दहीकाल्यासाठी घरून लाह्या व पोहे आणले होते. तर मोठ्या गटातील मुलींनी मोरपिसांचे कागदी मुकुट तयार केले. या दिवशी मुलींनी बालगोपाळांची वेशभूषा केली होती. श्रीकृष्णाच्या भजना नंतर कालियामर्दनाची गोष्ट सांगण्यात आली व बालगोपींनी बाळकृष्णासाठी विविध नाच केले व बाळकृष्णाने बाळगोपालांच्या मदतीने दहिहंडी फोडली. अशा रितीने पारंपारिकरित्या दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Dahi handi Dahi handi Dahi handi Dahi handi Dahi handi Dahi handi

ग्रंथालय दिन

दिनांक 12 ऑगस्ट रोजी शिशुमंदिर मध्ये ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मुलींसाठी शिक्षिकांनी बालकवितांचे वाचन केले. मुलींनी ग्रंथालयात जाऊन बालकथा व बालकवितांची पुस्तके हाताळली. मोठ्या गटातील मुलींनी उत्स्फूर्तपणे एक हस्तलिखित पुस्तक तयार केले.

Granthalay Granthalay Granthalay

लो.टिळक पुण्यतिथी

सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी शिशुमंदिरने लो. टिळक पुण्यतिथी केसरी वाडा, नारायण पेठ येथे साजरी केली. या वेळी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन झाले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोठया गटातील काही मुलींनी टिळकांची प्रार्थना म्हटली व त्यांना वंदन केले. या नंतर टिळकांच्या शालेय जीवनातील दोन प्रसंग घेऊन विद्यर्थीनींनी एक छोटेसे नाटुकले सादर केले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 'आज पुण्यात टिळक अवतरले तर' अशी संकल्पना घेऊन टिळकांच्या जहाल भाषेतील नाट्यछटा एका विद्यार्थीनीने उत्तम सादर केली. नंतर पालकांसमवेत लो. टिळक म्युझियम व केसरीच्या छापखान्याची माहिती मुलींनी घेतली. अशा रीतीने एक आगळी वेगळी लो. टिळक पुण्यतिथी शिशुमंदिरने मोठया उत्साहात साजरी केली.

Lokmanya Tilak Punyatithi program Lokmanya Tilak Punyatithi program Lokmanya Tilak Punyatithi program Lokmanya Tilak Punyatithi program

पावसाळी सहल​

शिशुरंजन व छोट्यागटाची सहल वर्तक बाग, सदाशिव पेठ येथे गेली होती. तेथे मुलींनी पावसाची गाणी म्हणून व नाच करून तो परिसर दणाणून सोडला. बागेमध्ये फेरफटका मारून बागेमधील भिजलेल्या विविध झाडांचे अवलोकन केले.

Monsoon Trip

आकाशवाणी

आकाशवाणी केंद्राला भेट देऊन बालोद्यान या कार्यक्रमासाठी शाळेतील गुणी विद्यार्थिनींनी 'विविध गुणदर्शन' ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रेक्षेपण शनिवार दि.३०.७.२०१६ रोजी दुपारी २.३० वाजता  आकाशवाणी पुणे  केंद्रावरून होणार आहे.

Akashwani Akashwani

गुरुपौर्णिमा​

मंगळवार दि. १९.७.२०१६ रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या गटातील मुलींनी गुरुशिष्यांच्या गोष्टी सांगितल्या विशेष म्हणजे यावेळी आधुनिक गुरुशिष्य जोडी आचरेकर गुरुजी व सचिन तेंडूलकर यांचीही एक कथा मुलींनी सांगितली. यावेळी श्रीमती सोनाली निवंगुणे ह्या पालक व शिक्षक अश्या दोन्ही भूमिका पार पडणाऱ्या पालकांना प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते व्यासपूजन करण्यात आले. त्यांनी मुलींशी संवाद साधला.

guru-pournima guru-pournima guru-pournima

पालकशाळा

शनिवार दि. १६.७.१६ रोजी 'मुलांचा आहार, आरोग्य व मुलांवर होणारा जाहीरातींचा परिणाम' या विषयावर डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांचे पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बहुसंख्य पालकांनी याचा लाभ घेतला व मनातील शंकांचे निरसन करून घेतले. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात कार्यक्रम सफल झाला.

palakshala palakshala

पालखी (वृक्षदिंडी)​

आषाढी एकादशी निमित्त सोमवार दि. ११.७.१६ रोजी शिशुमंदिर मधील चिमुकल्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली. मोठया उत्साहाने 'झाडे लावा, झाडे जगवा', 'डोंगरदऱ्या हिरव्यागार, पाऊस पडेल मुसळधार', 'Tree Tree Everywhere Tree And Be Pollution Free' इ. घोषणा देत मुलींनी शाळेच्या आवारात पालखी मिरवली. त्यावेळी वृक्षदिंडीचे प्रतिक म्हणून मुलींनी संस्थेचे विश्वस्त श्री. देवस्थळी सर यांना रोप भेट म्हणून दिले. या उपक्रमाद्वारे मुलींना झाडाचे महत्व समजण्यास निश्चितच मदत झाली.

Palkhi Palkhi

प्रोजेक्टर उद्घाटन

शिशुमंदीरच्या नविन प्रोजेक्टरचे उद्घाटन श्री. कांजीभाई गाला यांच्या हस्ते करण्यात आले. प्रोजेक्टर बाल चित्रपट ( जंगल बुक ) बघण्याचा आनंद मुलींनी मनमुराद लुटला.

Projector

शैक्षणिक वर्षाची सुरुवात

सन २०१६ - १७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 'पपेट्स तयार करणे' या कार्यशाळेने झाली. शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती अर्चना मिलिंद वाटवे यांनी या बाबत शिक्षिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षिकांनी उत्तम प्रतिसाद दिला व गोष्टी सांगण्यासाठी, अभिनयगीत्ते म्हणण्यासाठी आपल्या कल्पकतेचा वापर करत विविध पपेट्स तयार केली.

Puppet making Puppet making Puppet making

दुसऱ्या दिवशी बालभवन येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती वासंती काळे यांची विविध खेळांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विविध खेळांद्वारे मुलींना आपण हसत खेळत कसे शिक्षण देऊ शकू याबद्दलचे शिक्षिकांना वर्षभर उपयोगी पडेल असे उत्तम मार्गदर्शन लाभले.

Teachers Training
  • वार्षिक नियतकालिक - 'अंकुर' नावाचे एक नियतकालिक दरवर्षी निघते. या मध्ये पालकांचे व शिक्षिकांचे विविध विषयांवर आधारीत असलेले योग्य ते लेख छापले जातात.
  • सन २०१५ - २०१६ मध्ये म. ग. ए. सोसायटीचे उत्कृष्ठ वार्षिक नियतकालिक म्हणून अंकुर या नियतकालिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
  • या वर्षी ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे’ हा संदेश देण्यासाठी मुलींची एक दिंडी काढण्यात आली.
  • श्रावण महिन्यातील विविध सांस्कृतिक सणांची मुलींना माहिती मिळावी म्हणून ‘श्रावणमौज’ या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
  • लो. टिळक पुण्यतिथी निमित्त मुलींची एक बालसभा आयोजित करण्यात आली.
  • बालसभेमध्ये मुलींनी टिळकांची प्रार्थना, गोष्ट व एक नाटुकले उत्तमरीत्या सादर केले.
  • पोलीस मैत्रीच्या दिवशी शिक्षिकांनी मुलींसाठी एक प्रोबाधनपर पथनाट्य सादर केले. मुलींनी एक समूहगान सादर केले.
  • वाहतुकीचे नियम मुलींना कळावे म्हणून सन २०१५-२०१६ या वर्षी वाहतूक पोलिसांना निमंत्रित केले होते. मुलीनी त्यांना उत्फूर्तपणे प्रश्न विचारले व राख्या बांधून पोलिसांशी मैत्री केली.
  • विविध प्रकल्पांतर्गत मुलींच्या वेगवेगळ्या सहली काढण्यात आल्या.
  • शिक्षिकांसाठी विविध उद्बोधनपर शिबीरे आयोजित करण्यात आली.

२०१५-१६ मधील विशेष उपक्रमांची क्षणचित्रे